(वारंवार मांडले जाणारे मुद्दे)
सर्वप्रथम एक खुलासा: धागा जरी विरंगुळा म्हणून काढलेला असला तरी मी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची टिंगल/थट्टा करण्याच्या उद्देशाने हे लिहीत नाही आहे. माझा अण्णांना, रामदेवबाबांना, अजून पुढे कोणी केले तर त्यांना देखील पाठींबा राहील. त्या सर्वांना माझा मनंपुर्वक सलाम! याचा अर्थ त्यांचे प्रत्येक म्हणणे मला पटते अशातला भाग नाही. पण अशा जागरीकरणाची आणि त्यासाठीच्या आंदोलनाची गरज आहे असे मात्र स्पष्ट वाटते... माझ्या लेखी कोणीही यातील कुठलाही कायदा मोडत नसून नागरीकाचे हक्क बजावत आहे. ज्यांच्यात ताकद आहे त्यांचे ऐकले जात आहे, ज्यांच्यात नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष, इतके सिंपल आहे! तेच इतर विषयांसाठी. कृपया व्यक्तीगत घेऊ नये. हलकेच घेणे. :-)
तर ह्या धाग्यामागची तात्कालीक प्रेरणा जरी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या चर्चा असल्या तरी ह्या धाग्याचा उपयोग इतर अनेक चर्चांसाठी होऊ शकतो. जरी हे मिपावर लिहीत असलो तरी ते उद्या इतर संस्थळांनाही लागू होऊ शकतेच! ;)
खाली काही वारंवार मांडले जाणारे मुद्दे मांडत आहे. केवळ सुरवात करत आहे. वाचकांनी त्यांना वाटत असलेल्या मुद्यांनी यात भर घालावी. कुठलाही विषय आणि लेखनप्रकार यात वर्ज्य नाही! हवे असल्यास त्या त्या संदर्भातील आपापल्या आवडीचे (लेखाचे/चर्चाप्रस्तावाचे/प्रतिसादाचे) दुवे देखील टाकावेत. म्हणजे सदस्य त्याच त्याच विषयांचे नवीन धागे काढायच्या ऐवजी तेथे जाऊन तीच तीच चर्चा करू शकतील! आणि नवीन कुठल्या विषयावर चर्चा करता येईल याची (होपफुली) प्रेरणा मिळेल. :-)
अण्णायन
- देशातील भ्रष्टाचार हाताबाहेर गेला असल्याने आंदोलनाला पर्याय नाही
- जनलोकपाल विधेयकाने संसदीय कार्यपद्धतीवर आक्रमण केले आहे.
- सरकारचे लोकपाल विधेयक म्हणजे तोंडाला पाने पुसणे आहे.
- अण्णा कृष्णाचा अवतार आहे
- अण्णांच्या मागे राहूल गांधी आहेत.
- अण्णांच्या मागे परकीय हात आहे. (परकीय हात - म्हणजे परकीय शक्ती, हात म्हणून काँग्रेस आणि जन्माने परदेशी म्हणून सोनीया गांधी नव्हेत!)
- अण्णांच्या मागचे साथीदारपण भ्रष्ट आहेत.
- अण्णांचे साथीदार हे आदर्श आहेत.
- अणांच्या मागे संघ आहे.
- अणांच्या विरोधात भाजपा आहे.
- अरूंधती रॉय पेक्षा अण्णा चांगले आहेत.
- ....
- युपिएची खरी सत्ता सोनीयाच्या हातात आहे.
- राहूल गांधींना काँग्रेस लवकरच पिएम करणार.
- भाजपात अंतर्गत लाथाळी आहे.
- मोदींना चांगले राज्यकर्ते म्हणणे हे फॅनॅटीकपणाचे लक्षण आहे.
- शिवसेना म्हणजे गुंडगिरी.
- राज ठाकर्यांना मराठी मनाची नस समजली आहे.
- कम्युनिस्ट हे देशद्रोही आहेत.
- अरूंधती रॉय ह्या साम्यवादी आहेत आणि तथाकथीत विचारवंत (अरूंधती) रॉयवादी!
- .....
- गांधीजींच्या राजकारणाने देशाचे नुकसान झाले.
- सावरकरांच्या विचाराने देशाचे नुकसान झाले.
- गांधीजी महान होते.
- सावरकर द्रष्टे होते.
- नेहरू होते.
- टिळक सनातनी होते.
- आगरकर सुधारक होते.
- उर्वरीत (ऐतिहासीक) काँग्रेसमन्स सुधारीत सनातनी होते.
- १८५७ चे बंडच होते.
- १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध होते.
- रँड हा भला होता.
- चाफेकर बंधुंनी रँडला बरोबर धडा शिकवला.
- नेताजींना गांधीजींमुळे काँग्रेस सोडावी लागली.
- नेताजींनी हिटलरसारख्या चुकीच्या व्यक्ती आणि विचाराची साथ घेतली.
- .....
- हिंदू हा धर्म आहे इतर धर्म पंथ आहेत.
- हिदू हा धर्म नसून हिंदूत्व हे राष्ट्रीयत्व आहे.
- शिवधर्म हा नव्याने स्थापलेला धर्म आहे. जय जिजाऊ!
- संतांनी निष्क्रीयता शिकवली.
- संतांमुळे जनतेला भक्ती समजली.
- शंकराचार्य हे सूर्य आहेत
- शंकराचार्यांवर टिका करणारे काजवे आहेत.
- मनुस्मृतीने समाजात फूट पडली
- नाडीपट्टीवर आपले जीवन लिहीले/कोरले गेले आहे.
- .....
- एम एफ हुसैन यांच्या चित्रांना कला म्हणणे शक्य नाही.
- एम एफ हुसैन अधुनिक पिकासो होते.
- एम एफ हुसैन हिंदूचे विरोधक होते
- सुन्नी मुसलमान एम एफ हुसैनचे विरोधक होते
- भारतीय भ्रष्ट आहेत
- भारतीय षंढ आहेत
- भारतीय अंधश्रद्ध आहेत
- मध्यमवर्ग लोकशाहीविरोधक आहे
- भारत हे राष्ट्र नाही
- भारत हे हिंदू राष्ट्र आहे
- राष्ट्र वगैरे काही नसतेच
- भारतीय हे मुळचे बाहेरून आलेले आर्य
- सचीनला भारतरत्न मिळालेच पाहीजे
- भिमाण्णांच्या तोडीचे कोणी असूच शकत नाही.
- .....
वाचने
10700
वाचनखूण
प्रतिक्रिया
56
जडच घ्या.
In reply to जडच घ्या. by ३_१४ विक्षिप्त अदिती
खरच की!
In reply to खरच की! by विकास
काहीही!
In reply to काहीही! by ३_१४ विक्षिप्त अदिती
छे...
In reply to जडच घ्या. by ३_१४ विक्षिप्त अदिती
'तंत्रज्ञान' असाही एक भाग असावा
ऐतिहासिक सत्य!
In reply to ऐतिहासिक सत्य! by पिवळा डांबिस
उप्स!
चान चान!
बरं मग.... पुढे?
:)
In reply to :) by नंदन
हा हा हा
हा.हा.हा ...अगदी बरोबर्...शिवाय...
In reply to हा.हा.हा ...अगदी बरोबर्...शिवाय... by मयुरा गुप्ते
?
In reply to ? by पंगा
ल्युनाटीक
हाहाहा! असं...
In reply to हाहाहा! असं... by मयुरा गुप्ते
?
In reply to ? by पंगा
पाशवीपणा कमी पडतो आहे बहुदा
In reply to पाशवीपणा कमी पडतो आहे बहुदा by ३_१४ विक्षिप्त अदिती
असं होय?
In reply to असं होय? by श्रावण मोडक
'पूर्वरंग'मधली मरूत्कन्या =
इंच इंच विषय... आप्ल ते
अरेच्च्या
In reply to अरेच्च्या by राजेश घासकडवी
खरचं की!
स्त्रीभृणहत्या हा विषय टाळून
अण्णायन!
अरेच्च्या! जातीपातीचे राजकारण
In reply to अरेच्च्या! जातीपातीचे राजकारण by रेवती
.....
In reply to ..... by विकास
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by सहज
जर
In reply to अरेच्च्या! जातीपातीचे राजकारण by रेवती
अजुन काही १)मिपावर किती कंपु
अर्थ
अय्या !!!!!!
+१
विषयांचे संकलन
सल्ला...
मुंबई विरुद्ध पुणे
बामनांना आणि त्या अनुषंगाने
मस्त..
मस्त.....
मस्त.....
पुणे आणि पुणेकर या बद्दल चा
In reply to पुणे आणि पुणेकर या बद्दल चा by विजुभाऊ
खुलासा
In reply to खुलासा by विकास
पुणे आणि पुणेकर या बद्दल चा
In reply to पुणे आणि पुणेकर या बद्दल चा by ३_१४ विक्षिप्त अदिती
?
In reply to ? by विकास
अच्छा, म्हणजे दोष सातारच्या /
In reply to अच्छा, म्हणजे दोष सातारच्या / by ३_१४ विक्षिप्त अदिती
तस नाही!
In reply to तस नाही! by विकास
मुंबई
In reply to तस नाही! by विकास
सहमत
भाषा आणि व्याकरण :)
In reply to भाषा आणि व्याकरण :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
बरोबर लोक टी पी साठी असे
In reply to बरोबर लोक टी पी साठी असे by आशु जोग
+१
सध्या खूपच मजा येते आहे
In reply to सध्या खूपच मजा येते आहे by शुचि
अवांतर
- सध्या खूपच मजा येते आहे मिपावर. अगदी "मोकलाया दाही दिशा" मिळाल्यासारखे वाटते
- सर्वांचे खूप आभार.
वरील दोन्ही मुद्दे मिपावर वारंवार मांडले जात नाहीत. त्यामुळे आपला हेतू कितीही उदात्त असला तरी येथे आपण अवांतर केले आहेत. मजा येणे, आभार मानणे वगैरे गोष्टींची सभासदांना सवय लागली अथवा कल्पना आवडली तर सगळेच खेळीमेळीने राहील्याने, हे संस्थळ चालवणे संपादकमंडळाला कठीण जाऊ शकते. त्यामुळे असा प्रतिसाद परत दिसला तर तो तात्काळ अप्रकाशीत केला जाईल. जर याबद्दल तक्रार करायची असेल तर ती या धाग्यात अथवा या सदस्याकडे करू शकता अथवा त्या सदस्याला आमरण उपोषणाला बसवू शकता. (संपादक मंडळ उपोषण थांबवणार याची खात्री असावी. तेंव्हा एकदम बिन्धास्त!) ;)In reply to अवांतर by विकास
(वारंवार मारले जाणारे गुद्दे)
In reply to (वारंवार मारले जाणारे गुद्दे) by रेवती
=))
नंदनने ते नाव अप्रत्यक्ष पणे