Skip to main content

अखंडवाणी

लेखक नीलांबरी यांनी रविवार, 17/04/2011 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी नवर्‍याचा एक मित्र घरी आला होता. अगदी नोकरी लागायच्या सुरुवातीच्या दिवसांपासून त्या दोघांची मैत्री. त्यामुळे इतक्या वर्षांनी भेट झाल्याचा दोघांनाही खूप आनंद झाला होता. साहजिकच सगळ्या जुन्या सवयी, गमतीजमती यांची उजळणी सुरू होती. ' अजूनही सकाळी उठल्यावर अभंगवाणी ऐकायची तुझी सवय कायम आहे का रे?' मित्राचा प्रश्न. 'अरे बाबा, आता नशिबी अभंगवाणी कुठली असणार? आता फ़क्त असते 'अखंडवाणी.' माझ्याकडे तिरपा कटाक्ष टाकत नवर्‍याचे उत्तर. मित्राला मुळीच हसू आले नाही. हो, विनोदावर हसतात, सत्य गोष्टींचे हसू थोडेच येते?

भोचक, खोचक आणि वेचक

लेखक नीलांबरी यांनी रविवार, 17/04/2011 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात अनेक प्रकारचे मनुष्यस्वभावाचे नमुने आपल्याला रोजच भेटत असतात. हसवणारे,फ़सवणारे, चिडवणारे,रडवणारे... एक ना दोन. अनेक प्रकार. पण या सार्‍यात भोचक माणसांची एक वेगळीच गंमत असते. त्यांचा रागही येतो, अन कधीकधी हसूही येतं. भोचक म्हटल्यावर मला खूप वर्षांपूर्वीचा एक मजेशीर प्रसंग आठवला. सकाळची वेळ होती. आम्हा बहिणींची कॉलेजला जायची घाई सुरू होती. बाबा सुद्धा कोर्टात निघायच्या तयारीत होते. तोच गावाकडचा एक वृद्ध माणूस आपली केस घेऊन आला. वयाने बराच असावा. बाबांनी आईला चहा पाठवायला सांगितले. बाबांच्या ऑफ़िसच्या दारातून त्याला घरातले थोडेफ़ार दिसत होते.

पाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Tips)

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 17/04/2011 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
पाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Tips) संदर्भ: http://www.misalpav.com/node/17667 http://www.esakal.com/esakal/20110415/5193351932521427606.htm http://www.youtube.com/watch?v=mDtN-4Bqbl0 http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7995952.cms १. पाणीपुरी हि विक्रेतीकडची असली पाहिजे. (विक्रेत्याकडची नको.) २.

तंदूर पापलेट

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 17/04/2011 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः २ मध्यम किंवा छोटी पापलेटं २ टेस्पून घट्ट दही १ टेस्पून आले+लसुण+पुदिना पेस्ट १ टेस्पून तंदुर मसाला १/२ टीस्पून गरम मसाला १/४ टीस्पून काळीमिरीपूड मीठ चवीनुसार खायचा लाल रंग ( आवडत असल्यास) . पाकृ: पापलेटाचे शेपूट, डोके, खवले काढून टाकावे, त्यावर सुरीने चिरा पाडाव्यात व माश्यांना लिंबाचा रस, हळद व थोडे मीठ लावून ठेवावे. दह्यात काळीमिरीपूड सोडून सगळे जिन्नस घालून नीट एकजीव करा

कविता माझी

लेखक निनाव यांनी रविवार, 17/04/2011 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
वय धावते आहे तरी, कधी वेळ थांबतेच मग कितीही ठरविले लिहायचे नाही, तरी पेन उचलले जाते धडपडच सुरु होते माझ्या मनी मग असंख्य लाटांची आणि उतरते मग त्यातून सावरत.. नाजुक कविता माझी .. सुंदर मउ पायांनी .. अलगद पाउले टाकत उघडून दार मनाचे बाहेर डोकावत थांबते, थोडी लाजते मग पुन्हा नजर उचलून बघते माझ्या डोळ्यात स्पर्शते मन माझे..अन ऐकते स्पंदन हृदयातले डोळे माझे निजतात शब्द माझे पोहोचतात भावनांच्या खोल समुद्रात माझेच मला कळत नाही मग भान वेळे चे उरत नाही मग अन उतरते ती हळुवार विश्वात माझ्या .... कविता माझी !

फोडली तिजोरी - लुटला सर्व ठेवा -

लेखक विदेश यांनी रविवार, 17/04/2011 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : देहाची तिजोरी - भक्तीचाच ठेवा ) फोडली तिजोरी - लुटला सर्व ठेवा पकडणार चोरांना त्या - पकडणार केव्हा ? नसे दूर चौकी इथुनी फार पोलिसांची , तरी चोरटयांच्या नाही भीती मुळी त्यांची - सरावल्या चोरांनी का दंड थोपटावा ?
काव्यरस

असाच अजुन एक प्रवास !

लेखक माझीही शॅम्पेन यांनी रविवार, 17/04/2011 03:29 या दिवशी प्रकाशित केले.
पोरीच्या इवल्या इवल्या डोळ्यांनी जाऊ नका जाऊ नका म्हणत असताना जड पाऊलांनी निरोप घेऊन टॅक्सी एअर-पोर्ट कधी निघाली. तोच रस्ता , तीच वळण तेच सोपस्कार पार पाडून विमानात स्थिरवलो. विमानाच्या खिडकीतून बाहेर बघत मनातील निराशा हळु हळु वाढु लागली होती. ढगांचे काळे-पांढरे पुंजके जितके घट्ट होत होते तितकेच मनातील निराशेचे ढग दाटले होते. अधून-मधून जमिनीवरचे पाण्यचे तलाव डोळ्यात कवडसे खुपसत होते. जे खर तर सुंदर दिसायला हव होत तेच खुपत होत. कसला कंटाळा आला आहे , कसली निराशा आहे हेच कळेना.