Skip to main content

स्त्री-पुरुष समानता

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 18/05/2011 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, डिस्ल्केमरः शिर्षक आणि मायना यांचा संबध न वाटल्यास प्रेषक जबाबदार नाही. :) अगदी आजचीच गोष्ट.. स्थळ : मुंबई वेळ : ऑफिस संपल्यावर चल यार आज पार्टी करते है, साला बहुत हो गया. अशा वाक्याने संध्याकाळ सुरु झाली. मी थोडा उशीर म्हणून एकटाच निघालो, रिक्षावाले जायला तयार होईनात, एक मिळाली, पकडली. एक सुंदर तरुणी शेजारीच उभी होती, म्हणाली "शाल आय ड्रॉप यु? आय वोन्ट गेट ऑटॉ अर्ली" तिच्या सौंदर्यापुढे माझं काय चालणार होतं? ;) नकळत हो म्हणालो. गप्पा सुरु झाल्या, पोरगी वन नाईट स्टँड वाली होती, चांगली शिक्षित, नोकरी करणारी. पण आमच्या अनामिकेत नुकतीच विराजमान झालेली अंगठी (पक्षी: कुलुप). तिला सोडून मी निघालो. बिचारी जाईपर्यंत आशावादी होती. ३-४ जणं मिळून एका रेस्टोबार मधे पोहोचलो. गप्पा, विनोद, आणि आजुबाजुचे निरिक्षण यात २ बीयर झाल्या. बाजुला दोन तरुणी आणि दुसर्‍या बाजुला एका पार्टीचे कुणी तथाकथित नेते बसले होते. तरुणी आमच्याप्रमाणेच दारु आणि सिगारेट पित होत्या, ते नेता लोकांना पहावलं गेलं नाही. त्यांनी अगदी मालकाला धमकी घातली, पण पोरी काही जुमानल्या नाहीत. मग पोरींचे बॉयफ्रेंड आले. झप्पीया पप्पीया प्रकार सुरु झाले. पार्टीवाले का काय माहित गप्प राहिले. मग दोन पोरी उरल्या. आम्ही गंमत पहात होतो, (हो अशा ठिकाणी सामान्य माणूस काय करणार हो?) एक पोरगी आउट झाली, दुसरी तिला तशीच सोडून गुपचूप निघून गेली. पोरगी एकटीच, दिसायला सुंदर... त्यात कपडे एकदमच प्रदर्शनकारी टेबलावर डोकं ठेवुन स्वतःला कसंबसं सावरत होती. पार्टीवाल्यांना चेव चढला होता. म्हणत होते की पोलिसांना फोन करुन ही वेश्या आहे असं सांगून अटक करायला सांगू. आमचं जेवण येत होतं, मला तिची कीव आली, म्हंट्लं कि जर खरच चांगल्या घरातली असेल तर उगाच वाटोळं व्ह्यायचं. पार्टीवाले जोशमधे आलेच होते, आणि मी पुढाकार घेतला. काही ओळखी कामी आल्या, पार्टीवाले "अरे तुम्ही तर आमचीच माणसं" असं म्हणत शांत झाली. मी माझ्या अंधेरीच्या पोलीस स्टेशन मधल्या पीएसाअय मित्राला फोन लावला. त्याने मला तिचा सेलफोन बघायला सांगितला. त्यातील काही नंबर शोधून मी फोन लावले, तिच्या पेईंग गेस्ट मधले म्हातारे आजोबा केअर टेकर तिला घ्यायला आले. माझं जेवण तर काही झालं नाही, पण पार्टीवाले गेल्यावर मालकाने आमचं बिल घ्यायला नकार दिला, आम्ही बिल भरलचं शेवटी. पण एक प्रश्न मात्र कायम राहिला, कि खरच स्त्री आणि पुरुषाची आजच्या जगात बरोबरी आहे?

वाचने 8660
प्रतिक्रिया 51

प्रतिक्रिया

आणि बरोबरी कुठुन आली? अगदि अगदि.

