स्टॅनली का डब्बा
खूप दिवस पाहायचा पाहायचा म्हणून हा पिक्चर पाहायचा राहूनच गेला होता. अलग वेळ देणं होत नसेल तर मी सिनेमे दहा-पंधरा मिनिटांच्या तुकड्यांत बघते. माझ्या या तंत्राला चांगले सिनेमे मात्र दाद देत नाहीत. ते एकाच बैठकीत कधी पाहायला भाग पाडतात हे कळतही नाही. बर्याच दिवसांनी असा पिक्चर पाहण्याचा योग आला.
डिस्क्लेमर: लेखावरून बरीचशी कथा कळतेय. ज्यांना असा रसभंग व्हायला नकोय त्यांनी इथंच थांबावं.जंगल ! चित्रे मुद्दाम मोठी टाकली आहेत. लोड व्हायला वेळ लागेल.. But it's worth it....
राकेशचा माझ्या सेलवर निरोप आला की रात्री ९.३० वाजता जंगलाच्या सफरीवर निघू. होकार कळवून आम्ही जेवायची गडबड उरकून तयार झालो. आम्ही चौघे माझ्या गाडीत आणि बाबा व त्याचा मित्र त्यांच्या मोटरसायकलवर असे निघालो. माझ्या शेजारी राकेश हातात मोठा टॉर्च घेऊन खिडकीतून बाहेर झाडांवर काही दिसते आहे का ते बारिक नजरेने बघत होता. चालत्या गाडीतून याला असे काय दिसणार असे म्हणून मी मनात हसलो आणि गाडीचा वेग खूपच कमी केला. पण बेट्याची नजर भलतीच तयार होती हे थोड्याच वेळात माझ्या लक्षात आले. थोड्याच वेळात राकेशने गाडी थांबावायला सांगितली आणि आम्ही खाली उतरलो.
(पाव्हनं चला, झाडावरती बसू !)
वेताळणीनं वेताळाला सांगितली गोष्ट अन मग आमीबी म्हनलं जरा गुलुगुल बोलूयात पावन्यासंगं..... ;)
वाद असे बहरात वाचका, तुम्ही नका ना रुसू
पाव्हनं चला, झाडावरती बसू !
बघा थेरडा मेला 'घोडा'
शिव्या हासडून मारा जोडा
लाज संस्कृती सारी सोडा
उगा वाटतं खूप लिहावं
नकाच काही पुसू
पाव्हनं चला, झाडावरती बसू !
काढिल खोडी नव्या दमाच्या
पुचाट गप्पा स्वातंत्र्याच्या
स्टोरी सांगिल वेताळाची
जरा मोकळ्या ह्या जालावर
खविस नागरी हसू
पाव्हनं चला, झाडावरती बसू !
तीन गटांची थेरी मांडा
जुन्या दुव्यांची घेउन खांदा
हलक्या हाताने काड्या घाला
अता खातरी ही शतकाची
पब्लिक लागं फसू
पाव्हनं चला, झाडावरती बसू !
-केसुरंगा
काव्यरस
अस्वस्थ दशकाची डायरी - आपले मत?
काहीतरी 'ध्येयवर्धक' वाचावे म्हणुन मराठी पुस्तक शोधत होतो,घरात तसे काही सापडले नाही.नववीत की दहावीत असताना वाचलेला एक धडा आठवला,फार आवडलेला,तो ह्या कादंबरीमधला होता म्हणुन ही विकत घ्यायचा विचार आहे.
http://majesticprakashan.com/?q=node/703
३०० रुपये वाया जाउ नयेत म्हणुन हा लेख लिहतोय.
आपणापैकी कुणी वाचली आहे का? वाचली असेल तर आपले मत काय? काही परीचय देउ शकाल का?
'ध्येयवर्धक' आहे का?
वड बोलला यमाला
वटपूजेनिमित्त आमच्या वडाच्या भावना व्यक्त करायचा हा प्रयत्न!
वड बोलला यमाला, "हा काय जाच आहे?
बांधून घ्यायला का मी एकटाच आहे?
पूजा इथे करावी, त्रागा घरी करावा
नवर्यास त्या म्हणावे, "तू बावळाच आहे!"
हा जन्म 'जी हुजूरी' करण्यात घालवी जो,
ऐसा गुलाम साती जन्मी हवाच आहे?
आंबे, फळे, सुपार्या अन् दक्षिणा भटाला,
दोरेच फक्त माझे? ही शुद्ध लाच आहे!
