Skip to main content

न्याय तुमचा खास आहे

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी मंगळवार, 12/04/2011 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
............ न्याय तुमचा खास आहे तक्रार तुमची, पोलीस तुम्ही, न्याय तुमचा खास आहे सीता असो वा द्रौपदी, नशिबात अमुच्या वनवास आहे. आले किती, गेले किती, यात सारे गर्क झाले बागेतल्या फुलांनाही, येथे गणिताचा तास आहे. कोण वेडा, कोण नाही, वेडेच ठरविती सर्व काही लाट आहे बारकी पण, मज सुनामीचा भास आहे. भाट यांचे गाऊन गेले, ढोल यांचे बडवून झाले बंद करतो कान माझा, इतुकाच मजला त्रास आहे. पेरले मी, राखले मी.

बखर अंतकाळाची - कालातीत भारतीय जाणीवेचा रसाळ आविष्कार

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 12/04/2011 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
अंताजीच्या बखरीच्या पहिल्या भागाविषयी इथे वाचता येईल. प्लासीच्या लढाईनं संपवलेल्या ‘अंताजीच्या बखरी’चा दुसरा भाग काही वर्षांनंतर सुरु होतो. मधल्या काळात पानिपत होऊन गेलेलं आहे; अंताजी पंधरा-वीस वर्षांनी म्हातारा (म्हणजे चाळीशी गाठण्याच्या बेतातला, मध्यमवयीन) झालेला आहे. अंताजीच्या गावच्या जमिनीच्या बखेड्याच्या पहिल्या कहाणीपासूनच मराठेशाहीच्या मधल्या काळातल्या प्रवासाचा अंदाज येतो.

पहिला पाऊस..

लेखक वैशाली . यांनी मंगळवार, 12/04/2011 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज ह्या वर्षाचा तुला भेटल्या-नंतरचा पहिला पाऊस.. बघना कसा छळतो.. तुझी आठवण ह्या मनात मेघांसारखी दाटून आणतो.. तुझी सोबत सुटल्याच्या वास्तविकतेला, डोळ्यातून पाणी म्हणून बरसण्यास भाग पाडतो.. मग मीही साथ देते त्याला.. मी अन तो पाऊस.. आता एकत्र बरसतो.. अन सोबतीला... तुझी आठवण !! उगीच काही थेंब तो शिंपडतो माझ्यावर.. जणू तुझ्याच स्पर्शाची ती जाणीव.. मोहरते मी.. कधी नुसतीच बहरते.. तुझ्या स्वाधीन व्हायला तयार.. सर्वस्वी.. नाही.. तुझ्या आठवणींच्याच म्हण की .. तू नसतोस..

मुन्नी बदनाम- एक रसग्रहण

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 12/04/2011 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांनो, आज आपला रसग्रहणासाठीची कविता आहे 'मुन्नी बदनाम हुई' काही चहाटळ लोक तिला आयटम साँग देखील म्हणतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करु. म्हणतात ना हाथी चले अपनी चाल.... तर थोडी माहिती. गीत- मुन्नी बदनाम हुई' चित्रपट - दबंग्ग संगीत - ललित सेन ( जतिन ललित मधला) हे पद्य मुख्यत्वे सलमान खान, मलायका (इतर उच्चारही आहेत) अरोरा खान आणि सोनू सूद यांवर चित्रित केले गेलेले असून इतर वडापाव( नीट वाचावे) वालेही कवायत करताना दिसतात. मुख्य तेवढ्याच मुद्द्यांचे रसग्रहण करण्याचा आपण प्रयत्न करुया.
काव्यरस

सांगे वडिलांची किर्ती.....

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 12/04/2011 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे घराणे सरदार घराणे. अस्सल. भेसळ? ह्या. चालणारच नाही महाराजा.एकदम खानदानी. पेटारेच्या पेटारे भरुन सोने होते. मोठ्ठं कुळ. जिकडे नजर जाईल तिकडे जमीन आमचीच. आणि घरचे लोक तर काय एकाहून एक हुस्शार... सगळीकडे आमचाच बोलबाला होता. दुध दुभते भरपूर. आमच्या शौर्याच्या, पराक्रमाच्या, बुद्धीमत्तेच्या गाथा सांगितल्या जात एकेकाळी..... पण म्हणतात ना.... साली दृष्ट लागली हो सगळ्याला. सग्गळं सग्गळं गेलं. चोरांनी लुटलं, ठगांनी फसवलं, काही अजाणतेपणी गेलं अन काही जाणतेपणी. आता आमचे लोक करतात चाकरी कुणाच्या हाताखाली. कुणाचा व्यवसाय गोळ्याबिस्किटांचा. कुणाचा फ्लॅट आहे शहरात दोन बेडरूमचा.

नारो शंकराची घंटा ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 12/04/2011 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दगडी देवळाच्या मुख्य दरवाजावर कोरलेल्या अर्धवर्तुळात ती घंटा पितळेची ,कदाचित पंचधातूची पुरुषभर उंचीची घनघोर आवाजाची खालूनच नदी वाहतेय गोदावरी आखीव रेखीव काठ शिसवी रंगाच्या कभिन्न दगडांनी बांधलेला किनारां पावसाळ्यात त्यावरून वाहणारे झुळझुळ पाणी पायावरून वेलांटत नागमोडी पसरत सरकणारे पाय भिजवीत महादेवाच्या दर्शनाला गेल्याची बारीकशी आठवण मंदिरात घुसताना घंटेचे दर्शन घाबरून जायचो तिच्या आकाराने बेलाचे पान वाहताना डोळे मिटून घ्यायचो तेव्हा घंटाच यायची डोळ्यासमोर घंटा तशी बर्याच उंचीवर महापुरात देखील पाणी नाही लागत तिच्या पायाला जेव्हा लागेल तेव्हा सगळे गाव जाईल वाहू
काव्यरस

जनगणना - देवाची पण ??

लेखक स्वच्छंदी_मनोज यांनी मंगळवार, 12/04/2011 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
देशाच्या या वर्षी झालेल्या जनगणनेत लोकसंख्येच्या मोजणी बरोबर देवांची पण गणना झाल्याचे ऐकीवात नव्हते पण भक्तांच्या कल्याणाकरीता मंदिरात बसलेल्या ह्या रामाच्या शिष्योत्तमाची पण गणना झाल्याचे बघुन आश्चर्य वाटले..

काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 12/04/2011 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
बंद ओठ बंद कान मनही बंद का हो? न्याय मिळेल का येथे एक जीव किंचाळत आहे सहनशिलतेचा येथे आज संग्राम आहे समाजात माथेफिरुंचाच सरंजाम आहे गवताची पाती सजली या भयाण राती काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे का लढवय्या आता बदनाम होत आहे पाठीत खंजीर खुपसणार्‍यांचा धाक आहे यल्गाराचा आता दबला आवाज येथे खोट्यांचाच येथे चित्कार आहे ------ शब्दमेघ

लाच का द्यावी?

लेखक सुधीर१३७ यांनी मंगळवार, 12/04/2011 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणापासून आपल्याला 'लाच घेणे ' हा हक्क आहे हे आपोआपच माहिती होते. रोज वर्तमानपत्रातून येणार्‍या बातम्या आणि रस्त्यावर वाहतूक पोलिसांबरोबर चालणारे व्यवहार पाहून आपली तशी पक्की खात्रीच होते.