काही झेपलंच नाही. पण तुम्ही अधीच स्पश्ट केल्यामुळे (शिर्षक आणि मायना यांचा संबध न वाटल्यास प्रेषक जबाबदार नाही) फार चिडचिड झाली नाही. बाकी एवढच म्हणेन, असेच सत्कार्य करत रहा!!!

पैसे सारखे कमावले पाहिजेतच ... काही पुरुष दारु पितात सिगारेट ओढतात थिल्लर पणा करतात त्याप्रमाणेच काही मध्यमवर्गीय स्त्रीया जेंव्हा समानतेच्या घोशाखाली असे करु पाहु लागली तर पुर्ण समाजाचा समतोल ढळेलच. पुरुषांच्या थिल्लरपणाला समर्थन मुळीच नाही ते ही अयोग्य आहेच..आणि फक्त स्त्रीयांनी समाजाच्या समतोल्चा ठेका घेतलाय हे ही माझे म्हणणे नाही.. पण अश्या गोष्टींचे अनुकरण करुन समानता आणु पाहणार्यांची चुक वाटते... कदाचीत ही समानता नसेल ही .. ही असेन अनकंट्रोल स्वातंत्र्याची एक झलक

शीर्षक आणि विचार मांडण्याची पद्धत दोन्हीही अगदीच चुकले आहे. मराठमोळा, यापेक्षा 'आजच्या स्त्रीची अशीही प्रतिमा' या शीर्षकांतर्गत लेख लिहिला असतात तर अधिक बरे झाले असते. ;-)

वरील प्रसंगातून वाचकांना खालील गोष्टी कळू शकतील. १) ममो सध्या मुंबईत आहे. २) नुकताच तो बंधनात अडकला आहे ३) मुंबईत कधी कधी रिक्षा शोधताना लॉटरी लागून वन नाईट स्टँडवाली अनोळखी तरुणी भेटू शकते. यानिमित्ताने आज प्रथमच उपनगरात न राहण्याचा पश्चाताप होतो आहे हे नमूद करतो. च्यायला, आमच्या कडे रिक्षाच नसतात. बस ची वाट अनेकदा बघितली आहे, पण वन नाईट स्टँडच काय पण वन किस स्टँड वाली पण नाही भेटली आजवर. आता आम्ही ममो एवढे माचो टाईप (इंग्लिश मधील अर्थ) नाही म्हणा, पण तरीही.... ४) लग्न ठरल्यापासून ममो नैतिकता पाळायला लागला आहे (आधी पाळत नव्हता असे म्हणणे नाही, पण ते प्रस्तुत धाग्यावरून पक्के सांगता येत नाही.) ५) ममोसाठी सुंदर, तरुण, चांगली शिक्षित आणि नोकरी करणारी मुलगी आशावादी (आतुर) होती. (आणि तिची निराशा झाल्याने ती नंतर बिचारी पण झाली म्हणे) ६) ममो ची मुंबई पोलिसात ओळख आहे. ७) ममो अनोळखी लोकांना पण मदत करायला तयार असतो (आणि करतो) ८) मालक पण चांगला होता. बिल माफ करत होता. ९) हल्ली धाग्याशी फारसा संबंध नसलेले शीर्षक द्यायची रोचक प्रथा जोरात सुरु आहे. (याबाबतीत मिपाकरांनी आत्मपरीक्षण करावे का??) ममो साठी तटी :- पुढील वेळेस मुंबईत अशी उत्सुक तरुणी आढळल्यास, तुझ्याकडून वेगळी कृती अपेक्षित आहे. तपशीलासाठी व्यनि करावा ;-)

ममो, आधी 'लढाईच्या आधी राजीनामा' दिला नसतास तर नंतर कीव आणत बसावे लागले नसते ना ? भावी सौ. ममोंचे मत वाचण्यास उत्सुक.

थोडक्यात आंगठी ने गेम केला म्हणायचा :) :) असो .. बाकी असले प्रकार साला आमच्या सोबत कधी घडत नाही . आम्ही अनोळखी बायकांपासुन ४ हात लांबच रहातो. नसत्या कटकटी नकोत :)

मक ने सुचवलेले शीर्षक जास्त चपखल आहे. >>मला तिची कीव आली, म्हंट्लं कि जर खरच चांगल्या घरातली असेल तर उगाच वाटोळं व्ह्यायचं ती चांगल्या घरातली असेल अशी शंका तुमच्या मनात का उत्पन्न झाली? >>तरुणी आमच्याप्रमाणेच दारु आणि सिगारेट पित होत्या, >>झप्पीया पप्पीया प्रकार सुरु झाले. >>एक पोरगी आउट झाली कोणत्या चांगल्या घरातल्या मुली अशा गोष्टी करतात? विना परवाना मद्यप्राशन करणे गुन्हा आहे. त्यांच्याकडे परवाना होता की नव्हता हे तपासणे पोलीसांचे काम आहे. पोलिसांना पाचारण करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्णय होग्य होता असे वाटते.

In reply to by शाहरुख

हेच म्हणतो. शिवाय फोटो वैग्रे आल्यास काही जुण्या आठवणी जाग्या होतील आणि व्यक्तिचित्रांचा ब्याकलॉगही भरून निघेलसे वाटते. ;)

लेखातून नेमकी कसली समानता सांगायची आहे ते कळले नाही पण लेखात सांगितलेले समानतेचे मापदंड मोजण्यासाठी नसावेत हे नक्की.

''मी माझ्या अंधेरीच्या '' त्या वातावरणाचा एवढा प्रभाव होता की ममोंना अंधेरी त्याचीच वाटायला लागली. बरं लगेच अंधेरी देउन नाही टाकली त्या चांगल्या घरच्या प्रदर्शनीय कपडे घालुन टेबलावर डोकं ठेवुन स्वताला कसंबसं सावरणा-या पोरीला.

बाकी आऊट वगैरे टाळून पीली असती तर काय फरक पडला असता ?
पोलिसांना फोन करुन ही वेश्या आहे असं सांगून अटक करायला सांगू.
ही मानसीकता अत्यंत चूकीची आहे, आपण आउट झालोय म्हणून कोणी हा आय एस आय एजंट आहे अशी पोलीसांना खबर दीली तर आवडेल काय ? आपण जे केलेत ते मात्र योग्य केलेत.
खरच स्त्री आणि पुरुषाची आजच्या जगात बरोबरी आहे?
स्त्री आणि पुरुषाची बरोबरी ना कधी होती ना कधी असेल. स्त्रीयांच्या अ‍ॅचीव्हमेंट्स या पूरूशांच्या मदतीवरच अवलंबून असतात हे सत्य नाकारण्यात काहीच अर्थ नाही.

In reply to by आत्मशून्य

>>स्त्री आणि पुरुषाची बरोबरी ना कधी होती ना कधी असेल. स्त्रीयांच्या अ‍ॅचीव्हमेंट्स या पूरूशांच्या मदतीवरच अवलंबून असतात हे सत्य नाकारण्यात काहीच अर्थ नाही. आणि अशा प्रकारे ममो शतक झळकावण्याच्या दिशेने कूच करत आहेत.

In reply to by आत्मशून्य

स्त्री आणि पुरुषाची बरोबरी ना कधी होती ना कधी असेल.
सहमत
स्त्रीयांच्या अ‍ॅचीव्हमेंट्स या पूरूशांच्या मदतीवरच अवलंबून असतात हे सत्य नाकारण्यात काहीच अर्थ नाही.
मुलं होणे सोडुन २री कुठली अ‍ॅचीव्हमेंट् पूरूशांच्या मदतीवरच अवलंबून असेल असे नाही वाटत .

In reply to by नगरीनिरंजन

हो समाजात, नातेवाईक अन शेजारी यान्च्या दृष्टीने लग्न आनि मुलं ही अ‍ॅचीव्हमेंटच असते.

