Skip to main content

भारतीय संघाचे अभिनन्दन

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 03/04/2011 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय क्रिकेट संघाने १९८३ नंतर आज वर्ल्ड कप जिंकला. विश्वचशक स्पर्धेतील गेल्या तीन मॅचेस मध्ये ऑस्ट्रेलीया पाकिस्तान च्या चित्तथरारक लढतीनंतर फायनल ला श्रेलंकेविरुद्ध महत्वाची मॅच जिंकून भारताने विश्वचषक जिंकला आहे. भारतीय संघातील सर्व खेळाडुंचे अभिनन्दन. भारतीय संघ पुर्वी चांगल्या अवस्थेतून अडचणीत येण्यासाठी प्रसिद्ध होता. पण या विश्वचषक स्पर्धेत मात्र भारतीय संघ अडचणीवर मात करून अत्यंत टेन्स सिच्यूएशन असतानाही तणावावर मात करून जिंकू शकतो हे दाखवून दिले. आजच्या मॅचमधले तुम्हाला आवडलेले काही क्षण सांगा. मला आवडलेले काही १) धोनीने मारलेला शेवटचा षटकार...त्यावेळेस चेंडूसिक्सरसाठी त्याच्या च

क्रिकेट विश्वचषक - २०११ 'अभिनंदन'

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शनिवार, 02/04/2011 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
आय सी सी क्रिकेट विश्वचषक - २०११ जिंकल्याबद्द्ल भारतीय क्रिकेट संघाचे मनापासुन अभिनंदन! आपण एक इतिहास घडवलेला आहे! एक स्वप्न सत्यात उतरले! - (अतिशय आनंदी) इंट्या.:)

दाणे पडले टप टप टप

लेखक विदेश यांनी शनिवार, 02/04/2011 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
दाणे पडले टप टप टप चिमण्या गोळा पट पट पट चिव चिव करता टिपती दाणे टिपता टिपता म्हणती गाणे या रे पिलांनो जवळी या आपण गाणे गाऊ या घरटे काडयांनी सजवू दाणे पोटापुरते जमवू हाव नको ती जास्तीची सवय करू या कष्टांची चोच दिली ज्या देवाने घास ठेवले समोर त्याने आभार त्याचे मानू या चिव चिव गाणे गाऊ या

वर्ल्ड कप पेश्शल झटपट कोळम्बी

लेखक गोगोल यांनी शनिवार, 02/04/2011 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्री गणपाय प्रसन्न: || साहित्य: १. ५०-६० मोठ्ठ्या कोलंबी २. १.५ चमचा जिरा पाउडर ३. १.५ चमचा कोथिंबीर पाउडर ४. २.५ चमचा गरम मसाला. ५. एक मोठ्ठा कांदा ६. एक मोठ्ठा टोमॅटो ७. एक मिर्ची. ८. हळद, मोहरी ई ९. एक लिम्बू कृती: १. एका भांड्यात कोलंबी ठेवून त्यावर जिरा, कोथिंबीर पाउडर टाकून अख्खे लिंबू पिळून घ्या. हे मिश्रण चांगले मिक्स करून दोन ते तीन तास मूरत ठेवा. २. कोलंबी मुरेपर्यंत कांदा, टोमॅटो आणि मिरची बारीक कापून घ्या. ३. एका मोठ्ठ्या जड बूडाच्या भांड्यात थोडे तेल तापवा.

चिकन भुजिंग

लेखक गणपा यांनी शनिवार, 02/04/2011 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी थोड्याश्या विश्रांती नंतर पुन्हा तुमच्या सेवेसी हजर आहे. आज मी आपल्यासाठी खास वसई-विरार आणि आमच्या गावाकडला पेश्शल पदार्थ घेउन आलोय. भुजिंग. वसई ते डहाणु पट्ट्यातला भुजिंग न चाखलेला खवय्या विरळाच असावा. निखार्‍यावर पदार्थ भाजण्याच्या प्रक्रियेला आमच्या वाढवळ भाषेत भुजणे म्हणतात. आणि या भुजण्याला इंग्रजीची (.....ing) जोड देउन जी क्रिया होते ते हे भुजिंग. थोडक्यात मराठीतच सांगायच झाल तर बार्बेक्यु. माझ्या गावा जवळच मुंबई अहमदाबाद महामार्गावर (चारोटी नाक्याच्या थोडस पुढे) आई महालक्ष्मीच मोठ्ठ आणि प्रसिद्ध मंदिर आहे. दर वर्षी हनुमान जयंतीला इथे १५ दिवस आईची यात्रा भरते.

क्रिकेट विश्वचषक २०११ फायनल

लेखक प्रशांत यांनी शनिवार, 02/04/2011 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , क्रिकेट विश्वचषक २०११ चा अंतिम सामना चालू झाला आहे. आजच्या सामन्याचे धावते वर्णन लिहिण्यासाठी हा धागा काढला आहे

या गडे नाचूया..नागडे नाचूया

लेखक योगप्रभू यांनी शुक्रवार, 01/04/2011 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या टीमने वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारल्यानंतर भारतीयांचा उत्साह शिगेला पोचणे स्वाभाविक आहे, पण हा क्रिकेटचा ज्वर आता कुठल्या पातळीपर्यंत चाललाय त्याची एक झलक सध्या माध्यमांत पाहायला मिळतीय. पूनम पांडे नावाच्या मॉडेलने भारताने कप जिंकल्यास आपण संघासमोर कपडे काढणार असल्याचे जाहीर केले आहे. नुसते जाहीर करुन ती थांबली नाही तर तिने यासाठी बीसीसीआयकडे परवानगीही मागितली आहे. पूर्वी निर्लज्जपणाच्या कृतीचे वर्णन करताना 'कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणे' असा वाक्प्रचार केला जाई. आता मात्र कमरेचे डोक्यालाही गुंडाळण्याची गरज राहिलेली दिसत नाही.