वैविध्य पाहु दे ना दोन्ही गटांस आता
सांगेन जन्म त्यांचा हा सातवाच आहे!"
काव्यरस
साहित्याशी जवळिक साधत -
साहित्याशी जवळिक साधत खुशाल हा बसणार ,
गोड बोलुनी सर्वांशी हा साहित्यातच रमणार !
भविष्यवाणी सांगुन गेले जाणते कुणी स्वर्गाला
भविष्यवाणी खोटी नव्हती , सांगतोच मी तुम्हाला !
बालपणीचा काळ सुखाचा - म्हटले आहे कुणीतरी
वह्या नि पुस्तक हाती पडता, चीरफाड मी नित्य करी ;
शैशवात मी वह्यांत लपवी - आठवणींची मोरपिसे ,
फूल सखीच्या गज-यामधले पुस्तकातुनी दडवितसे !
कविता, कादंबरी नि नाटक यांचा नव्हता गंध मला
दैनिक मासिक पुस्तक साहित्याची आवड तरी मला !
साहित्याशी सलगी करणे मजला खूपच आवडले,
'वजनदार साहित्य' मलाही रद्दीत घेणे परवडले !
दीड-दान्डीचे मोल मला; ते नसेल काही इतरांना -
हर्ष होतसे मलाच , माझा
काव्यरस
एका कथेची गोष्टं ------- लघुकथा -------- जयनीत दीक्षित
ते एका नवीन, एकदम ओरीजीनल कथेच्या शोधात होते.
लेखकाने त्यांना एक नवीन कथा दाखवली.
नाही हो मी ज्याच्या शोधात होतो ते हे नाही. तिकडे बघा कशा कथा लिहील्या जातात, एकसे एक! त्यांना
म्हणतात ओरीजीनल! आपल्या कडल्या एकाही कथेला त्याची सर नाही. गेली कित्येक वर्षे वाट बघतोय
अशी एखादी तरी कथा हाताळायला मिळावी म्हणून, पण आपल्या देशात कधी तशा कथा जन्माला येतील कुणास ठाउक?
लेखकाने त्यांना दूसरी कथा दाखवली.
नाही! थोड़ी चीनी कम वाटतेय.
लेखकाने त्यांना तीसरी कथा दाखवली.
नाही हो ह्यात मसाला नाही. पब्लिकला माल मसाला लागतोच हो. समजताय ना मी काय म्हणतो आहे ते?.
लेखकाने त्यांना अजून एक कथा दाखवली.
उं हूं!
पाऊस
काळ्याभोर मेघांची नभात दाटी असावी
तुझ्या डोळ्यात मी भिजावे अन् तू माझ्या नसानसात भिनावी
गडगडते ढग तुटून एकच सर अशी बरसावी
त्यांनी माझ्या मनाची दशकांची तहान शांतवावी
माझ्या देहाच्या वृक्षावरील अवघी पाने चिंब होऊन ओघळावी
त्याच वृक्षाला लिपटलेल्या लाजाळूप्रमाणे तू मोहरून मिटावी
कृष्णरंगी मेघांमागून सूर्याने सप्तरंगी किरणांची जाळी पसरवावी
सांजेमागून येणारी अवनीही त्यावर लुब्ध होऊन थबकावी
आता जरा पाऊस रिमझिम व्हावा अन् कडाडती विजही थकावी
तुझे हात माझ्या हातात असावे अन् नजरेत नजर गुंतावी
रिमझिम झालेल्या पावसात चिंब होऊन तू गोडगोड व्हावी
माझ्या उबदार मिठीत येताच हलके हलके विरघळाव
काव्यरस
देशभक्ती रचना: तिरंगी आमचा भारतीय झेंडा
देशभक्ती रचना: तिरंगी आमचा भारतीय झेंडा
तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू
प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू ||धृ||
कित्येक लढले याच्यासाठी
कितीकांनी दिधले प्राण
याच्याचसाठी कितीकांनी
फासात घातली मान
देवासमान हा आम्हास
त्याचा मान आम्ही राखू ||१||
क्रांतीकारी अन समाजसेवक
हाती घेवून जातसे चालत
शत्रूच्याही उरात बसती
उंच पाहून याला धडकी
न राहू मागे आपण
चला बळ तिरंग्याचे आपण दावू ||२||
युद्ध जरी हो आज नसले
भय देशावरी रोजच कसले
दहशत घालती दहशतवादी
फुकाची करती वादावादी
झाला
काव्यरस
मिसळपाव