In reply to by मुलूखावेगळी

वरिल वाक्यातुन अर्थ फार विचित्र निघतोय . -> एखाद्याला मुलं होणे ही समाजाची / नातेवाईकांची / शेजार्‍यांची अचिव्हमेंट असते असो . आमचे नातेवाईक , आमचा समाज , आनि आमचे शेजारी .. ह्यांना आमच्याकडुन कोणत्या " असल्या प्रकारच्या" "अचिव्हमेंट" ची अपेक्षा करताना पाहिलं नाही बुवा कधी :) तुमचं सगळंच आयडीप्रमाणे दिसतंय ;) - मुलीखाकॅड्बरी

In reply to by टारझन

.
एखाद्याला मुलं होणे ही समाजाची / नातेवाईकांची / शेजार्‍यांची अचिव्हमेंट असते
हा असा अर्थ तुच काढु शकतोस, तसा निघत नसताना प्रत्येकाला हवे ते अर्थ काढण्याचे स्वातंत्र्य आहेच. तेव्हा चालु दे . -तुझे टाक(ण्)खार

In reply to by नगरीनिरंजन

आता साधच उदाहरण द्यायचं झालं तर मुलगी जन्माला आल्यावर दवाखान्यात बघायला सासरचे कोणी जातही नाहीत. घरी येताना बाळंतीण पराभूतासारखी येते. मुलगा झाल्यावर सुटकेचा फील अनेकजणींना येतो तो उगीच नाही! हे सगळे आजही चालू नाहिये असे म्हणायचे आहे काय? कोणाला कश्यात अचिव्हमेंट वाटेल हे सांगता येत नाही.;)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मुलं कुणाला झाली यावर अवलंबून तेही मुलगे.......मुली झाल्यावर आनंदानी उड्या मारणारे कमी आहेत.;)

In reply to by नगरीनिरंजन

कधी कधी चांगल्या क्षणांचा आनंद घेतल्यावर मूल होऊ न देणे हीसुद्धा अचिव्हमेंट असते.

काय शिर्षक आणि आणि काय लेख!! या दोन्हीचा परस्परांशी काही संबंध आहे का? यामध्ये बरोबरीच कुठे काय आलं काही समजलं नाही.

लेखात जे वर्णन केलेलं आहे त्यावरून समानता नाही हेच सिद्ध होत नाही का? एकटा पुरुष कितीही उठवळ कपडे घालून बारमध्ये पिऊन पडला असता तर त्याच्याबद्दल 'हा वेश्या आहे अशी तक्रार करू' असं बायकांच्या घोळक्याने म्हटलं असतं का? आणि लेखकाच्या परिस्थितीत असलेल्या स्त्रीने काही फोन करून, ओळखी काढून त्याची 'सुटका' करण्याची पाळी आली असती का?

In reply to by राजेश घासकडवी

... पण वरचा प्रतिसाद पाहून "आमच्या" शाहीदची आठवण झाली. खुद के साथ बातां: डायरीतलं पुढचं पान नक्की कोण लिहीणार आहे?

In reply to by राजेश घासकडवी

हेच म्हणतो, नेमक्या शब्दात मांडल्या बद्दल धन्यवाद!

सरजी, केवळ चटकदार डिस्क्लेमर मेंदुला झिणझिण्या आणणं कमी करतं ? ९० % अनुभव तर तुमचा 'पुरुषीपणाच 'दाखवतोय' ना... ? जेव्हा तुम्ही स्त्री पुरुष समानता असं , शिर्षकात का होइ ना , म्ह्णता तेव्हा ५ % समानता तरी हवी ना ? उक्ती जाहीर रित्या मांडताना कॄतिचं पाठबळ नको ? ,निदान मांडलेल्या विचारात तरी .....

