Skip to main content

पुढार्‍या,तू मंञी होणार !

लेखक विदेश यांनी रविवार, 30/01/2011 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल: विठ्ठला, तू वेडा कुंभार -) ‘भ्रष्टाचारा ’वरती करसी भाषणबाजी फार पुढार्‍या,तू मंञी होणार ! माती,वाळू,सिमेंट,चूना तूच पुरवसी खडी विटांना इमारती त्या उभारतांना तुझ्या ’आदर्शां ’च्या गणतीला नसे अंत ना पार ! सभासभांचे रूप आगळे प्रत्येकीचे जथे वेगळे तुझ्याविना ते काढती गळे हाती कुणाच्या दिसती नोटा कुणी पिऊन हुश्शार ! तूच भेसळीतून जोडसी घोटाळ्यांतुन एकी तोडसी कुरघोडयांतुन पक्ष फोडसी देसी पेटया- लाच पुरवसी पक्ष पुढे बेजार !!

गांधी पुण्यतिथीनिमित्ताने...

लेखक विकास यांनी रविवार, 30/01/2011 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
आज महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त गांधीजींच्या स्मृतीस अभिवादन. गांधीजी, अहींसा आणि त्याला अनुलक्षून स्वातंत्र्य म्हणल्यावर निघणारे वाद (आणि तेच इतर देशभक्त, स्वातंत्र्य सैनीक/सेनानींच्या बाबतीत) चावून चावून चोथा झालेले आहेत. त्यामुळे कृपया करून या धाग्याचा उपयोग त्यासाठी करू नये ही विनंती. वास्तवीक "गंगेमधे गगन वितळले" हे अंबरीश मिश्र यांचे गांधीजींवरील पुस्तक वाचून अनेक वर्षे झाली. (त्या संदर्भात शोधताना माझी आणि भोचक यांचा येथील हा संवाद देखील मिळाला...) मात्र त्या पुस्तकातील एक मुद्दा माझ्या कायम डोक्यात घोळत राहीला.

होम मेड होल व्हीट पिझ्झा

लेखक खादाड अमिता यांनी रविवार, 30/01/2011 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
हि रेसिपी स्पेशल आहे. कारण ह्यात पिझ्झा बेस पण घरी आपल्या रोजच्या वापरातल्या गव्हाच्या पिठातून (होल व्हीट फ्लॉर) बनवला आहे. पिझ्झा बेस साठी : ३ कप गव्हाचे पीठ १ १/२ मोठे चमचे ड्राय यीस्ट १ चमचा मीठ १ चमचा साखर १ कप कोमट पाणी १ चमचा तेल - यीस्ट आणि साखर कोमट पाण्यात विरघळवून त्याला १५ - २० मि बाजूला ठेवा थोडा फेस येईपर्यंत. - गव्हाच्या पिठात मीठ, तेल आणि यीस्ट चे मिश्रण घालून त्याची सैल कणिक भिजवा. वाटल्यास थोडं अजून पाणी घाला.

हा मराठी माणसा बद्दल आकस का ?

लेखक मराठी_माणूस यांनी रविवार, 30/01/2011 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळि खालील लेख वाचनात आला. हे एका पुस्तकाचे परीक्षण आहे . त्यात बासू चटर्जींनी त्यांचे काही अनुभव सांगीतले आहेत. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7386077.cms त्यात बासुदानी चीत्रपटात राजा परंजपे ना घेतल्या बद्दल , ताराचंद बडजात्यानी खालील हीणकस शेरा मारला आहे ' आप किसको लाये है ये मराठी से?' कोणतीही गुणात्मक टीका नसुन फक्त मराठी म्हणुन ईतकी टोकाची भुमीका ? तीही मराठीतील इतक्या गुणी अभीनेता आणि दिग्दर्शका बद्दल ?

माझा देश ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी रविवार, 30/01/2011 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझा देश मला प्रिय आहे येथे कोठेही हागता मुतता नि थुंकता येते येथे स्वातंत्र्याची रेलचेल आहे जिसकी काठी उसकी भैस आहे पकडला नि पुरावा नसला तर त्याचा सन्मान आहे असा माझा देश आहे माझा देश मला प्रिय आहे येथे पक्ष बदलता येतो कधी..
काव्यरस

दु:ख आता फार झाले

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 30/01/2011 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
दु:ख आता फार झाले स्वप्नही लाचार झाले दु:ख आता फार झाले झोपलेले ते निखारे जाग येता गार झाले झुंजण्याची वेळ येता शौर्य-धैर्य बिमार झाले झुंजणारे वीर खंदे आरशांचे हार झाले खेळ येथे माकडांचे या भुईला भार झाले पान कोरे अक्षरांना सांगते आचार झाले बांधलेली भोवताली भिंत होती दार झाले उत्तरांना पेलताना प्रश्नही बेजार झाले “अभय”तेच्या ’त्या’ नशेचे बंद आता बार झाले ...............गंगाधर मुटे...........

स्वा.सावरकरांच्या जन्मठेपेची शताब्दी...

लेखक अमोल देशमुख यांनी रविवार, 30/01/2011 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यविर विनायक दामोधर सावरकर यांना ईग्रजांनी दुस-या जन्मठेपेची शिक्षा सुनावली तो दिवस म्हणजे ३० जानेवारी १९११ आज ३० जानेवारी २०११ रोजी त्याला १०० वर्षे पुर्ण झाली, स्वातंत्र्यासाठी दोनवेळा जन्मठेप भोगणा-या स्वां.सावरकरांना विनम्र अभिवादन. १ जुलै १९०९ रोजी मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीला ठार केले, त्यानंतर नाशिक मध्ये २९ डिसेंबर १९०९ रोजी अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर ऑर्थर मेसन जॉक्सन याला गोळ्या घालुन ठार मारले ब्रिटीशांनी या दोन्ही घटनांचे खरे सुत्रधार म्हणुन स्वा.सावरकरांना १३ मार्च १९१० (रविवार) रोजी इंग्लंडच्या व्हिक्टोरीया स्टेशनवर अटक क

एक धागा...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 30/01/2011 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
नात्याचा धागा... लातूर जिल्ह्यातल्या भीषण भूकंपाने हजारो संसार उद्ध्वस्त केले. शेकडो बालके अनाथ झाली आणि असंख्य कुटुंबांच्या डोक्यावरची छपरे नष्ट झाली. या भूकंपाने देश हादरला. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी शेकडो हात सरसावले. सोलापूरच्या एका शाळेतील काही शिक्षकांनीही भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. अजित जोशी नावाचा मुलगा तेव्हा दहावीत होता. त्याचे वडील सोलापुरात शिक्षक होते. त्या मदतकार्यात तेही सामील झाले.