Skip to main content

चांगल्या मराठी शाळा नवी मुंबई

लेखक विक्रांत यांनी रविवार, 08/05/2011 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मुलीला धुळ्याहून नवी मुंबईत इयत्ता तिसरीत दाखल कारायचे आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत. आम्ही गेले १० दिवस चांगली शाळा शोधतोय. मात्र, अतिशय निराश करणारा अनुभव हाती येतोय. एकतर भाराभार इंग्रजी शाळा आहेत. पालकांनाच इंग्रजी माध्यमात मुलांना घालायचेय मग आम्ही मराठी शाळा काढून काय माशा मारु, हा संस्थाचालकांचा प्रश्न उचित आहे. लहान शहरात चान्गल्या शाळेचा प्रश्न फारसा सतावत नाही. धुळ्यात जयहिंद शाळेत ती होती. आता नवी मुंबईत पनवेल्पासून ऐरोलीपर्यंत किंवा थेट ठाण्यातही आम्हाला चालेल. प्रवेश कसा मिळवावा हा नंतरचा भाग आहे, पण चांगली शाळा कोणती, हा गहन प्रश्न आहे.

भरली वांगी (stuff brinjals)

लेखक पियुशा यांनी रविवार, 08/05/2011 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
भरली वांगी (stuff brinjals) ( स्टेप बाय स्टेप कृती फोटोसहीत देण्याचा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळ चू.भु.दे.घे.) साहित्य : (वाटणा करिता )ओल्या नारळाचा कीस २ वाट्या ,धणेपूड १ मोठा स्पून ,१ स्पून मिरची पावडर,एक स्पून गरम मसाला ,आल ,लसून ,कोथिंबीर . वरील साहित्याचे मिक्सी मध्ये थोड पाणी घालून वाटण तयार करून घ्या वांग्याला आडवे उभे काप देऊन हा मसाला त्या मध्ये भरा २ कांदे चिरून ,२ टोमाटो चिरून ,कोथिंबीर ,

वेगळ्या वाटेवरचा त्रिशूल कुलकर्णी

लेखक नीलकांत यांनी रविवार, 08/05/2011 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज माझ्या मित्राविषयी सर्वांना सांगावसं वाटलं म्हणून हा लेख. त्रिशूल कुलकर्णी विषयी नुकतीच पुणे सकाळने दखल घेऊन छान बातमी दिली आहे. http://72.78.249.107/Sakal/6May2011/Normal/PuneCity/Pune1Today/page11.h… हा त्रिशूल मला अनिल अवचटांच्या मुक्तांगण मध्ये पहिल्यांदा भेटला. खरं तर तेव्हा मनिष, योगेश ( अजानुकर्ण), अजीत आणि काही मुंबईचे लोक असे आम्ही भेटलो होतो. त्रिशूल पुढेही भेटत राहीला. त्याने एम टेकचा प्रकल्प किर्लोस्कर मध्ये केला.

नव्या साडीसाठी - दोघांची भ्रमंती

लेखक विदेश यांनी रविवार, 08/05/2011 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
( चाल : इंद्रायणीकाठी - देवाची आळंदी ) नव्या साडीसाठी - दोघांची भ्रमंती चालली खरेदी.. थांबेना ती |धृ | सवलतींचा ताजा - लागतो ढीग नाचती विक्रेते.. मागे पुढे |१| नव्या साडीसाठी - माझ्यापुढे साठे - खर्चाचा हिशेब भांडणात वाढ.. पत्नीसंगे |२| नव्या साडीसाठी - मागची उधारी - राहिली अजून जॉर्जेट .. शिफॉन .. , सुटका नाही |३| नव्या साडीसाठी -
काव्यरस

तिची नशा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 08/05/2011 06:24 या दिवशी प्रकाशित केले.
थंड झुळका अंगावर येत असाव्यात, शहराच्या गजबटापासून दूर एखाद्या शांत तळ्याकाठी तो दिलनशी बार असावा, अगदी आतल्या अंधाऱ्‍या परमिट रुम ऐवजी बाहेरच हिरवळीवर अड्डा जमवण्याची मुक्त मुभा असावी, संध्याकाळची वेळ, पुनवेचा चंद्रप्रकाश, डीश भरुन ओसंडणारा आवडता चटपटीत चकणा अन् निमुळत्या ग्लाससोबत आवडीच्या ब्रँडची 'ती' उभी असावी! मित्रांनो आलं ना ध्यानात? अशा आल्हादक वातावरणात चंद्रकोरीसारखी शनैःशनैः काळजावर चढणारी तिची मऊ मुलायम नशा शब्दांत पकडता कशी येईल?

माणसान्चा देव

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 08/05/2011 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
माणसान्चा देव रात्र झालि बाप्पा झोपला,माणसान्वरति भरपुर कोपला, दिवसभर देतात त्रास,काढुन ठेवतात एकच घास.
काव्यरस

मालवणी फिश करी

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 07/05/2011 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पापलेट स्वच्छ करून तुकडे करणे १ वाटी खोवलेले खोबरे १ मध्यम कांदा बारीक चिरून २-३ लसुण पाकळ्या ३-४ आमसुलं १ टेस्पून धणे ५-६ बेडगी किंवा संखेश्वरी मिरच्या (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त) मीठ चवीनुसार १ टीस्पून गरम मसाला (ऐच्छिक) तेल ६-७ तिरफळं , आतील काळी बी काढुन टाकावी , तिरफळं पाण्यात भिजवावी, मग ठेचुन त्याच पाण्यात घालावी.

तत्काळ चित्रकार ( Instant Artist) बना.

लेखक शरद यांनी शनिवार, 07/05/2011 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
झटपट चित्रकार फोटोशॉपचा असाही उपयोग मध्ये आपण त्यात चित्रे कशी काढता येतात ते पाहिले. पण त्यात मी एक अट घातली होती .."इच्छा व वेळ पाहिजे ". आता इच्छा बर्‍याच जणांना असली तरी हल्लीच्या धकाधकीच्या काळात "वेळ" कसा पैदा करणार ? तर आज पाहूं वेळ नसणार्‍या लोकांनाही "Instant Atist " कसे बनता येते. फोटोशॉपने त्यांचीही सोय केली आहे.पुढे दिलेली चित्रे मुद्दाम काळजीपूर्वक निवडलेली नाहीत. प्रत्येक चित्राला साधारणत: ३ ते ४ मिनिटे लागतात.