स्त्री-पुरुष समानता हे शीर्षक सूचक मानले तर योग्य आहे. कारण याच प्रसंगात त्या तरुणी ऐवजी एखादा पुरूष म्हणजे असता तर पार्टी वाल्यांनी लगेच असे वर्तन केले असते का? कदाचित 'स्साला पियेला है' म्हणून बहुदा दुर्लक्ष केले असते. पण केवळ तेथे एक मुलगी दारू प्यायलेल्या अवस्थेत असल्याने लगेच वेश्या ठरवण्या पर्यंत वेळ येते. यातून तेथे बहुसा स्त्री-पुरुष समानता नावालाच आहे हे लेखकाला सुचीत करायचे आहे असे वाटले. मात्र पहिल्या प्रसंगात ती मुलगी वन नाईट स्टँडवाली आहे हे लेखकाने कसे ठरवले हे मात्र कळले नाही. वाटले म्हणून? ( आमच्या गृपमध्ये माझी एक मैत्रीण भलतीच बिन्धास्त होती /आहे. जुजबी ओळखीवर लिफ्ट वगैरे घ्यायलाही कचरायची नाही. पण ती काही वन नाईट स्टँडवाली नव्हती. तिच्या विषयी पण मी अनेकदा अशी शेरेबाजी ऐकायचो, शक्य असेल तेथे करेक्शन, जमेल तसे करायचो.) मात्र त्या नंतर ममोने फोनाफोनी करून चांगले काम केले असे वाटले. पण तरीही उद्या ती मुलगी परत दुसर्‍या ठिकाणी असे करणार नाही हे कशावरून? म्हणजे ममोने केलेली मेहनत वायाच म्हणावी का? योग्य ते समुपदेशन (शुद्धीत असतांना देणे) हा सर्वात चांगला उपाय वाटतो.

In reply to by निनाद

मात्र पहिल्या प्रसंगात ती मुलगी वन नाईट स्टँडवाली आहे हे लेखकाने कसे ठरवले हे मात्र कळले नाही.
यासाठीच आम्ही धागाकर्त्यांना प्रसंग खुलवण्याची विनंती केली होती.
पण तरीही उद्या ती मुलगी परत दुसर्‍या ठिकाणी असे करणार नाही हे कशावरून? म्हणजे ममोने केलेली मेहनत वायाच म्हणावी का?
म्हणजे ?? समाज वेश्या ठरवेल म्हणून एखाद्या मुलीस प्रदर्शनकारी कपडे घालून दारु-सिगरेट प्यायचे स्वातंत्र्य नाही असे म्हणणे आहे का आपले ?

In reply to by शाहरुख

समाज वेश्या ठरवेल म्हणून एखाद्या मुलीस प्रदर्शनकारी कपडे घालून दारु-सिगरेट प्यायचे स्वातंत्र्य नाही असे म्हणणे आहे का आपले ?
अजिबात नाही. पण काही वैयक्तिक सिक्युरिटीबाबत आपण सर्वच जागरूक असतो. ती जागरुकता त्या तरुणी कडे नसावी असा अर्थ असू शकतो. म्हणून ती जागरुकता येण्यासाठी समुपदेशन आवश्यक. सिगारेट दारू हा तीचा 'काहीसा' वैयक्तिक प्रश्न आहे. समाज काय म्हणेल म्हणून ती मुलगी कशाची फिकीर करत असेल असे सद्य दिलेल्या वर्णनावरून तरी वाटत नाही.

In reply to by निनाद

सर्व मुद्यांशी सहमत आहे. ज्या देशात स्त्री-पुरुष जननगुणोत्तर इतके खालावलेले आहे त्या देशात एका रात्रीच्या संगाकरीता एखादी सुंदर स्त्री एवढी 'डेस्परेट' होणे शक्य नाही. ममोंनी 'सिग्नल्स' चुकीचे वाचले असण्याची शक्यताच जास्त आहे. बाकी अजूनही आपल्या देशात (पिण्याला एवढी सामाजिक प्रतिष्ठा लाभली असताना) मुलींनी पिऊन लास होण्याचा एवढा गाजावाजा होतो हे वाचून आश्चर्य वाटले.

In reply to by नगरीनिरंजन

ज्या देशात स्त्री-पुरुष जननगुणोत्तर इतके खालावलेले आहे त्या देशात एका रात्रीच्या संगाकरीता एखादी सुंदर स्त्री एवढी 'डेस्परेट' होणे शक्य नाही
आपण ममोजींना अंडर-एस्टिमेट करत आहात :) आणि ती मुलगी संगापेक्षा पैशासाठी डेस्परेट असावी असे म्हणणे असावे. आज काम करायची इच्छा नाहीय !

