Skip to main content

अण्णांचे आंदोलन - आत्मपरीक्षणाची संधी

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 25/08/2011 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
आपले पुढारी नेहमीच कुंपणावर बसून एखाद्या फांदीवरच्या बिलंदर माकडाप्रमाणे उड्या मारत असतात. जिकडे तुकडा दिसला तिकडे उडी टाकयची आणि तुकडा फस्त केला की तिथून सटकून पुन्हा फांदीवर (कुंपणावर) येऊन अधाशीपणे आपली शेपटी हलवत ठेवायची ही आपल्या पुढार्‍यांची खूप जुनी खोड आहे. बाळासाहेंबांनी अण्णांना 'वाकड्या तोंडाचा गांधी' म्हटले होते.

उधाण

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 25/08/2011 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
फुलतात प्रीतवेडे; प्राजक्त भावनांचे नातेच गोतवेडे; आसक्त श्रावणाचे आतूर श्वास भोळा; वारा उरी धपापे आकाश भारओले; रानी मयूर नाचे संकेत हा कशाचा ? ओळीत शब्दकोडे ! संवाद वा स्वरांचा ? हृदयास गीत छेडे !! गेले सरून जे जे; सारे उधाण त्याचे अंगण भरून भारे; कोरीव चंदनाचे ........................अज्ञात
काव्यरस

सौंदर्यनगरीतील कलावैभव: शिल्पकला

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 25/08/2011 03:31 या दिवशी प्रकाशित केले.
(या धाग्याचे स्वरूप शिल्पकलेविषयी माहितीपूर्ण, तौलनिक, समिक्षात्मक लेखनप्रपंच असे नसून निखळ रसग्रहणात्मक आहे). पॅरिसमध्ये भ्रमण करताना ठायी ठायी सौदर्यदेवता कुठल्या ना कुठल्या स्वरूपात रसिकांना दर्शन देतच असते...

श्री गणेशासाठी कमलाकृती आसन

लेखक मीनल यांनी गुरुवार, 25/08/2011 03:28 या दिवशी प्रकाशित केले.
श्री गणेश चतुर्थी आता आठ-दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. उत्सवाचे वारे कित्येक दिवस आधिच वाहू लागले आहेत. आषाढच्या सरींत आणि श्रावणाच्या शिडकाव्यात चिंब होऊन हिरवीगच्च झालेली सर्व सृष्टी श्री गणेशाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहते आहे. तिथेच पिवळ्या, पांढ-या रानफुलांनी जणू फेर धरला आहे. विविध रंगी तेरडा माती मातीच्या कणातून तरारून आला आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा पिढ्यानपिढ्या जोपासण्यात आलेल्या कोकणातील प्रत्येक देवघरची रंगरंगोटी आता संपली आहे. गणपतीच्या आसनाच्या मागच्या भिंतीवर निसर्गचित्रे, देवांची चित्रे रंगवून झाली आहेत.

बाळासाहेबासुध्दा आपली पोळी भाजायला सरसावलेत आता!

लेखक भाकरी यांनी गुरुवार, 25/08/2011 02:29 या दिवशी प्रकाशित केले.
बाळासाहेबानी अण्णाना पत्र पाठवलं आहे. त्यातला थोडा मजकूर (मटा मधून) पहा - -----------------आपणांस आठवत असेलच , ४ ऑक्टोबर १९९६ रोजी आपण मला मातोश्री या निवासस्थानी भेटलात. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आपल्या दोघांत चर्चाही झाली. तेव्हाही सर्व थरांत व्यापून राहिलेला भ्रष्टाचार मोडून काढण्याचे वचन मी आपणास दिले होते आणि आपणही त्यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाला होतात की , शिवसेनाप्रमुख हाच आता आशेचा किरण आहे. केवळ तेच हा सर्वव्यापी भ्रष्टाचार मोडून काढण्याचे धाडस दाखवू शकतात. अन्य कोणातही हिंमत नाही. आम्ही समन्वयाने एकत्र काम करू. मग यश निश्तितच !

माहिती हवी आहे. - ह्युस्ट्न.. टेक्सास..

लेखक प्रशु यांनी बुधवार, 24/08/2011 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
कामा निम्मीत्त अमेरीकेत ह्युस्ट्न (टेक्सास) येथे जाणे आहे. वेळ मिळाल्यास तेथिल काहि आसपासची ठिकाणे पाहण्याचा विचार आहे. तरी तेथील मीपाकरांनी ह्याबाबत क्रुपा करुन मार्गदर्शन करावे..

मैत्र !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 24/08/2011 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
एक जवळचा मित्र ! आपल्या आयुष्यातील कितीतरी, म्हणजे कितीतरी तास आपण या लाकडाच्या अडीच फूट बाय ३/४ फूट तुकड्यावर घालवतो. टेबलाशी निगडीत अनेक चांगल्या वाइट आठवणींचा आपल्या डोक्यातल्या हार्डडिस्कवर एक वेगळा ड्राईव्ह केला तरी चालेल एवढ्या आठवणी सहज असतात. कामाचा पहिला दिवस, मधल्यावेळेचा डबा, मित्रांचे कोंडाळे, साहेबाची बोलणी, पडलेला चेहरा, बढती, बढतीची मेजवानी....शेवटचा दिवस.... अशा अनेक आठवणी आपण या टेबलाशी बोलू शकतो. अशा अनेक टेबलांनी आपल्या आयुष्यात आपल्या मित्रांप्रमाणे आपली सोबत केलेली असते. जरा आठवून पहा आणि तुम्हाला आढळेल किती महत्वाचा आणि जवळचा मित्र होता हा !

जनलोकपाल आणि मिपासंपादक

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 24/08/2011 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेले काही दिवस मिपा, टीव्ही, वर्तमानपत्रे बघावे तिकडे अण्णा आणि जनलोकपाल ह्यावर खडाजंगी वाचायला मिळत आहे. आपल्याला त्यातले जास्ती काही कळत नाही पण एकूणच आर्थिक, सामाजिक भ्रष्टाचाराला खीळ बसावी , सामान्य लोकांना न्याय मिळावा, अकार्यक्षम अधिकारी तसेच बाबू लोकांना चाप बसावा ह्यासाठी काहीतरी कायदा बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत येवढेच आम्हाला कळले. मग मनात असे आले की, सामान्य मिपाकरांचे प्रतिसादाच्या प्रतिसाद खाणार्‍या, कधी कधी तर अख्खे धागेच घशात घालणार्‍या संपादकांना जनलोकपालच्या कक्षेत आणता येईल काय ? त्यासाठी काय करावे लागेल ? अनिवासी संपादकांना ह्यातून सूट मिळण्याची शक्यता आहे का ?