Skip to main content

मंत्रमुग्ध तळे

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 19/05/2011 03:03 या दिवशी प्रकाशित केले.
ललगा लगाल लगागा लगागा असे काय होते तळ्याच्या किनारी रुपेरी जला ये शशीची खुमारी अशी पावसाने भिजूनी लव्हाळी जळी भासे चिंब फ़ुलांची डहाळी कुठे झाड गाते सुरांची तराणी पवनात वाजे सुखाचीच गाणी वसे आसमंति पऱ्यांची कहाणी नसे थेंब आसु दुखांची विराणी तळे ह्या सुखाने दुथाडी भरूनी असे थेंब थेंबि मनी साठवूनी जरि बैसलो हे अप्रुप बघूनी तरि चित्त माझे उडाले फ़ुलूनी असे काय होते तळ्याच्या किनारी खुलल्या रुपेरी मनाच्या किनारी येइ मोहरूनि उभारी थरारी मन पाखरू नभि मारी भरारी
काव्यरस

आईस पत्र

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 19/05/2011 02:48 या दिवशी प्रकाशित केले.
शुचिचे मुलीस पत्र पाहून मलाही पत्रलेखनाची सुरसुरी आली. पंतप्रधान आणि/किंवा जगप्रमुख (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष) यांना पत्र लिहीण्याएवढा मला वेळ नाही. मग ("माझ्या" काल्पनिक) आईलाच पत्र लिहून टाकलं. हाय आई, आता मोठी समजशील, नंतर मोठी समजशील आणि मग तरी तुझे उपदेशाचे डोस थांबतील असं वाटलं होतं. माझा अजूनही विश्वास बसत नाही की आता मी नोकरीनिमित्ताने दुसर्‍या ठिकाणी येऊन रहाते आहे तरीही तू मला अजून बाळच समजते आहेस. अशा वेळी तरी तुला तुझं तरूण वय आठवेल असं वाटलं होतं.

एक कोष्टक

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 18/05/2011 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
माझे पैसे दुसर्‍यांचे पैसे
माझ्यावर खर्च गुणवत्ता मूल्य गुणवत्ता मूल्य
दुसर्‍यावर खर्च गुणवत्ता मूल्य गुणवत्ता मूल्य
एखाद्या वस्तूची खरेदी होत असताना कुणाचे पैसे आहेत आणि कुणावर खर्च होत आहेत ह्यावर वस्तूच्या किंमतीकडे आणि दर्जाकडे कसे लक्ष दिले जाते ह्याचे एक उद्बोधक कोष्टक. ज्यावर काट मारली आहे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. हे मानवी स्वभावाशी सुसंगत आहे.

वेडेपणा... (गझल)

लेखक स्वानंद मारुलकर यांनी बुधवार, 18/05/2011 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
काळीज माझे गुंतले अन भोवला वेडेपणा 'शहरात या तू एकटा!' म्हणला मला वेडेपणा रात्री कुणी हाकारले ओळख मला ना लागली मी बोललो 'तू कोण रे?' तो बोलला ' वेडेपणा!' एकांत हा दःखी करे वणवण जिवाची ना टळे आम्ही पुरे कंटाळलो कंटाळला वेडेपणा माझ्या रथाला हाकता तू सोबती तू सारथी ना माहिती आहेस तू माझ्यातला - वेडेपणा! साकी विचारे सारखी 'आहेस का रे तू सुखी?' ओलावल्या दुःखातुनी मी कोरला वेडेपणा स्वप्नात माझ्या सारखा तो चंद्र येतो एकटा माझ्या परी त्याच्या जगी आकारला वेडेपणा - स्वानंद प्रेरणा: http://www.youtube.com/watch?v=qH5q-v8tvF4

दखल

लेखक उपटसुंभ यांनी बुधवार, 18/05/2011 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
एक छोट्या बहरातली गझल लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. बघा आवडते का -- लिहू नवी गझल जरा व्यथे अजून सल जरा भ्रमात या खुशाल मी खर्‍यास दे बगल जरा असेच टाळ नेहमी अशीच घे दखल जरा मना कधी कळेल का तुला तुझाच कल जरा नवीन स्वप्न पाहु दे हवा तुला बदल जरा असेल ध्रुव एकटा मलाहि ये ढकल जरा..!
काव्यरस

गजर (Journey of the soul)

लेखक गणेशा यांनी बुधवार, 18/05/2011 07:18 या दिवशी प्रकाशित केले.
गजर (Journey of the soul) लेखक-दिगदर्शक : अजित भैरवकर कलाकार : चिन्मय मांडलेकर, सुखदा यश, एडवर्ड, सुहास शिरसाट --- १८ दिवस चालणारी पंढरीची वारी आणि ज्ञानेश्वरीचे १८ अध्याय यांचा योग्य संगम (नाविन्यपुर्ण विचार) मला खुपच आवडला .. या एका कल्पनेसाठीच लेखकाला सलाम, अजोड परिश्रम.. वारीच्या खरा अनुभव .. खर्‍या वारीमध्ये १८ दिवस केलेले शुटींग.. वारीतील प्रसंग.. रिंगण आणि इतर प्रथा... आणि एका माणसाच्या जीवनात वारीमुळे होणारा योग्य बदल हे ह्या सिनेमाच्या मुख्य बाजु वाटतात .. त्यातच वारीतल्या शेतकर्यांच्या थोड्याश्या कहाण्या..

स्त्री-पुरुष समानता

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 18/05/2011 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, डिस्ल्केमरः शिर्षक आणि मायना यांचा संबध न वाटल्यास प्रेषक जबाबदार नाही. :) अगदी आजचीच गोष्ट.. स्थळ : मुंबई वेळ : ऑफिस संपल्यावर चल यार आज पार्टी करते है, साला बहुत हो गया. अशा वाक्याने संध्याकाळ सुरु झाली. मी थोडा उशीर म्हणून एकटाच निघालो, रिक्षावाले जायला तयार होईनात, एक मिळाली, पकडली. एक सुंदर तरुणी शेजारीच उभी होती, म्हणाली "शाल आय ड्रॉप यु? आय वोन्ट गेट ऑटॉ अर्ली" तिच्या सौंदर्यापुढे माझं काय चालणार होतं? ;) नकळत हो म्हणालो. गप्पा सुरु झाल्या, पोरगी वन नाईट स्टँड वाली होती, चांगली शिक्षित, नोकरी करणारी. पण आमच्या अनामिकेत नुकतीच विराजमान झालेली अंगठी (पक्षी: कुलुप).

चॉकलेट फज् : Chocolate Fudge

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी मंगळवार, 17/05/2011 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
रेशमी..जिभेवर वेल्वेटी फील देणारं ...चॉकलेट फज्! सोप्पं आहे. पण कधी वड्या पडतील याचा परफेक्ट अंदाज यावा लागेल. साहित्य : कंडेन्स्ड मिल्क : १ टिन कूकिंग चॉकोलेट : २०० ग्रॅम्स साखर १०० ग्रॅम्स लोणी : ५० ग्रॅम्स थोडी पिठीसाखर (emergency quick-fix) कृती : ट्रे ला तूप / बटर लाऊन घ्या. सगळं एकत्र करुन नॉन्-स्टिक कढईत घ्या. सतत हलवत रहा. कडेनी सुटायला लागल्यावर / गोळा व्हायला लागल्यावर ट्रे मध्ये ओता. साधारण थंड झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवा.