Skip to main content

पाखरे निघालीत देशांतराला ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 01/04/2011 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
पाखरे आता मोठी झालीत .. पाखरांचे पक्षी झालेत . उडण्याचे बळ आलेय त्यांच्यां पंखात डोक्यावरचे आभाळ त्याना आतां कमी पडू लागलेय त्यांची नजर आता खूप दूरवर क्षितिजाच्या पार....
काव्यरस

४५ कोटीची करमाफी आणि देशाचे क्रिडाधोरण

लेखक चिंतामणी यांनी शुक्रवार, 01/04/2011 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
कोट्यावधी रूपये कमावणा-या क्रिकेट बोर्डाला करात ४५ कोटी रूपयांची सवलत निर्णय काल केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याच्या बातम्या आल्या आहेत. सामान्य माणसाला एक एक रूपया करासाठी नडणारे, सामान्य माणसाचे कंबरडे महागाई मोडले असताना त्याबद्दल विचार न करता क्रिकेट वर्डकप संयोजनासाठी ४५ कोटिची सवलत देण्य योग्य आहे का? आपल्या देशाकडे काही क्रिडा धोरण आहे की नाही? १४ देशांच्या वर्डकप संयोजनासाठी ४५ कोटिची सवलत. पण ज्या जागतीक महासंघांशी २०० पेक्षा जास्त देश संलग्न आहेत (व्हॉलीबॉल, फुटबॉल) अश्या खेळांचे आयोजनासाठी सवलती मदत/ मीळवण्यासाठी अनेक खस्ता खाव्या लागतात.

फंडा फायबरचा

लेखक खादाड अमिता यांनी शुक्रवार, 01/04/2011 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रूट ज्यूसपेक्षा फळ खावं, ब्रेडपेक्षा पोळी खावी इ. आहारातले फायबर वाढवण्यासाठीच्या सूचना आपण ऐकतो किंवा वाचतो. बिस्किटं, ब्रेड, कॉर्नफ्लेक्स असे बरेच मल्टी ग्रेन आणि हाय फायबर प्रोडक्टदेखील आज सर्रास मिळतात. पण हे फायबर नक्की काय असतं? आपल्या आहारात त्याचे काय महत्त्व आहे? कुठले पदार्थ मुळात फायबर रीच असतात? आहारातले फायबर आपल्याला वनस्पतीतून मिळते. फायबर म्हणजे अन्नातला असा पदार्थ, जो शरीरात शोषून घेतला जात नाही किंवा जो पचनक्रियेतून जात नाही. त्याचे मुळात दोन प्रकार असतात सोल्युबल किंवा विद्राव्य आणि इन्सोल्युबल किंवा अद्राव्य.

काफिला ...

लेखक sagarparadkar यांनी शुक्रवार, 01/04/2011 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांपासून टंकीन म्हणत होतो, पण ठीकशी जुळवा-जुळव होत नव्हती, आता जसा जमलाय तसा शेर टाकलाय .... हिंदीत असला तरी इथे गोड मानून घ्याल अशी अपेक्षा करतो. असेच आणखी प्रतिसाद मिळाले तर "दूध में शक्कर" मैं इधर उधर की बात नही करता, काफिला दख्खनसे गुजर रहा था | बेंगलोर्-बेल्लारी में ही इतना लूट गया, दिल्ली आते सिर पे सिर्फ कफन बाकी था | खुदपें था हमें यकीन, सिर तो अभीं बचेंगेहि नही | बाकी बचे कफन पें हमनेही .... झटसें हांथ मारा था |
काव्यरस

अभिषेक, आमीर खान आणि ऐश्‍वर्या मराठी चित्रपटामध्ये !

लेखक मोगली यांनी शुक्रवार, 01/04/2011 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सकाळी 'सकाळ ' मधिल एका बातमी णे लक्ष वेधले ! अभिषेक बच्चन, ऐश्‍वर्या राय आणि आमीर खान एका मराठी चित्रपटामध्ये काम करणार आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसले तरी साधारण दिवाळीच्या आसपास हा चित्रपट सेटवर जाणार आहे. त्याची निर्मिती ए. पी. कॉर्प या बॅनरखाली केली जाणार आहे. खरे तर बच्चन कुटुंबीय आणि त्यांचे मराठी प्रेम तसे काही नवीन राहिलेले नाही. अमिताभ बच्चन-जया बच्चन यांनी "अक्का' या चित्रपटामध्ये पाहुणे कलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर ए. बी. कॉर्प या बॅनरखाली अमिताभ बच्चन यांनी "विहीर' या चित्रपटाची निर्मिती केली होती.

विझले आज दिवे सारे

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 01/04/2011 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
विझले आज दिवे सारे रात्र माझी डोळ्यांत सरे अंधाराची वाटे भीती निशेस आज सांगू कसे दिशा नसावी दिशेस साथी वाटेनं सोडल्या पाउल खुणा पत्ता विचारे मज तो वारा वादळ मनी मग माझ्या उठे बनले मी दिव्यातील वाती आस माझी आज सारी जळे हरविले सारे घेतात शोध समोर मी न कुणास दिसे विझले आज दिवे सारे रात्र माझी डोळ्यांत सरे अंधाराची वाटे भीती निशेस आज सांगू कसे

शोध माझा

लेखक निनाव यांनी गुरुवार, 31/03/2011 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
शोधते आहेस मला कुठे तु मनी तुझ्याच वसतो मी असलो दूर जरी असा जवळच तुझ्या असतो मी नको शोधूस इतरत्र मज बघ जरा डोळे मिटून वेडी माझी प्रिये कशी तु डोळ्यांत तुझ्या असतो मी शोधू नकोस बाहेर मज तिथे दिसेल पुतळा माझा माझ्या सारखाच, मात्र कधी तो नसतो मी जगतो तुझ्या श्वासात असा सुगंधच तुझा असतो मी कुशीत तुझ्या भासेन तुला तिथेच तर सदा असतो मी

एप्रिल फुल

लेखक बन्याबापू यांनी गुरुवार, 31/03/2011 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
१ एप्रिल ला असे काय घडले कि नेमकी या दिवशी आपली बुद्धि गायब होते ? जाणकारांनी 'पक्या' टाकावा...'आंद्या' चालणार न्हाय ;) -(गेंदा फुल) बन्याबापू

झन झन झन झन पायल..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 31/03/2011 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
झन झन झन झन पायल.. (येथे ऐका) पं मल्लिकार्जून मन्सूर..! काय बोलू मी त्यांच्याबद्दल..? सिंहगडावरच्या देवटाक्याच्या पाण्याइतकाच स्वच्छ, शुद्ध, निर्भेळ आणि सात्विक माणूस. गवई म्हणून जितका मोठा, त्याहूनही अधिक एक सहृदयी माणूस..! सोबत मन्सूरअण्णांच्या नटबिहागाचा दुवा दिला आहे. दूरदर्शनवरील कुठल्याश्या कार्यक्रमातील हे ध्वनिमुद्रण आहे. मन्सूरअण्णांना नटबिहागाची फर्माईश केली गेली आहे आणि अक्षरश: पुढच्याच क्षणी मन्सूरअण्णांनी 'झन झन झन झन पायल..' ही बंदिश सुरू केली आहे.