Skip to main content

चौकशी - लेख दिसत नाहीत

लेखक शुचि यांनी रविवार, 07/08/2011 05:27 या दिवशी प्रकाशित केले.
वाचनखूण साठवायची सोय झाली ही खूप आनंदाची बातमी आहे. जवळजवळ सगळे रामदासकाकांचे लेख , कविता मी साठविल्या आहेत. परत परत वाचण्याचा आनंद घेते आहे (पुनर्वाचन :) ). आणि आता मोर्चा अन्य सदस्यांच्या लेखाकडे वळवत आहे. पण यशोधराचे लेख अजिबात दिसत नाहीत. म्हणजे त्या पानावर फक्त लेखनविषय आणि लेखनप्रकार दिसतो आहे. असे का? कृपया नीलकांत किंवा संपादक यात लक्ष घालतील काय? हा चौकशीमात्र धागा काही काळानंतर उडविला तरी चालेल.

खेकड्याच सुकं (क्रॅब मसाला)

लेखक गणपा यांनी शनिवार, 06/08/2011 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण लागलाय पण आपण काय तो पाळत नाही. श्रावणात म्हावरं स्वस्त होतं अशी एक दंत कथा आहे. हल्ली म्हणे आपल्याकडे शाकाहार वाढु लागला आहे असं कुठल्याश्या एका सर्वेक्षण करण्यार्‍या कंपनीने शोध लावला. सगळ्या अफवा आहेत.... सालं जर हे खर असतं तर आज बाजार स्वस्त नसता झाला? मटण ३०० रु किलोवर पोहोचल असत? असो. सध्या भारतात नसल्याने त्याची प्रत्यक्ष झळ बसत नाहीये. त्यातच काल बाजारत खेकडे (स्वस्तात) मिळाल्यावर श्रावण वगैरे काही न पहाता अस्मादिकांनी ते लगेच घेतले. काल शुक्रवार होता. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठायचं नव्हत. त्यामुळे निवांत वेळ ही हाताशी होता, म्हणुन खेकड्याचे सुके करायचा बेत केला.

डिजिटल शब्दांच्या शोधात...

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 06/08/2011 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखात मला कॉम्प्युटर आणि मोबाईल साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन डिक्शनरी (इंग्रजी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते मराठी) बद्दल सर्वसमावेशक चर्चा (थोडक्यात खर्‍या अर्थाने काथ्याकूट) करायची आहे आणि त्याद्वारे सर्वांचाच फायदा होईल असा मला विश्वास आहे. तसे या विषयावर लिहिण्याचे कधीपासूनच मनात होते पण वेळही मिळत नव्हता.

ठिश्श...

लेखक अभिजीत राजवाडे यांनी शनिवार, 06/08/2011 03:58 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मिसळपाव वर हे पहिलेच प्रकाशचित्र आहे.

ऑन फायरींग अ सेल्स्मन - कविता

लेखक शुचि यांनी शनिवार, 06/08/2011 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
"ऑन फायरींग अ सेल्स्मन" या कवितेतील मध्यवर्ती पत्र एक वयस्क असा विक्रेता आहे, ज्याच्या जोम आणि उत्साहाला वयापरत्वे ओहोटी लागली आहे. रोज सकाळी तो लवकर उठतो, ट्रेन पकडायला धावतो, हसतमुख चेहेर्‍याने क्लायंटच्या गाठीभेटी घेतो. क्लायंटला त्याचे प्रॉडक्ट विकण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. ऊर फुटेस्तोवर धावतो पण अनेकदा तर नव्याने एम बी ए झालेला पोरसवदा सहकारीत्याचा क्लायंट त्याच्या डोळ्यादेखत पळवतो. त्याचे दिवस असे व्यस्त, व्यग्र आहेत तर त्याच्या संध्याकाळी अतिशय करड्या, निराशाजनक आहेत. तो येईयेइपर्यंत मुले झोपून गेलेली असतात, बयकोचे मूळातले कडू तोंड अधिकच वाकडे झालेले असते.

शीला का करप्शन

लेखक विकास यांनी शुक्रवार, 05/08/2011 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
आजच प्रकाशीत झालेल्या "काँप्ट्रोलर अँड ऑडीट जनरल" (कॅग) च्या अहवालाप्रमाणे सुरेश कलमाडींना राष्ट्रकूल स्पर्धांचे प्रमुख करण्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयास दोषी धरण्यात आले आहे. २००४ साली तत्कालीन क्रिडा मंत्री, कै. सुनील दत्त यांनी या संदर्भात लेखी विनंती करून कलमाडींना बाजूस ठेवायला सांगितले होते. तरी देखील दुर्लक्ष केले गेले. त्याव्यतिरीक्त दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षित यांना ३१ कोटी रुपयांच्या कंत्राटामधील गैरव्यवहारासंदर्भात दोष देण्यात आला आहे. थोडक्यात, "पोपट मेला नाही" असे म्हणायचे असेल म्हणून "करप्शन" केले असे म्हणलेले नसावे... आता टाईम्स मधील बातमी वाचताना दोन मुद्दे: १.