Skip to main content

मासे ३२) पापलेट

लेखक जागु यांनी मंगळवार, 30/08/2011 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पापलेट हळद मसाला मिठ आल-लसुण्-मिरची-कोथिंबीर वाटण (ऑप्शनल) तळण्यासाठी तेल पाककृती: ताजे पापलेट ओळखण्यासाठी ते कडक आहेत का बघा. तसेच त्यांच्यावर सुरकुत्या पडलेल्या नसल्या पाहीजेत. पापलेट जर अगदीच मोठे असतील तर त्याच्या तुकड्या करुन घ्या. मिडीयम असतील आणि कमी जणांसाठी हवे असतील तर पापलेटचे शेपुट, बाजूची परे कापा.

पराठे वाला कट्टा

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 30/08/2011 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
एका तहात दुस-या तहाची बीजं असतात असं म्हणलं जातं,तसंच होतं, एका कट्ट्यालाच पुढच्या कट्ट्याच्या ठिकाण ठरवलं जातं, राहते ते फक्त दिवस आणि वेळ ठरवणं. २९ जुलैच्या कट्ट्यातच दोन ठिकाणांवर चर्चा झाल्या होत्या, एक दिल्ली किचन (प्रस्तावक-श्री.वपाडाव) आणि दुसरं शाजीज पराठा हाउस. व्यनि, फोन, एसेमेस इत्यादीच वापर मुबलक वापर करुन २७ ला संध्याकाळी शाजीज पराठा हाउस इथं जमायचं ठरलं,कट्ट्याला काहीतरी वेगळं करायचं होतं,दोन गोष्टी होत्या एक या हाटेलातलं च्यालेंज आणि दुसरी श्री.

() हजामांना मार्गदर्शन करता येईल का? ()

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 30/08/2011 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
हे वाड्मयचौर्य नाही, फारतर कल्पना आणि शब्द उधारीवर आणले आहेत. कुठून? करा थोडं खोदकाम. सर्वच छोट्या मोठ्या शहरखेड्यांत हजाम अस्तित्वात आहेत. वेळोवेळी नवीन हजाम आपापली दुकानेदेखील उघडतात. (त्यातल्या काहींचा हजामपणाचा धंदा बसला. काहींनी वयोपरत्वे राजीनामा दिला. काहींनी तर पुन्हापुन्हा राजीनामा दिलेला आहे. तर काही दीर्घ मुदतीच्या रजेवर आहेत. काही हजामांच्या मते आपण त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. शिल्लक असलेल्या) सर्वच हजामांना बिनपाण्याने सफाई करण्याची इच्छा असते.

एक कलेक्टर दोन मंत्री

लेखक आळश्यांचा राजा यांनी मंगळवार, 30/08/2011 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
१० ऑगस्टला पंचायती राज विभागाच्या सचिवांचा कलेक्टरांना फोन आला. “अजित, नारायण सुंदरम १३ तारखेला इथे येतायत. ब्रह्मपूरला ते नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेणार आहेत. तुला त्यासाठी एक प्रेझेन्टेशन करावं लागेल.” “नक्कीच सर. फक्त काय बोलायचं नाही ते सांगीतलंत तर बरं होईल सर,” कलेक्टर अदबीने म्हणाले. नारायण सुंदर केन्द्र सरकारातील मंत्री. राज्य सरकारचा केन्द्राशी छत्तीसचा आकडा. त्यामुळे सुंदरांच्या समोर आपण काही बोलून बसू आणि नंतर राज्य सरकार आपल्याला धारेवर धरायचं ही कलेक्टरांची भीति निराधार नव्हती. सचिवांनी कलेक्टरांचा रोख ओळखला. हसत हसत म्हणाले, “अरे घाबरु नकोस.

स्टेपनी

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 29/08/2011 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली गाडीचे अ‍ॅव्हरेज पार झोपले होते.त्यामुळे मेक्यानिकच्या हवाली केले होते. गाडी दुरुस्तीचे काम विचित्र असते गाडी दुरुस्त होत असताना आपण गप्प बसणे अवघड जाते आणि काहि करणे देखील शक्य नसते. गाडी दुरुस्त करणारा मिस्त्री अनोळखी असला तर हे अवघड जागचे दुखणे होते. आमचा नेहमीचा बारक्या मिस्त्री म्हणजे एक वल्लीच आहे तो कशाला काय म्हणेल हे सांगता येत नाही. त्याची ती सातारी बागवानी हिंदी हे एक भन्नात प्रकरण. थोडिशी हैद्रबादी आणि बरीचशी मराठी अशी काहिशी ती भाषा आहे. कळायला सोप्पी बोलायला गेलो तर कैच्या कैच अर्थ निघतात. पुर्वी बजाजची चेतक स्कुटर असताना त्याची माझी ओळख झाली.

विकासाची फळं

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 29/08/2011 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
एक अगदी मनाला भिडणारा लेख नुकताच वाचनात आला. त्या लेखाची 'लोकप्रभा' साप्ताहिकातली लिंक येथे देत आहे. अवश्य वाचा. http://www.loksatta.com/lokprabha/20110902/andolan.htm पुण्याजवळच्या अत्यंत सुपीक आणि सुंदर अशा मावळ खोर्‍याची विकासाच्या नावाखाली सुरु असलेली लूट, राजकारण्यांची अधू दृष्टी, तिथल्या साध्या माणसांची होणारी परवड आणि पैशाच्या मोहात उडून जाणारी अस्सल मावळ संस्कृती याचा खूप चांगला ऊहापोह लेखक श्रीरंग गायकवाड यांनी या लेखात केलेला आहे. विकासचा राक्षस या सुपीक मावळाला गिळंकृत करणार अशी भीती या लेखातून व्यक्त होतेय.

निवडणूक सुधारणा - उमेदवारास परत बोलावण्याचा अधिकार

लेखक नितिन थत्ते यांनी सोमवार, 29/08/2011 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
जनलोकपाल विधेयकाच्या गदारोळानंतर अण्णा हजारे यांनी पुढील पावले म्हणून निवडणूक सुधारणांचा मुद्दा बोलून दाखवला आहे. सध्याची निवडणूक पद्धत निर्दोष नाही यात काही संशय नाही. निवडणुक सुधारणांबाबत काही मुद्दे गेली अनेक वर्षे (म्हणजे कमीत कमी ३०-३५ वर्षे) चर्चेत आहेत. स्टेट फंडिंग ऑफ इलेक्शन, लोकप्रतिनिधीला परत बोलवण्याचा हक्क हे दोन मुद्दे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाच्या काळापासून मी ऐकत आहे. [त्यापूर्वीच्या काळात मी काही समजण्याच्या वयात नव्हतो ;) ]. गेल्या काही काळापासून उमेदवार नाकारण्याचा हक्क हाही चर्चेत आहे. त्या अनुषंगाने कलम ४९-ओ संदर्भात काही चर्चा घडत असतात.