Skip to main content

पुढार्‍या,तू मंञी होणार !

लेखक विदेश
Published on रवीवार, 30/01/2011
(चाल: विठ्ठला, तू वेडा कुंभार -) ‘भ्रष्टाचारा ’वरती करसी भाषणबाजी फार पुढार्‍या,तू मंञी होणार ! माती,वाळू,सिमेंट,चूना तूच पुरवसी खडी विटांना इमारती त्या उभारतांना तुझ्या ’आदर्शां ’च्या गणतीला नसे अंत ना पार ! सभासभांचे रूप आगळे प्रत्येकीचे जथे वेगळे तुझ्याविना ते काढती गळे हाती कुणाच्या दिसती नोटा कुणी पिऊन हुश्शार ! तूच भेसळीतून जोडसी घोटाळ्यांतुन एकी तोडसी कुरघोडयांतुन पक्ष फोडसी देसी पेटया- लाच पुरवसी पक्ष पुढे बेजार !!
लेखनविषय:

याद्या 1195
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

या विषयावर भरपूरच कविता झाल्याने फार प्रतिसाद नसावेत असे दिसते. विडंबन बरे आहे.