In reply to by शाहरुख

>>आपण ममोजींना अंडर-एस्टिमेट करत आहात ही शक्यता माझ्या लक्षात आली नाही. क्षमस्व ममोजी. ममो म्हणजे मराठमोळा असेच मी समजत होतो, ते मदनमोहन पण आहेत हे माहिती नव्हते ;-) >>आणि ती मुलगी संगापेक्षा पैशासाठी डेस्परेट असावी असे म्हणणे असावे हायला, मग तिला वन नाईट स्टँडवाली म्हणायचे की प्रॉस्टिट्यूट म्हणायचे? आणि तिला फक्त पैशाची गरज असती तर ममोजींनी तिला नक्कीच मदत केली असती. हो की नाही ममोजी?

In reply to by नगरीनिरंजन

हायला, मग तिला वन नाईट स्टँडवाली म्हणायचे की प्रॉस्टिट्यूट म्हणायचे?
अर्रर्रर्र्..गल्लत झाली (का हिच ती पुरुषी मानसिकता ?) शब्द मागे घेऊ इच्छितो :)

In reply to by शाहरुख

>>आपण ममोजींना अंडर-एस्टिमेट करत आहात. आणि ती मुलगी संगापेक्षा पैशासाठी डेस्परेट असावी असे म्हणणे असावे. म्हणजे ते ममोंना नक्की कुठल्या दृष्टीने अंडर-एस्टिमेट करीत आहेत असे तुम्हाला वाटते? पैशाच्या की ...... हर हर, काय दिवस आलेत ममोवर !!!!

दारु/ सिगरेट प्यायल्याने स्त्री पुरुष समानता होते हे मानणे म्हणजे मूर्खपणा आहे....अर्थात तसे स्वातंत्र्य मिळणे हि एक समानताच झाली... बाकी झेपेल तेवढीच घ्यावी!!! पुरुष असो का स्त्री...काय म्हणता?

धागाप्रवर्तक तसेच प्रतिसादकांशी बर्‍याच प्रमाणात सहमत आहे. कुठे कुठे असहमती असावी असे वाटले, पण नक्की वाटत नाहीए. तोवर सहमती आहे. - ( ) ध.

हम्म्म, तर हा धागा वर आणण्यासाठी आणि शतक गाठण्यासाठी केलेला एक क्षीण प्रयत्न आहे असे समजा.. ;) बरेचसे गमतीदार प्रतिसाद वाचल्यानंतर मिपावर अजून खमंगपणा आहे याची जाणीव झाली.. असो, तर रिक्शा मधला प्रसंग - मला रिक्शा मिळाली, तिला नाही.. इथपर्यंतचा प्रवास सर्वांना माहित आहेच... पुढे.. ती: So you work somewhere? मी: yes I work for an MNC. शांतता........ ती: Are you gonna shop something at InOrbit? If so I need some help for shopping. (मी मॉल चे नाव सांगून नेहमी रिक्शा पकडतो, कारण एक सिग्नल आधी माझे गेस्ट हाऊस आहे. ) मी: Not really पुन्हा शांतता........... ती: I am "dash dash" I am a law student.. trainee at "Dash Dash" मी: OK. ती: &&%^$%#&)&^(&%*^$$*&^*^(&%*^$*&^(*^(&%*^$#^%#%^&)(*)*(R%$W#@#%^&{&^%W@#$^%&^*(*(*&%^$#Q@W#$*&() मी: अरे भाइ आगेवाले सिग्नल पे लेफ्ट मे रोकना. (इथे सगळे भय्ये, मराठी येतं कुणाला मुंबईत? कदाचित मराठी लोकांना पण नाही. ;) ) असो, ती: Are you gonna get down here? मी: Yes. Do you want me to continue? ती: yeah, maybe, we can have a nice evening together.. (ओठ चावत) मी रिक्शातुन उतरलो, निम्मे पैसे दिले, आणि बाय म्हंटल. ती: Are you sure? मी माझी सिगारेट सुलगावली. आणि पुढे निघालो. ================================ पुढचा प्रसंग.. तसा सोपा आहे समजायला, पण काही जणांनी ती तरुणी चांगल्या घरातील आहे की नाही असा संशय का आला अशी शंका घेतली आहे, त्याचे उत्तर - शंका, संशय आणि गुन्हा सारखेच, पुराव्याशिवाय समाधान नाही. कदाचित ती पहिली चुक असू शकते, एव्हाना तुमच्या आमच्या सारखीच, (कुणाला संशय ;) अस्ल्यास व्यनी करावा, पुरावे दिले जातील.) ================================ आता शिर्षक आणि मायना काही बोलायची गरज आहे का? घासकडवी गुर्जींना आणी निनाद यांना कळाले डिस्क्लेमर का टाकले आहे ते. फक्त म्हणण्याने घडेल का ही समानता? पुरुष आणि स्त्री यांत एक मुलभुत फरक आहे, तो सगळ्यांनी निसर्गाप्रमाणे मान्य करायला नको का? ;) असो, बरंच काही लिहायचं आहे, पण आमचा कॉल संपला आताच.. तेव्हा, पुढील चर्चेस वेळ मिळेल तेव्हा. :) तुम्हा सर्वांचे प्रतिसाद साभार..

