Skip to main content

शालेय प्रयोग: एक्झिट पोल चुकतात का?

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 03/05/2026 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल पहाटे फिरायला गेल्यावर पार्कमध्ये आमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींची मैफिल जमते. बंगाल निवडणुकीच्या सर्वेक्षणावर चर्चा होत असताना सर्वांचे एकमत झाले — बहुतांश एक्जिट पोल चुकतात.

महाराष्ट्र दिन

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 02/05/2026 15:08 या दिवशी प्रकाशित केले.

महाराष्ट्र दिनानिमित्त मिपाकरांना शुभेच्छा.

 

कर्णकर्कश डि जे च्या आवाजाने नेहमी पेक्षा पंधरा मिनिट लवकरच झोप उघडली.कुंकवाचे कपाळ शेजारीच  ढाराढूर  झोपलं होतं.अजून दोन तासाची निश्चिंती होती. आळोखे पिळोखे देत अंगावरच्या चादरीची घडी घातली. पलंगावरची  विस्कटलेली चादर  निट केली.

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे॥

चालू घडामोडी । मे २०२६ । वैशाख अधिक ज्येष्ठ १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी शुक्रवार, 01/05/2026 10:00 या दिवशी प्रकाशित केले.

सर्व मिपाकरांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

"जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" असे राज्यगीत असलेल्या आपल्या मराठी राज्याची स्थापना होऊन आज ६६ वर्षे पूर्ण झाली.

आज जागतिक कामगार दिन आहे. पांढरे, निळे, करडे - सर्व प्रकारचे श्रमिक, हे जग निर्माण करण्यासाठी जे कष्ट उपसतात त्यांच्या श्रमाचा हा गौरव दिन.

आज वैशाखी पौर्णिमा आहे. भगवान विष्णूंनी आजच्या दिवशी गौतम बुद्धांच्या रूपाने भूतलावर अवतार घेतला होता. केवळ हिंदूंनाच नाही, अवघ्या मानव जातीला शांतीचा संदेश त्यांनी दिला.

अमेरिका: युद्धाचा चतुर व्यापारी

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 30/04/2026 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या महायुद्धानंतरचा काही शांततेचा काळ वगळता, अमेरिका कोणत्या ना कोणत्या देशावर हल्ले करतच आली आहे. या युद्धांमध्ये अमेरिका अब्जावधी डॉलर्स खर्च करते, तरीही ती दिवाळखोर होत नाही; उलट तिची अर्थव्यवस्था अधिकच मजबूत होते. सध्या सुरू असलेले युद्धही अमेरिकन अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठीच असल्याचे दिसून येते.

रिपुदमन कुमारध्वज

लेखक साहना यांनी बुधवार, 29/04/2026 13:21 या दिवशी प्रकाशित केले.

आर्यावर्तातील चार सम्राटांच्या युद्धाचा अंत आता जवळ आला होता. हिमालयाच्या पायथ्याशी, गंगा नदीच्या तीरावर, इंद्रप्रस्थाचे सम्राट वज्रकेतू आणि वैशाली राज्याचे बावीस वर्षीय सेनापती कुमारध्वज यांची सैन्ये आमनेसामने उभी होती. या भीषण युद्धाने संपूर्ण आर्यावर्तात जो संहार घडवून आणला होता, तो अभूतपूर्व होता.