Skip to main content

भ्रष्टाचार आणि सामान्य व्यक्ती. काय धोरण असावे?

लेखक प्यारे१ यांनी बुधवार, 08/06/2011 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणेच बुचकळ्यात पडलोय. (थोडक्यात अ‍ॅज युज्वल कन्फुझ्ड) भ्रष्टाचारावर चाललेली/ल्या चर्चांना ऊत आलाय. नेहमीप्रमाणे कुणाला विरोध करण्याचा हक्क आहे, नाही, कोण काळा पैसा जनरेट करतो, कोण त्यात कसा सहभागी आहे, अमुक तमुक इ.इ.इ. मुद्दा असा आहे : माझ्या मते मी भ्रष्टाचार करत नाही, लाच घेत नाही. थोडे स्पष्टीकरण : मी माझ्या नोकरीमध्ये अशा ठिकाणी आता आहे की लोक मला किंवा मी लोकांना त्यांचे काम करण्यासाठी, काम झटपट करण्यासाठी, कामाची रक्कम वाढवण्यासाठी, झालेले/ दाखवलेले काम जास्त खोलात न शिरता करण्यासाठी पैसे, भेटवस्तू देऊ शकतात अथवा मी मागू शकतो.

आला पावसाळा

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 08/06/2011 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
केंजळगडाच्या माथ्यावर धुकं धुकं. रोहिड्यावर दाटलेले ढग चिंब कोथळीगड तरारलेली खाचरं ब्रह्मगिरीवरच्या कोसळत्या जलधारा

छोट्याशा बेटावरची केंदशासित नगरी --- दमण ..

लेखक सुनिल पाटकर यांनी मंगळवार, 07/06/2011 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
दमणला जाण्याचा योग अचानक येईल असे वाटले नव्हते.आमच्या पर्यटनस्थळांच्या यादीत दमणचा क्रमांक उशिरा होता.परंतु २८ आणि २९ मे २०११ ला मी व माझी पत्नी वर्षा दमणची पर्यटन यात्रा करून आलो.२८ तारखेला सकाळी १० वा वापी रेल्वेस्थानकावर पोहचलो आणि टँक्सी स्टँड्वर दमण....दमण....असा ओरडा कानावर पडला.वापी ते दमण शेअर टँक्सी सर्व्हिस आहे .त्यांमुळे दमणला जाण्याची काळजी नव्हती. रेल्वेस्थानकाच्या जवळच कचोरी खाल्ली आणि थेट टँक्सीत बसलो.वापीत उन्हाळा जाणवत होता परंतु दमणला त्या तुलनेत जरा बरे वाटत होते.

रवा लाडू---

लेखक निवेदिता-ताई यांनी मंगळवार, 07/06/2011 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- दोन वाट्या जाड रवा, दोन वाट्या साखर, एक वाटी साजुक तुप, एक टे.स्पुन वेलदोडा पुड, बेदाणे थोडे. कॄती- प्रथम साजुक तुपावर रवा खमंग भाजुन घ्यावा, अगदी घरभर खमंग वास पसरला पाहिजे,आता तो थोडावेळ बाजूला ठेवा. मग पाक करण्याची तयारी करा. एका पातेल्यात साखर घाला, ती बुडेल इतपतच पाणी घाला, पाक करण्यास ठेवा..एकतारी पाक झाला की त्यात भाजलेला रवा घाला,एक्त्र ढवळा नीट.

प्रवाही

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 07/06/2011 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
तिची कापरापरी दृष्टभेट घडते द्विधा पाडसांच्या मनी स्पष्ट होते मनांची व्यथा सांगते ही कथा हास्य ओठांतले लपवुनी नाहि लपते लपंडाव हा पोरका जीवघेणा कळी काजळातून ओथंबते उधाणून येते नि माया दुधारी पापणीतळी स्वप्न ओसांडते इथे अन तिथेही रमल पाशतंतू दूरस्थ दोघे दिशांना परंतू जिथे मेघवारा तिथे साद संकल्प अढळ ध्रूव दोन्ही सदाही प्रवाही ...........................अज्ञात
काव्यरस

चिंब

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 07/06/2011 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
रानमाळी पावसाळी चिंब ओली पाकळी झाडपानी निथळणार्‍या चाहुलींच्या थेंबओळी मृत्तिकेच्या गर्भदेही अत्तरे घनबावळी रोमरोमांचा फुलोरा रासक्रीडा सावळी आडमेघांपलिकडे आतूर किरणे कोवळी सावलीच्या पाउली उमले कळी कळि वेगळी ओघळे मन ओघळांवर श्वास भरती पोकळी बंड काळिजपाखरांना पापणीकड मोकळी रम्य निर्मळ स्फटिकधारा जात त्यांची सोवळी स्पर्श होताक्षण धरेचा अर्घ्यमुद्रा ओवळी वाहतांना नांदती काठावरी स्वप्नावळी जीवनी ही सृजनतेची एक मोठी साखळी ...........................अज्ञात
काव्यरस

विदेही

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 07/06/2011 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
रात्र काळी पावसाळी भावना उमलून येई चक्षुरंध्रांपटलपाठी यातना अस्वस्थ कांही थेंब पोटी वलयं मोठी काठ त्यांना ज्ञात नाही तुंबलेले हो प्रवाही ना दिशा ना गोत त्यां ही गुंतले रेशीमधागे गाठ पण पडलीच ना ही स्पर्श हळवेला दंवाचा कमळदळ निर्लिप्त राही स्थान परि त्यांचे जळातच श्वास श्वासांतून वाही व्यापलेले अर्थ सोबत याच देही पण विदेही.. !! .....................अज्ञात
काव्यरस

ट्रॅफिक जॅम मध्ये फसले असल्या सारखे आपल्याला वाटते का कधी.

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 07/06/2011 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
पुढे सरकत रहा पुण्याच्या पीएमटी बस मध्ये जेव्हा मी प्रवास करतो तेव्हा खिडकीवर जागे जागेवर लिहिलेल्या एका सूचनेकडे माझे लक्ष वेधले जाते. ‘पुढे सरकत राहा’ अशी सूचना दोन्ही कडच्या बाकांमध्ये उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लिहिलेली असते. ही सूचना मागच्या दारातून येणाऱ्या प्रवाशांना उभे राहायला जागा मिळावी व, पुढच्या दारातून उतरणाऱ्या प्रवाशांना उतरण्याची सुविधा व्हावी अशा साठी असते. ह्या एका वाक्याने माझ्या विचारांची गाडी बस सुरू होण्या अगोदरच सुरू होते. आपल्या आयुष्या साठी हे वाक्य किती सूचक आहे.

थोडा टीपी

लेखक मीमाको यांनी मंगळवार, 07/06/2011 15:15 या दिवशी प्रकाशित केले.

फावल्या वेळेत काढलेली काही रेखाचित्रे