Skip to main content

दोन मी

लेखक शरद यांनी शनिवार, 30/04/2011 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. धनंजय यांची कविता वाचल्यानंतर कै. आरती प्रभू यांच्या एका जुन्या कवितेची आठवण झाली. दोन मी तो कुणी माझ्यातला तो घनतमीं ठेचाळतो तरिही मी कां चालतो ?

जंक फूड चं घातक जाळं

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 30/04/2011 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी मी माझ्या मैत्रिणी बरोबर जवळच्या मॉल मधे खरीदी करायला गेले होते. सोबत तिचा ३ वर्षाचा मुलगा- रोहन पण होता. मॉल च्या दारातच एक मोठा विदुषक होता जो सर्व मुलांना फुगे देत त्यांच्या 'फास्ट फूड' रेस्टॉरन्ट मधे यायचा आग्रह करत होता. ते बघताच रोहन 'मम्मा फ्राईज' 'मम्मा बर्गर' 'मम्मा आईस्क्रीम' अश्या बऱ्याच विनवण्या व मग हट्ट करू लागला. तिथून त्याला कसं बसं समजावून पुढे निघालो तर तो 'कुकीझ' म्हणून ओरडला. आई तशीच पुढे निघून जातीये हे लक्षात येताच, त्याने तिथेच फतकल मारून चांगलाच गोंधळ घातला. शेवटी वैतागून माझी मैत्रीण त्याला फूड कोर्ट मधे घेऊन गेली आणि त्याचे हट्ट पुरव्ल्यावरच तो शांत झाला.

दोन मी

लेखक शरद यांनी शनिवार, 30/04/2011 15:18 या दिवशी प्रकाशित केले.

बाय बाय क्लिक क्लॅक डिंग!!!!

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 30/04/2011 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
क्लिक क्लॅक डिंग!!!! एकेकाळचा अनेक ऑफीसातून येणारा सगळ्यात नेहमीचा आवाज. टाईपरायटरचा आवाज. टाईपरायटर तुम्ही सगळ्यांनीच पाहिला असेल. मीही लहानपणापासून पाहत आलो आहे. हा टाईपरायटर घरात कधी आला हे नक्की आठवत नाही मात्र तो घरी होता. तेव्हा आमचं दहिसर हे मुंबईचं एक उपनगर असलं तरी त्याला एक गावपण होतं. गावातून एक 'वाहती' नदी होती. (माझ्या कळत्या वयापर्यंत तिचं पाणी दुषित व्हायला लागत असलं तरी निदान वाहतं होतं.) गावठणाबाहेर असलेलं विठ्ठलाचं कौलारू मंदीर ही गावातली महत्त्वाची जागा होती.

आला पहा कवी तो -

लेखक विदेश यांनी शनिवार, 30/04/2011 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
आला पहा कवी तो - आला पहा कवी तो - उलट्या दिशेस पळतो पाहून त्यास जो तो ! इकडून सिंह आला ; तिकडून बघ कवी तो सिंहासमोर जो तो जबड्यात शिरु पहातो ! का वाटते कवीचे भय फार सज्जनाला वाळीत का कवीला तो टाकण्यास बघतो !
काव्यरस

टोमॅटो सुप

लेखक Mrunalini यांनी शनिवार, 30/04/2011 04:03 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः टोमॅटो - ४ कांदा - १ लसुण - ३ पाकळ्या तेजपान - १ काळी मिरी - ४-५ बेसिलची पाने - ३-४ मैदा - २ चमचे ब्रेड - २ स्लाईस ऑलिव्ह ऑइल - २ चमचे साखर - १ चमचा क्रिम सजावटीसाठी कृती: १. कांदा लांब चिरुन घ्यावा. लसुण बारीक चिरावा. २. भांड्यामधे ऑलिव्ह ऑइल गरम करावे. त्यात तेजपान, काळी मिरी, चिरलेला कांदा आणि लसुण टाकुन परतुन घ्यावे. ३. त्यात २ चमचे मैदा टाकुन निट मिक्स करावे. ४. त्यात टोमॅटोचे मोठे तुकडे करुन टाकावेत. त्यात बेसिलची पाने व चवीनुसार मिठ टाकुन २ कप गरम पाणी टाकावे. ह्यावर झाकण ठेवुन १०-१५ मिनिटे शिजु द्यावे. ५. टोमॅटो शिजल्यावर ते गाळुन घ्यावे.

मेदूवडा - सांबार

लेखक स्मिता. यांनी शनिवार, 30/04/2011 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः मेदूवडा: २ कप साल काढलेली उडीद डाळ १/२ कप तांदूळ १ टीस्पून भरड वाटलेली मिरपूड १ हिरवी मिरची बारीक कापून किंवा १ टीस्पून लाल तिखट १ टीस्पून आले खिसून चिमूटभर सोडा चवीनुसार मीठ तळणासाठी तेल सांबारः १ कप तूर डाळ १ टेस्पून चिंचेचा कोळ १/४ टीस्पून हिंग १/२ टीस्पून जिरे आणि मोहरी १/४ टीस्पून हळद १ मोठा कांदा चिरून ३ लसणाच्या पाकळ्या बारीक कापून ३ हिरव्या मिरच्या तुकडे करून २ मध्यम टोमॅटो बारीक चिरून २ टीस्पून कोणाताही सांबार मसाला कढिपत्ता, कोथिंबीर आवडणार्‍या भाज्या चवीनुसार मीठ फोडणीसाठी तेल कृती: मेदूवडा: उडदाची डाळ ५-६ तास आणि तांदूळ २ तास भिजवून निथळून घ्या.

दिल्लीतील काही पुरातन वास्तू

लेखक किल्लेदार यांनी शनिवार, 30/04/2011 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीत एक दिवस राहण्याचा योग खूप दिवसांनी आला, थोडा फेरफटका मारून आलो. या वास्तूंबद्दल फार काही इतिहास माहीत नाही पण खूप फोटोजेनिक वाटल्या.

फोटोशॉपचा हा ही एक उपयोग

लेखक शरद यांनी शुक्रवार, 29/04/2011 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी शाळेपासून माझी चित्रकला बेकार होती. शिक्षक माझ्या प्रत्येक चित्राला दहापैकी ३/४ मार्क द्यावयाचे. माझ्या एका जिवलग मित्राची चित्रकला चांगली असावी कारण त्याला नेहमीच ८-९ मार्क मिळावयाचे. एकदा मी त्याला माझ्या वहीत चित्र काढावयाला सांगितले; पण त्या चित्रालाही ४ च गुण मिळाले ! आता शिक्षकांना कळत नव्हते म्हणावयाचे कीं माझा मित्र डॅंबिस होता हे अजूनही कळले नाही (शेवटी तोही भावेस्कूलचाच!). असो. सांगावयाची गोष्ट ही की माझी चित्रकला बेकारच. नववीपासून ती बला टळली. पुढील पन्नास वर्षात चित्रकलेतील भरपूर पुस्तके गोळा केली. जगातील १५ म्युझिअमचे खंड माझ्याकडे आहेत.