नेहमीप्रमाणेच बुचकळ्यात पडलोय. (थोडक्यात अॅज युज्वल कन्फुझ्ड)
भ्रष्टाचारावर चाललेली/ल्या चर्चांना ऊत आलाय. नेहमीप्रमाणे कुणाला विरोध करण्याचा हक्क आहे, नाही, कोण काळा पैसा जनरेट करतो, कोण त्यात कसा सहभागी आहे, अमुक तमुक इ.इ.इ.
मुद्दा असा आहे :
माझ्या मते मी भ्रष्टाचार करत नाही, लाच घेत नाही.
थोडे स्पष्टीकरण : मी माझ्या नोकरीमध्ये अशा ठिकाणी आता आहे की लोक मला किंवा मी लोकांना त्यांचे काम करण्यासाठी, काम झटपट करण्यासाठी, कामाची रक्कम वाढवण्यासाठी, झालेले/ दाखवलेले काम जास्त खोलात न शिरता करण्यासाठी पैसे, भेटवस्तू देऊ शकतात अथवा मी मागू शकतो. अर्थात मी स्वतः कुणाला मागायच्या भानगडीत पडत नाही, लोकांनी आडून अथवा थेट विचारले तरी त्याचं योग्य प्रकारे उत्तर देऊन अशा गोष्टी टाळतो. क्वचित एखाद्या व्यक्तिबरोबर जवळचे/ मैत्रीचे संबंध झाले असतील त्यांच्याबरोबर जेवण वगैरे होते ;) मात्र त्याला आधी/ नंतर स्वखर्चाने माझ्यातर्फे त्याचप्रकारे जेवण वगैरे होते. ( घेतल्यापेक्षा दिलेली रक्कम जास्त)
लाच द्यायला माझी ना नाही (कॅल्क्युलेटेड आणि काही अटींवर) :
काही वर्षापूर्वी मी याच जागी टेबलाच्या विरुद्ध /दुसर्या बाजूला काम करत होतो. तिथे माझ्या झालेल्या कामाचे बिल लवकरात लवकर पास व्हावे म्हणून मी समोर काम करणार्या व्यक्तिला/ व्यक्तिंना सर्व प्रकारे नाही तरी बव्हंशी खूष ठेवण्याचा प्रयत्न करत होतो आणि माझी रक्कम लवकरात लवकर कशी हाती येईल याचा विचार करत होतो. ती /त्या व्यक्ती याला आक्षेप घेत नव्हत्या. माझे काम लवकर होत होते.
अर्थात आजही मी कुणी मला काही देण्याचा प्रयत्न करत असला अथवा नसला तरी एखाद्याचे काम मुददाम अडकवणे, लटकवणे असे प्रकार करत नाही.
इतर बाबतीतही माझे वैयक्तिक काम देखील लवकर पूर्ण व्हावे म्हणून थोडाफार खर्च करण्याची माझी कॅल्क्युलेटेड तयारी (वेळ, पैसा, शक्ती जास्त कुठे वाचू शकेल) असते.
मी करतोय ते बरोबर करतोय असे मला वाटते. आपले काय मत आहे?
डिस्क्लेमरः लाच द्यायला होकार आहे असे मी फक्त म्हणतोय.
(लाच देणेसुद्धा गुन्हा आहे ना! ;) )
वाचने
7805
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
फार उत्तम चर्चाविषय घेतला आहे.
मी काळा पैसा म्हणजे केवळ
क्रेडिटकार्डने पेमेंट
In reply to मी काळा पैसा म्हणजे केवळ by मृत्युन्जय
क्रेडिट कार्ड
In reply to मी काळा पैसा म्हणजे केवळ by मृत्युन्जय
पण
In reply to क्रेडिट कार्ड by सुनील
कॉम्र्पोमाईज
In reply to पण by गवि
बरं..
In reply to कॉम्र्पोमाईज by Nile
ज्याच्या कडे कौशल्य, कर्तब,
एक उदाहरण
पैसाताई.. माझंही अगदी तंतोतंत
In reply to एक उदाहरण by पैसा
दिल कि बात
In reply to पैसाताई.. माझंही अगदी तंतोतंत by गवि
कदाचित..
In reply to दिल कि बात by अत्रुप्त आत्मा
आपल्यावर अजिबात नाही...
In reply to कदाचित.. by गवि
गगनविहारी साहेब
In reply to पैसाताई.. माझंही अगदी तंतोतंत by गवि
ब-याचदा श्रीमंत माणूस लाच
In reply to गगनविहारी साहेब by रणजित चितळे
गवि सध्या काय टंचनिका टंकनिका
In reply to ब-याचदा श्रीमंत माणूस लाच by गवि
टंचनिकाटंकनिका वैग्रे ठेवली आहेत का काय ? ;)नाय रे..
In reply to गवि सध्या काय टंचनिका टंकनिका by परिकथेतील राजकुमार
ह्या वयात काय करायची आहे
In reply to नाय रे.. by गवि
गगनविहारी साहेब
In reply to ब-याचदा श्रीमंत माणूस लाच by गवि
या क्षेत्रात टेबलच्या दोन्ही
मुळीच पटला नाही
In reply to या क्षेत्रात टेबलच्या दोन्ही by ५० फक्त
अँ ?
In reply to या क्षेत्रात टेबलच्या दोन्ही by ५० फक्त
जेंव्हा मला घरातला संगणक
लाच मागायची पद्धत "वरुन" सुरु
हो जसे
In reply to लाच मागायची पद्धत "वरुन" सुरु by विनायक बेलापुरे
हे तर्कशास्त्र अजिबात पटले
In reply to लाच मागायची पद्धत "वरुन" सुरु by विनायक बेलापुरे
मुळीच नाही
In reply to हे तर्कशास्त्र अजिबात पटले by विश्वनाथ मेहेंदळे
+१
In reply to हे तर्कशास्त्र अजिबात पटले by विश्वनाथ मेहेंदळे
यथा राजा तथा प्रजा
In reply to हे तर्कशास्त्र अजिबात पटले by विश्वनाथ मेहेंदळे
बाकीचे/ वरचे लोक खातात म्हणून
बरोब्बर. पटण्यासारखे मुद्दे
In reply to बाकीचे/ वरचे लोक खातात म्हणून by प्यारे१
बरोब्बर x १००