आपल्या प्रथा आपण कशासाठी विसरायच्या?
परवा होळी झाली आणि काल धुळवड. रस्त्यावर सगळेजण रंग खेळत होते. दिवसभर प्रसारमाध्यमांनी 'होली है' टाईप बातम्यांचा आणि नाचगाण्यांचा मारा चालवला होता. आम्ही राहतो तिथेही शेजारच्या इमारतीमधील मराठी लोक मस्त रंग खेळत होते. एकाने विचारले, 'काय रंग नाही खेळायचा का?' त्यावर मी म्हटले, ' मराठी समाजात त्यासाठी रंगपंचमीचा दिवस राखून ठेवला आहे. आम्ही होळीला रंग खेळत नाही. ती प्रथा उत्तरेकडची आहे. त्यांना करु देत त्यांच्या पद्धतीप्रमाणे. ' त्यावर त्याने माझ्याकडे 'काय मूर्ख आहे?' अशा नजरेने पाहिले आणि विचारले, 'रंगपंचमीला काही सुटी नाही.
मिसळपाव