वेदातील तेहेतीस देवांवरून कल्पलेली " तेहेतीस कोटी " ही संख्या सोडून दिली तरी देव किती हा एक मजेदार प्रश्न शिल्लक रहातोच. मोजमाप करावयाच्या दृष्टीने त्यांची वर्गवारी करवयाचा प्रयत्न करू.
(१) वैदिक देवता : मरुत, इंद्र, वरुण, अग्नी,उषा, सूर्य,सोम, इत्यादी.( विष्णु ही एक तृतीय श्रेणीतील देवताही होती.) यांपैली कॊणाचीही पूजा आज केली जात नाही.
(२) पौराणिक देवता : पौराणिक काळात वैदिक देवता मागे पडून विष्णु, शंकर,देवी, गणपती, स्कंद या देवता पुढे आल्या.
(३) ग्रामदेवता व कुलदेवता : गावाचे रक्षण करणार्या देवता (बहुतांशी स्त्रीदेवता) उदा.