मी: अरे भाइ आगेवाले सिग्नल पे लेफ्ट मे रोकना. (इथे सगळे भय्ये, मराठी येतं कुणाला मुंबईत? कदाचित मराठी लोकांना पण नाही. ;) ) असो, ती: Are you gonna get down here? मी: Yes. Do you want me to continue? ती: yeah, maybe, we can have a nice evening together.. (ओठ चावत) मी रिक्शातुन उतरलो, निम्मे पैसे दिले, आणि बाय म्हंटल. ती: Are you sure? मी माझी सिगारेट सुलगावली. आणि पुढे निघालो. ================================ पुढचा प्रसंग.. तसा सोपा आहे समजायला, पण काही जणांनी ती तरुणी चांगल्या घरातील आहे की नाही असा संशय का आला अशी शंका घेतली आहे, त्याचे उत्तर - शंका, संशय आणि गुन्हा सारखेच, पुराव्याशिवाय समाधान नाही. कदाचित ती पहिली चुक असू शकते, एव्हाना तुमच्या आमच्या सारखीच, (कुणाला संशय ;) अस्ल्यास व्यनी करावा, पुरावे दिले जातील.) ================================ आता शिर्षक आणि मायना काही बोलायची गरज आहे का? घासकडवी गुर्जींना आणी निनाद यांना कळाले डिस्क्लेमर का टाकले आहे ते. फक्त म्हणण्याने घडेल का ही समानता? पुरुष आणि स्त्री यांत एक मुलभुत फरक आहे, तो सगळ्यांनी निसर्गाप्रमाणे मान्य करायला नको का? ;) असो, बरंच काही लिहायचं आहे, पण आमचा कॉल संपला आताच.. तेव्हा, पुढील चर्चेस वेळ मिळेल तेव्हा. :) तुम्हा सर्वांचे प्रतिसाद साभार..

In reply to by मराठमोळा

>>ती: yeah, maybe, we can have a nice evening together.. (ओठ चावत) सिल्क स्मिता आठवली. तू त्या मुलीला बोललास की काय, नुकताच चेन्नई ला जाऊन आला आहेस ते ?

चोता दोन सारख्या हायली कॉस्टेड प्रतिसादकांना प्रतिबंध म्हणून कदाचित प्रतिसादांच्या ओळींच्या संख्येला बंधन घातले गेले आहे, दोन वेगवेगळ्या प्रतिसादात पुर्ण प्रतिसाद दिला गेला आहे याची नोंद घ्यावी. ;)

पूर्वी बी पी ओ मध्ये कामाला होतो तेव्हा प्रत्येक विकांताला कुठल्या ना कुठल्या लौंज किंवा पब मध्ये पार्ट्या असायच्याच, तेव्हा आमच्या बरोबर असलेल्या पोरींना (पिऊन आउट झालेल्या) उचलून आणावं लागायचं आणि त्यांच्या घरी सोडावं लागायचं, कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न ? पण त्या मुली स्वताच्या सुरक्षिततेची पण काळजी घ्यायच्या नाहीत याचं वाईट वाटायचं. (त्यातली एक पण मुलगी मराठी नव्हती हि एकच समाधानाची बाब)