Skip to main content

सारं लुगड्यात गमावलं...!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 03/07/2011 05:55 या दिवशी प्रकाशित केले.
सारं लुगड्यात गमावलं... हे एक भन्नाट गाणं पूर्वी येऊन गेलं. ‘काय राव तुम्ही?’ या प्रश्नानंतर येणारी गंमत या गाण्यात आहे. संबंधित इसमाने धोतर विकण्याचा व्यवसाय (नमनालाच ‘धंदा’ हा शब्द मी वापरणार नाही!) सुरु केलेला असतो. त्यात त्याला खूप यश लाभलेले असते. मात्र एक देखण्या स्त्रीच्या म्हणण्यावरून तो लुगडी विकू लागतो आणि सर्व काही गमावून बसतो असा साधा, सरळ, सोपा आशय या शब्दांत आहे.

आजकालचे ग्रामीण चित्रपट

लेखक आशु जोग यांनी रविवार, 03/07/2011 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही वर्षापासून मराठीमधे अनेक ग्रामीण चित्रपट येऊ लागले आहेत मराठीतले काही ठराविक कलाकार तर दिवसेंदिवस ग्रामीण चा रतिब घालू लागले आहेत. हे सर्व चित्रपट पाहताना नेहमी प्रश्न पडतो ग्रामीण म्हणजे नेमके काय ? खटकणारी गोष्ट म्हणजे यातील कलाकारांचे ग्रामीण बोलणे जे त्यांना जमत नाही धोतर टोपी घातली किंवा नऊवारी लुगडं नेसलं की जमलं ग्रामीण असा एक भ्रम दिसतो या कलाकारांचा. आणि मग ग्रामीण म्हणून जी भाषा बोलली जाते त्यामधे आत्ता, आत्ता ग बया, कंच, वाइच, व्हय व्हय या शब्दांची नुसती भरमार होत राहते शिवाय ग्रामीण म्हणून एक विचित्र हेल काढून आणि अंमळ ओरडून हे कलाकार बोलतात तो सगळाच प्रकार ता

हानामी (花見) : साकुरा

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 02/07/2011 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
हानामी (花見) : साकुरा हानामी(花見), जपान मधे साधारण सातव्याशतकापासून चालू झालेली ही परंपरा आजही कसोशीने आणि हौसेने पाळाली जाते. हाना(花)म्हाणजे साकुरा(桜、चेरी)चे फूल आणि मी(見) म्हणजे पहाणॆ. साकुराचा आलेला बहर पहायला जाणे म्हणजे हानामी. ही झाली पुस्तकी व्याख्या, पण जपानी लोक़ांची खरी व्याख्या आहे, हानामी म्हणजे मौज मजा, जत्रा, कुटुंबकबिल्यासोबत - मित्रपरीवारासोबत जिवनाचा आनंद लुटण्याचा काळ. वसंत ऋतुच्या आगमानाची सुरुवात साकुराच्या बहराने होते.

टीव्हीतली दुनिया

लेखक प्रास यांनी शनिवार, 02/07/2011 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी, म्हणजे साधारण ऐंशीच्या दशकात कधीतरी टीव्हीवर मला एका नव्या दुनियेचा शोध लागला. टीव्हीतल्या डॉक नावाच्या एका सुतार काकांच्या घरात असलेल्या एका बिळात एक अनोखी दुनिया वसल्याचं मला समजलं जिचं नाव होतं "Fraggle Rock". तिथे राहत होते फ्रॅगल्स. डॉक काकांना फ्रॅगल्सचं अस्तित्त्व माहितच नव्हतं पण त्यांचा पाळीव कुत्रा स्प्रॉकेट सतत त्यांना ते सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न करायचा. या फ्रॅगल्स पैकी गोबो, मॉकी, रेड, बूबर आणि विम्ब्ली मला आमच्यापैकीच एक वाटायची. ते आनंदात गाणी म्हणायचे, दु:खात गाणी म्हणायचे, गोष्टीत गाणी म्हणायचे आणि शिकताना-शिकवतानाही गाणी म्हणायचे.

ते आहेत ना

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 02/07/2011 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
ते आहेत ना
मंगला ओक आपले अनुभव सांगताना – चंदननगरच्या डोळ्याच्या दवाखान्यात आई औषध घातल्याने डोळे मिटून होती, तेंव्हा मी आईला काही आठवणी सांगायला विनंती केली आणि मग आईच्या आठवणींचा खजिना उघडला. तो शब्दांकित...
ते आहेत ना येकंममरडी गावी कुलकर्णी म्हणून होते. त्यांच्या खेडेगावातील ते लहानसं देऊळ. पण फार जुनं. त्यांच्या पूर्वजांचं दोनशे-तीनशे वर्षांचं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते दत्ताचं जागृत देवस्थान होतं. लहानशीच मूर्ती होती. ते दरवर्षी तेथे दत्तजन्म करत असत. तिथे मी गेले.

