Skip to main content

सुरवंट

लेखक गौत्या यांनी सोमवार, 16/05/2011 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
९.४६. अंधेरी स्टेशन. लोकलला फारशी गर्दी नव्हती. निदान माझ्यासाठी तरी. मी मोठ्या चपळाईने वाऱ्याची खिडकी पकडली होती. गाडी भरत होती. अनेक माणसे आपला अजून एक दिवस ढकलायला चालली होती. या दरम्यान असाच कोणीतरी एक तो माझ्या शेजारी बसला. मला काय करायचं? कोणी का असेना? मी आणखी सरकणार नाही हे त्याला जाणवावं म्हणून मी किंचित पसरुन बसलो. २-३ बूट पोलीशवाले, १ भिकारी, मोबाइल मोठ्याने बोलणारे महाभाग असे नमुने येत जात होतेच. माझ्या समोरच्या सीटवर एक मराठी बाणा बसला होता. “मोडेन पण अजिबात सरकणार नाही”. लायकी फर्स्ट क्लास ची असूनही परोपाकाराखातर सेकंड क्लास मध्ये आलेल्या लोकांचा मला खूप राग येतो. असो.

गातेस घरी तू जेव्हां

लेखक विदेश यांनी सोमवार, 16/05/2011 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
( चाल: नसतेस घरी तू जेव्हां -) गातेस घरी तू जेव्हां जीव सुटका-सुटका म्हणतो शांतीचे विणता धागे संसार नेटका होतो ! छत भंगुन वीट पडावी हल्लाच तसा ओढवतो ही पाठ कणाहिन होते अन् चेहरा बारका होतो ! ये घरमालक दाराशी हळु गाण्या , तो खडसावे खिडकीच्या उघडुन दारा तो बोंबा मारून जातो !

नसबंदी

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 16/05/2011 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
मर्दपणाचा ताठा मिरवित गुर्मित धुमसत धुंद जवानी उभारून झेंडा मस्तीचा दाहिदिशा फिरलो मनमानी रांडानी खिडक्यांतुन तिरप्या खुणाविले मजला डोळ्यांनी शालिन नजरा झुकल्या,उठल्या अस्फुटशा होकारांनी आसुसलेल्या वक्षांवर किति हात फिरवले आसुसलेले सीत्कारांना कितीक मादक, आत्म्याचे होकार दिलेले नाही पाहिली काळी माती नाही नाती कुठे बांधली घुसवत अन् हल वखवखलेला बेदरकारी बिजे उधळली आता बघतो चौरस गोंडस कुटुम्बलेले कितीक, छोट्या दो चिमण्यांना कडी घेउनी शिस्तित चालत रेषा कोत्या इंग्लिश मिडियम फॉरिन वारी खुराक अन् बी कॉम्प्लेक्सचे फेसबुकावर पडती फोटो भरतनाट्यचे अन मुंजीचे गोजिरवाणी स्वप्ने माझी घ
काव्यरस

'अविस्मरणीय' उटी कोडाई

लेखक स्मिता. यांनी रविवार, 15/05/2011 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूचना: या लेखातले सर्व अनुभव १००% सत्य घटना असून त्यात काल्पनिक असे काहीही नाही. त्यात काही काल्पनिक वाटल्यास ते आमचे दुर्दैव समजावे. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ कधी कधी असे अनुभव येतात की वाटते एखाद्या गोष्टीचा विचार करताना जर ती अयोग्य, चुकीची किंवा करू नये अशी वाटत असल्यास ती न केलेलीच उत्तम! तसा माझा शकुन-अपशकुन, दैवी संकेत, इ. गोष्टींवर विश्वास नाही पण जिथे आपलं मनच नाही म्हणतं तिथे उगाच शहाणपणा करूच नये.

‘बालगंधर्व’ आणि आमचं शंकेखोर मन

लेखक चिंतातुर जंतू यांनी रविवार, 15/05/2011 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वपीठिका: नटरंग आणि आमचं शंके़खोर मन ‘बालगंधर्व’ चित्रपट पाहून भारून गेलेले अनेक लोक भेटले आणि तशी अनेक परीक्षणं विविध ठिकाणी वाचली. चित्रपट पाहून आमच्या शंकेखोर मनात आलेल्या काही शंकांचं निरसन तरीही झालेलं नाही, म्हणून रसिक मायबाप वगैरे समस्त मराठीजनांची क्षमा मागून आमच्या त्या शंका इथे दिलेल्या आहेत: संगीत आणि तेही विशिष्ट काळातलं, विशिष्ट जातकुळीचं संगीत (पक्षी: बालगंधर्व आणि त्यांच्या काळातलं नाट्यसंगीत) हाच ज्याचा आत्मा आहे अशा चित्रपटात एकता कपूरच्या टिनपाट टी.व्ही.

थेंबे-थेंबे

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 15/05/2011 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
एक थेंब टपकला तिच्या करूण डोळ्यातून बोच रुतवून गेला हताशलेल्या काळजामधून एक थेंब गळला थबथबलेल्या कपाळावरून आशा रुजवून गेला भेगाळलेल्या जमिनीतून एक थेंब प्रवेशला शिंपल्याच्या ओठांमधून बोच छुपवायला लपला चंदेरी टोपडे पांघरून एक थेंब चुकार दमला पोहून पोहून शर्यतीमधून हरला अडला बंद दार बघून एक थेंब निसटला अभेद्य आवरणामधून मिलनाचा सांगावा आला वाट पहाणाऱ्या फ़ळातून एक थेंब पसरवला गोलाकार कळकटामधून चंदेरी साज झळालला पात्राच्या अंगांगावरून एक थेंब मोहरला आसुसलेल्या जमिनीमधून तृप्त सुगंध महकला उन्हा्ळलेल्या झळांमधून थेंब थेंब जमवला अनुभुतीच्या ओळींमधून शब्दसाज जर भावला द्या दाद प्रतिस

तुझे भास होते

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 15/05/2011 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
कधी चांदण्याला तुझी आस होती कधी श्रावणाला तुझे ध्यास होते मला मात्र जन्मांतरी सोबतीला तुझे स्वप्न होते, तुझे भास होते निजेच्या क्षणी जोजवाया मनाला तुझे शब्द होते, तुझे सूर होते पहाटे जशी जाग आली, उशाला तुझे स्वप्न होते, तुझे भास होते गळा हुंदका दाटता सावराया तुझा स्पर्श होता, तुझे हास्य होते जरा एकटे वाटता साथ द्याया तुझे स्वप्न होते, तुझे भास होते फुलांना तजेला, कळ्यांच्या खळ्यांना हसू वाटणारा तुझा गंध होता झर्‍याला खळाळून लोभावणारे तुझे स्वप्न होते, तुझे भास होते समेला जशी दाद उस्फूर्त यावी तसा या जिवाला तुझा छंद होता दिली साथ आयुष्यगीतास ज्यांनी, तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
काव्यरस