Skip to main content

एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ?

लेखक प्रियाली यांनी बुधवार, 24/08/2011 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी धनंजय यांनी एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ हा लेख मिपावर टाकला होता. त्या लेखावर नजर टाकली आणि थोडी आजूबाजूला फिरवली तर त्या लेखाचा उद्देश कळून येईल. हा लेख त्या लेखाचे विडंबन निश्चितच नाही पण त्या लेखाचे स्मरणरंजन म्हणता यावे. तर पुढे, "मी आलोच शेळीचे दूध पिऊन" किंवा "आज माझा उपास आहे" वगैरे खोचक वाक्ये मिपाची शान होते, गांधींच्या नावाची अ‍ॅलर्जी वगैरे असल्यासारखी काही माणसे वागत असत याला सर्व साक्षी आहेत.

मासे ३१) कोलंबी

लेखक जागु यांनी बुधवार, 24/08/2011 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
कोलंबी म्हणजे सगळ्यांच्याच परिचयाची. लहान मुलांसाठी तर अगदी आवडीचीच. कोलंबी आवडत नाही अशी मांसाहार करणार्‍या व्यक्तिमध्ये फार क्वचीत व्यक्ती आढळतील. कोलंबीमध्येही काही प्रकार असतात. लाल कोलंबी, पांढरी कोलंबी, करपाली नावाने ओळखल्या जाणार्‍या कोलंब्या. ह्या काळ्या रंगाच्या असतात.

Baked समोसा

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 24/08/2011 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः Frozen pastry sheets - १ पॅकेट बटाटे - ३-४ उकडुन मटार - १/२ कप जिरे - १/२चमचा हिरवी मिरची - १ बारीक चिरुन हळद - १ चमचा लाल तिखट - १ चमचा गरम मसाला - १/२ चमचा आमचुर पावडर - २ चमचे धने - १ चमचा बडिशेप - १/२ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर - २ चमचे अंडे - १ ओवा - १ चमचा बटर - १ चमचा मिठ चवीनुसार कृती: १. बटाटे उकडुन घेउन हाताने mash करावेत. २. Pastry sheets ह्या frozen असल्यामुळे, समोसे करण्याच्या १/२ तास आधी फ्रिजबाहेर काढुन ठेवावेत. ३. कढई गरम करुन त्यात आधी आख्खे धने व बडिशेप भाजुन घ्यावी. ह्याची खरबरीत अशी पुड करुन घ्यावी. ४.

(वारंवार मांडले जाणारे मुद्दे)

लेखक विकास यांनी बुधवार, 24/08/2011 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम एक खुलासा: धागा जरी विरंगुळा म्हणून काढलेला असला तरी मी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची टिंगल/थट्टा करण्याच्या उद्देशाने हे लिहीत नाही आहे. माझा अण्णांना, रामदेवबाबांना, अजून पुढे कोणी केले तर त्यांना देखील पाठींबा राहील. त्या सर्वांना माझा मनंपुर्वक सलाम! याचा अर्थ त्यांचे प्रत्येक म्हणणे मला पटते अशातला भाग नाही. पण अशा जागरीकरणाची आणि त्यासाठीच्या आंदोलनाची गरज आहे असे मात्र स्पष्ट वाटते... माझ्या लेखी कोणीही यातील कुठलाही कायदा मोडत नसून नागरीकाचे हक्क बजावत आहे.

संसाराची सप्तपदी मी -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 23/08/2011 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
संसाराची सप्तपदी मी धरून हाता तुझ्या चालले ; वाट बिकट - ना मजला कळले मुक्कामी मी कशी पोचले ! भाजलेल्या मी पोळीचा नकाशा कधी गोल नसे, कौतुकाची छान कशी रे त्याला दाद तुझीच असे ! उत्साहाने केलेली मी भाजी शिजलेलीच नसे- चेहऱ्यावरी भाव तरी तव आनंदी का खास दिसे ! अर्धाकच्चा पाणीदार तो खडेयुक्त जरि भात असे - मुखातुनी पण तुझ्या कशी ती ' वा वा ' ची तान वसे ! तुझ्या पावलावरी ठेवुनी पाऊल मी चालत आहे - अर्धांगी मी पूर्ण तरी गमक साथ रे तुझीच आहे !

अरुंधती रॉय होण्यापेक्षा मला अण्णा व्हायला का आवडेल?

लेखक इष्टुर फाकडा यांनी मंगळवार, 23/08/2011 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
हा दुवा देत आहे...कृपया जरूर वाचा. अरुंधती हि मला कायमच बौद्धिक दिवाळखोर वाटत आली आहे, पण तिच्याविरुद्ध इतकी मुद्देसूद टीका करणे आपल्याला जमायचे नाही. म्हणूनच जो हा लेख वाचनात आला तो देत आहे, आंग्ल भाषेत जरी असला तरी फारच व्यवस्थित लिहिला आहे. http://clearvisor.wordpress.com/2011/08/23/why-i%E2%80%99d-rather-be-an…

सणांचे नैवेद्य आणि फराळ ३) गोकुळ अष्टमी - तांदळाचे/कुरमुर्‍याचे/कुटयाचे लाडू

लेखक जागु यांनी मंगळवार, 23/08/2011 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
गोकुळ अष्ट्मिला हे लाडू नैवेद्य म्हणून दाखवण्याची प्रथा आहे. तांदूळ गुळ वेलची, जायफळ पुड ड्राय फ्रुट्स आवडीनुसार तुप मिठ थोड सुक खोबर किसुन भाजुन डिटेल प्रमाण पाककृतीत देत आहे. पाककृती: साधारण १ किलो किंवा आपल्या गरजेनुसार तांदुळ घेउन ते रात्री धुवुन पाणी व थोडे मिठ घालुन भिजत घाला.