Skip to main content

मी असा जुगारी...

लेखक बन्या बापु यांनी शनिवार, 02/07/2011 08:03 या दिवशी प्रकाशित केले.

पुन्हा खेळलो मी डाव तो जुगारी, कसे आवरू मी या मना विकारी ?
झगडा तो जीवनाचा संपेल ना कधीही, पंख शोधेल कोण, मारेल कोण भरारी ?
आहेत सगळे माझे, परके कोणी ना इथे, वार का त्यांचे लागले जिव्हारी ?
श्वास संपले आता, खेळही संपला आता, कसे नाकारू सत्य हे विखारी.
फासे फेकलेले, दान ते त्याचे, कसे जिंकेल कोणी जो तो इथे भिकारी ?
येईन फिरून मीही एकदा असा कि, डाव सोडून जाईल नियती ही बिचारी..

लेखनविषय:

वाचने 1770
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आहेत सगळे माझे, परके कोणी ना इथे, वार का त्यांचे लागले जिव्हारी ?
श्वास संपले आता, खेळही संपला आता, कसे नाकारू सत्य हे विखारी.

खासच !
.
.
.
.
.
.
.
.

डाव मांडला कुणी,कुणी पसरली इथे पथारी,
दिसते माणूसकी कधी इथे?
प्रत्येकजणच इथे माणूसकीचा शिकारी.

ही अतिशयोक्ति असल्यास क्षमस्व