Skip to main content

फ्लाईट ९

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 11/02/2011 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
फ्लाईट ९ १९८२ सालचा २४ जूनचा दिवस. ब्रिटिश एयरवेजचे फ्लाईट ९ लंडन च्या हीथ्रो विमानतळावरून निघाले होते. ही फ्लाईट मुंबई, चेन्नई, कौलालम्पूर, पर्थ अशा मार्गे मेलबर्नला जायची होती. हे एक बोईंगचे ७४७ जातीचे विमान होते. चार इंजिने असलेले हे भले मोठे विमान ब्रिटिश एयरवेजच्या ताफ्यात अनेक वर्षांपासून होते. फ्लाईट उत्तमरित्या चालली होती. विमान निरनिराळ्या ठिकाणी थांबत प्रवासी उतरवत घेत होते. आता विमानाने भारतीय उपखंड जवळपास सोडला होता. आता भारतीय समुद्रावरून मलेशिया इंडोनेशिया या मार्गावरून मार्गक्रमण सुरू झाले.

अवंतिका बाईंची समाजसेवा

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 11/02/2011 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज अवंतिका बाईंची फार म्हणजे फारच लगबग चालू होती . आपला अवजड देह ( शक्यं तितक्यां) चपळाईने हालवतं त्या कामे उरकीत होत्या . सकाळी सकाळी त्यांनी आधी निर्मलाबाईंना नाश्त्याचा मेन्यू सांगितला. रामूला घराची साफ - सफाई नीट करण्याच्या सूचना दिल्या. ही महत्वाची दोन कामे उरकल्या नंतर नाही म्हणले तरी त्यांना थोडासा शीण आला होताच . म्हणून त्यांनी निर्मला बाईंना आलं घालून चहा करायला सांगितला. तेव्हढा चहा घेण्यापुरत्या काय ते त्या जरा सोफ्यावर विसावल्या . नंतर लगेच माळ्याला बागेच्या निगराणी संबंधी सूचना देण्यासाठी स्वतः बंगल्याच्या (चार ) पायर्‍या उतरून बागेत आल्या .

मुलीची आई

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 11/02/2011 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सासूबाईंनी केलेली कविता खाली देत आहे - मुलगी जन्मली सगळे म्हणाले लक्ष्मी आली घरी खूप बरं वाटलं, कारण आईच ना मी ||१|| अंगणातल्या चिमण्या घरीदारी नाचतात तरी घरट्याकडे वळतात, सांजेच्या वेळात ||२|| झगे परकरपोलके झाले साड्याचोळ्या ल्याल्या पहातापहाता जरा मोठ्याच दिसू लागल्या ||३|| शिकल्या सवरल्या स्वावलंबी झाल्या आणि मन पोखरू लागल्या, उदासी सावल्या ||४|| आईचं काळीज धडधडू लागलं पण कर्तव्याची जाण मन खाऊ लागलं ||५|| मुलीची जात नाही रहाणार घरात जाईल परक्यात, पण नांदेल सुखात ||६|| तेव्हा वाटलं आत्या व्हावं मावशी व्हावं भावाबहीणींची व्हावं ताई,पण कठीण होणं मुलीची आई
काव्यरस

Marzipan केक (2nd anniversary special)

लेखक Mrunalini यांनी शुक्रवार, 11/02/2011 03:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज आमच्या लग्नाच्या २र्‍या anniversary निमित्त मी हा केक केला होता. तशी ही recipe खुप मोठी असल्यामुळे मी step by step फोटो सहित पा़कृ लिहित आहे. साहित्यः स्पाँज केक - १ चॉकलेट क्रिम - २ पाकिट मिक्स फ्रुट जॅम - १ छोटा डबा Marzipan (बदाम-साखर ची पेस्ट) Cornflour - ३ चमचे कृति : १. नेहमीच्या तुमच्या पद्धतीने १ स्पाँज केक करुन घ्यावा.

स्पाईसी चिकन फिंगर्स

लेखक स्वाती२ यांनी गुरुवार, 10/02/2011 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य २ बोनलेस स्किनलेस चिकन ब्रेस्ट १/२ चमचा हळद १/२ चमचा तिखट १ चमचा गरम मसाला ३-४ लसूण पाकळ्या बारीक किसुन २ टीस्पून तेल १/२ कप ब्रेडक्रंब्ज १/४ कप परमेजान चिज किंवा मोनॅकोटाईप बिस्किटांचा चुरा कृती चिकनच्या उभ्या पट्ट्या कापून घ्या. हळद, तिखट, गरम मसाला, लसूण पेस्ट, तेल एकत्र करुन चिकनला चोळून लावावे. एका झिपलॉक बॅगमधे ब्रेडक्रंब्ज आणि चिज एकत्र करावे. ओवन ३५० फॅ ला गरम करत लावा.

मारामारी----

लेखक निवेदिता-ताई यांनी गुरुवार, 10/02/2011 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या 'इकडे' सर्वात जास्त आवडणारा हा प्रकार.. साहित्य- दोन उडीद वडे, एक ईडली, झणझणीत सांबार भरपुर, वरुन सजावटीसाठी बारीक शेव, कोथिंबीर. कॄती-- एक प्लेट घ्या , जरा खोलगट असावी, त्यात वडे व ईडली ठेवा, त्यावर भरपुर सांबार घाला , शेव व कोथिंबीर वरुन पसरावी.

वाद गणेशमूर्तीचा : शाडू की पीओपी ?

लेखक गणपा यांनी गुरुवार, 10/02/2011 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच मटा मधली ही बातमी वाचली. त्यावर गंणेश मंडळांची अपेक्षीत असलेली ही प्रतिक्रिया आज वाचनात आली. जरी शाडूच्या मुर्ती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस मुर्तीं पेक्षा वजनाला जड आणि महाग असल्या तरी मझ्या मते औरंगाबादच्या न्यायालयाने घालुन दिलेला हा धडा इतर उच्च-न्यायालयांमध्ये सुद्धा गिरवला गेला पाहिजे. दरवर्षी अनंतचतुर्दशी नंतर दुसर्ञा दिवशी येणारे फोटो पाहुन जीव तुटतो.

डोक्यात तिडिक आणणारे मिपाकर - भाग २

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 10/02/2011 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
माझं जन्मगांव सोडलं.. तर माझा संबंध फक्त मुंबईशीच आला.. इतर ठिकाणीही असेच होत असेल असा माझा कयास आहे.. तर, बरेचसे मुंबईतले दाक्षिणात्य- जे स्थलांतरीत होऊन इकडे आले, इकडे जन्मले वाढलेले नव्हेत- त्यांना मराठी/हिंदी कळत असूनही कळत नाही असा आव आणतात आणि फक्त इंग्रजी मध्ये बोलल्यासच उत्तर देतात... याला मुंबईत जन्मल्या-वाढलेल्या लोकांचा अपवाद आहे.. अगदी चांगले मराठी बोलणारे खूपसे दाक्षिणात्य परिचयाचे आहेत.... असंच एकदा सगळेजण गप्पा मारत होतो.. गाडी बोलता बोलता.. नेहेमीप्रमाणे.. माझ्या उत्तरभारतीय असण्यावर आली.. एव्हाना याची चांगलीच सवय झाली होती.. मी म्हटलं.. हे तर नेहेमीचे झालं..