मेदूवडा - सांबार
साहित्यः
मेदूवडा:
२ कप साल काढलेली उडीद डाळ
१/२ कप तांदूळ
१ टीस्पून भरड वाटलेली मिरपूड
१ हिरवी मिरची बारीक कापून किंवा १ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून आले खिसून
चिमूटभर सोडा
चवीनुसार मीठ
तळणासाठी तेल
सांबारः
१ कप तूर डाळ
१ टेस्पून चिंचेचा कोळ
१/४ टीस्पून हिंग
१/२ टीस्पून जिरे आणि मोहरी
१/४ टीस्पून हळद
१ मोठा कांदा चिरून
३ लसणाच्या पाकळ्या बारीक कापून
३ हिरव्या मिरच्या तुकडे करून
२ मध्यम टोमॅटो बारीक चिरून
२ टीस्पून कोणाताही सांबार मसाला
कढिपत्ता, कोथिंबीर
आवडणार्या भाज्या
चवीनुसार मीठ
फोडणीसाठी तेल
कृती:
मेदूवडा:
उडदाची डाळ ५-६ तास आणि तांदूळ २ तास भिजवून निथळून घ्या. भिजवलेली डाळ आणि तांदूळ शक्य तितके कमी पाणी वापरून मिक्सरमधे वाटून घ्या. पाणी जास्त झाल्यास वडे बनवायला अवघड जाते. वाटणात मिरपूड, खिसलेले आले, मिरची (किंवा लाल तिखट), मीठ आणि सोडा घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या.
कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर हात पाण्यात बुडवून अंड्याच्या आकाराचा वाटणाचा गोळा हातात घ्या आणि अंगठ्याने त्या गोळ्याला मध्यभागी भोक पाडून सावकाशपणे गरम तेलात सोडा. तांबूस-सोनेरी रंग आला की वडा टिश्युपेपरवर काढून घ्या. अश्याप्रकारे सगळे वडे तळून घ्या.
सांबारः
तूरीची डाळ पूर्णपणे शिजवून घोटून घ्या. भांड्यात फोडणीसाठी तेल घेऊन ते गरम झाले की त्यात जिरे, मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग, लसूण, मिरची, कांदा आणि कढिपत्ता अनुक्रमे घाला. कांद्याला सोनेरी रंग आला की त्यात सांबार मसाला आणि हळद घाला. सर्व नीट एकत्र करून घ्या. त्यानंतर त्यात कापलेले टोमॅटो (आणि आवडत असलेल्या भाज्या) घाला. हे सर्व शिजले की त्यात घोटलेली डाळ, चिंचेचा कोळ, गरजेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. हे सर्व मिश्रण ५-१० मिनीट उकळून घ्या. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. झाला सांबार तयार!
आता वड्यावर सांबार घेऊन चव घ्या आणि सांगा बरं कसा जमलाय बेत ते!
(वडे बनवताना फोटो काढणे जरा अवघड होते. त्यामुळे एकच फायनल फोटो चिटकवलाय.)
वाचने
12490
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
आज सकाळी केले होते,म्स्त
मस्तच गं...... तोंडाला पाणी
In reply to आज सकाळी केले होते,म्स्त by रश्मि दाते
अरे वा!
In reply to अरे वा! by स्मिता.
,होना नाहीतरी संडे स्पेशल
In reply to अरे वा! by स्मिता.
,होना नाहीतरी संडे स्पेशल
सही जमून आलाय मेदुवडा... आता
छान फोटू! वड्यात डाळीबरोबर
तांदूळही
In reply to तांदूळही by रामदास
मध्यंतरी प्रभू सरांनी गावाहून
In reply to तांदूळही by रामदास
तांदूळ
ओ का उगा उपासाच्या दिवशी असले
छान पाकृ अन फोटो पण
त्यामुळे एकच फायनल फोटो
In reply to त्यामुळे एकच फायनल फोटो by मृत्युन्जय
ओ पुनेकर, आमच्यात
In reply to ओ पुनेकर, आमच्यात by प्यारे१
काकू????
खुपच मस्त
मस्तंच !
छान पाकृ आणी छान फोटो :)
-
सुरेख
मस्त्च! उद्या सकाळी नाश्त्या
मस्त..मस्त.............तोंडाल
मस्तच ! मेदू वड्यात तांदूळ..
धन्यवाद
tareech mee karate teMvhaa
aggo baay!! mee iMgleesh
In reply to aggo baay!! mee iMgleesh by स्पंदना
धन्यवाद