सल्ला हवाय .....
मी डोंबिवलीत मध्ये जागेचा एक सौदा दलाला मार्फत केला होता. त्या सौद्यात मी माझे काही पैसे जागा मालकाला देऊन झाले होते परंतु जागा मालकाच्या काही कौटुंबिक कारणाने त्याने तो सौदा मोडला आणि त्याने मला मी देलेल्या रकमेचे धनादेश दिले , दुर्दैवाने ते धनादेश वटले नाहीत. यावेळी तो मालक म्हणतो आहे कि तो पैसे रोखीने देईल , पण असे सांगत सांगत ८ दिवस उलटून गेले आहेत आता तो फोन उचलत नाही आणि मला आणि ब्रोकर दोघानाही भेटण्यास टाळाटाळ करत आहे . त्या संबंधी मी आणि ब्रोकर दोघेही पोलिसांकडे गेलो असता मला कोर्टात केस करा असा सल्ला देण्यात आला आहे .