पाहाता वाट तुझी विचार वेडे येत राहिले
फुले उमळली चंद्र सरकले पहाट झाली
तु येशीलच आता असेच वाटतच राहिले
वेडे प्रेम! वेडा मी. जग हसतच राहिले.
तु येशील का खरंच? प्रश्न पडत राहिले
ज्ञात असुन उत्तर, तरी विचारत राहिले
उजाडण्याची वाट कशी बघतात सुर्यफुले
मन माझे टक्क तुझी वाट बघत राहिले
तु बघतच असशील चंद्र आकाशतले
म्हणून व्हावे मी चंद्र असे वाटत राहिले
आभाळात बसून मग तुला पाहात राहावे
असेच अजुन न कळे पण बरेच काही...!
पाहाता वाट तुझी विचार वेडे येत राहिले
फुले उमळली चंद्र सरकले पहाट झाली
तु येशीलच आता असेच वाटतच राहिले
वेडे प्रेम! वेडा मी. जग हसतच राहिले.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1136
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
निनाव -छान.आवडले तु येशील का
व्वाह....
मस्त
सर्वांचे आभार! - आपला निनाव.