कोकणस्थ (चित्तपावन/चित्पावन)

लेखक शरद यांनी शनिवार, 02/07/2011 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणस्थ (चित्तपावन/चित्पावन) इतिहास : कोकणस्थांचा १४ व्या शतकाच्या आधी कोकणात उल्लेख मिळत नाही. मग हे कोठून आले ? या बद्दल तीन मते आहेत. (१) हे बर्बर देशातून जलमार्गे कोकणांत आले. ह्या प्रदेशाचा उल्लेख जुन्या ग्रंथांत मिळतो. त्यातच यांचा व परशुरामाचा संबंधही सांगितला आहे. परशुरामाला समुद्र किनारी १४ शवे मिळाली. त्याने जिवंत करून त्यांची कोकणात स्थापना केली. शवे सोडा, आसन्नमरण माणसे मिळाली; त्यांची सुश्रुषा करून त्यांना वाचवले. मग त्यांना ब्राह्मणत्व दिले.म्हणून चित्तपावन परशुरामाचे भक्त. या मताप्रमाणे यांचा गोरा रंग,सरळ नाक वगैरेची व्यवस्था लावता येते.

मी असा जुगारी...

लेखक बन्या बापु यांनी शनिवार, 02/07/2011 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा खेळलो मी डाव तो जुगारी, कसे आवरू मी या मना विकारी ? झगडा तो जीवनाचा संपेल ना कधीही, पंख शोधेल कोण, मारेल कोण भरारी ? आहेत सगळे माझे, परके कोणी ना इथे, वार का त्यांचे लागले जिव्हारी ? श्वास संपले आता, खेळही संपला आता, कसे नाकारू सत्य हे विखारी. फासे फेकलेले, दान ते त्याचे, कसे जिंकेल कोणी जो तो इथे भिकारी ? येईन फिरून मीही एकदा असा कि, डाव सोडून जाईल नियती ही बिचारी..

अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट

लेखक इरसाल यांनी शुक्रवार, 01/07/2011 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
काही प्रतिष्ठित लोकाच्या समोर स्वतःच्या आईच्या थोबाडीत मारल्याचा बदला स्वतःचा जीव देवून चुकवावा लागला. ह्यासाठी आपल्याला मागे जावे लागेल.१९७५ ला लावण्यात आलेल्या आणीबाणीत आणि त्यानंतर निवडणुकीत हरल्याने पत्कराव्या लागणाऱ्या नामुष्कीमुळे ज्याची भूमिका अर्थात विवादास्पद होती त्याचा बळी जाणे हे काही तितकेसे मुश्कील नव्हते. ३० जून १९८० ला स्वतःच्या ऑफिस वरून विमान उडवून नेताना सफदरजंग विमानतळाच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकून विमान अपघात ग्रस्त झाले.ज्याच्या साठी फिल्डिंग लावली गेली होती त्यासकट सक्सेना नावाचा कॅप्टन फुकट बळी गेला. विशेष म्हणजे आईला मेलेल

इगतपुरीचा पाऊस

लेखक प्रकाश बाळ जोशी यांनी शुक्रवार, 01/07/2011 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
इगतपुरीचा पाउस म्हणजे धोधो कोसळणारा. पंधरा पंधरा दिवस सूर्याचे दर्शन घडू न देणारा. सर्वांगात मुरणारा पाउस. घाट चढून येणाऱ्या ढगांनी वेढलेल्या इगतपुरीत इतका मिट्ट काळोख कि कुणी डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. वार्‍यावर स्वार होऊन येणाऱ्या ढगांशी लपंडाव खेळण्यातली गम्मत काही न्यारीच आणि तासान तास न संपणारी. त्या इगतपुरीच्या पावसाचा आवेग , ती अंग भिजवणारी ओल, भिजलेलं रान आणि काळ्या कुट्ट ढगांच्या मध्येच डोकावणारे करड्या रंगाचे प्रकाश झोत पकडण्याचा एक प्रयत्न " इगतपुरी रेन्स" या पेंटिंग मध्ये केला आहे. बऱ्याच वर्षापूर्वी काढलेलं हे पेंटिंग आर्टीस्ट सेंटर इथे भरवलेल्या प्रदर्शनात लोकांपुढे आले आ