हल्ली गाडीचे अॅव्हरेज पार झोपले होते.त्यामुळे मेक्यानिकच्या हवाली केले होते.
गाडी दुरुस्तीचे काम विचित्र असते गाडी दुरुस्त होत असताना आपण गप्प बसणे अवघड जाते आणि काहि करणे देखील शक्य नसते. गाडी दुरुस्त करणारा मिस्त्री अनोळखी असला तर हे अवघड जागचे दुखणे होते. आमचा नेहमीचा बारक्या मिस्त्री म्हणजे एक वल्लीच आहे तो कशाला काय म्हणेल हे सांगता येत नाही. त्याची ती सातारी बागवानी हिंदी हे एक भन्नात प्रकरण.
थोडिशी हैद्रबादी आणि बरीचशी मराठी अशी काहिशी ती भाषा आहे. कळायला सोप्पी बोलायला गेलो तर कैच्या कैच अर्थ निघतात.
पुर्वी बजाजची चेतक स्कुटर असताना त्याची माझी ओळख झाली. स्कुटरच्या डिक्कीत पाणी साठून रहायचे.
बारक्याने ते बघितले आणि म्हणला भाइ आपण एक कामा करेंगे. गाडीकी डिकीमे ना दो सुरागा पाडेंगे.
मला गंमत वाटली . त्याने एक खिळा हातोडी घेवून ठाक ठुम करून दो सुरागा पाडले आणि त्याच्या भाषेत बोलायचे तर प्राब्लेमा सोडवला.
त्याच्या गॅरेजच्या पासून घर जवळच असावे. एकदा त्याला त्याच्या बायकोला काहितरी सांगायचे होते.
तो तेथूनच ओरडुन सांगत होता. " अरे तुम बायका बायका आगे जाव ना हमे आतैच पिछिशे.
और वो किटल्या मे तीन चार चाया भीजू इदर हमना वासते.
या भाषेचे व्याकरण मजेशीरच भाषा वरवर हिंदी वाटत असली तरी ती मराठी म्हणून खपून जाते
हिंदीत नसलेले शब्द बेमालुमपणे या भाषेत येतात.उदा तुमकु बोला ना हल्लू मार करके. तो हल्लूच मारना. ए भित्ताड के भाई... नीट इदर देख. नै तो काना के निच्चु दोन बजावुंगा.
त्या दिवशी गाडी चे अॅव्हरेज का मिळत नाही यावर त्याचे संशोधन चालु होते.
बराच काळ त्याने बॉनेट उघडून कार्बोरेटर आणि तत्सम पार्ट बघितले. त्याला हवे ते सापडत नव्हते.
त्याने डोके बाहेर काढले आणि तंबाखूचा बार भरून पुन्हा बॉनेटखाले डोके घालणर इतक्यात त्याच्या काहीतरी लक्षात आले. तो म्हणाला भई गाडी के टायरा दीखु. एकदम गोलटा. ऐशे टायरा रहेंगे तो गाड्या कैशी चलेंगी. सब नक्ष्क्षी एकदम खल्लास एकदम गोलटा हुवा हय ये.
आन डिक्की का टायरा कैशी है वो बताव.
मी म्हनालो डिक्की का टायर.म्हणजे स्टेपनी.........
हा वोच वोच
मी स्टेपनीचे टायर बघितले ते देखील फारसे उत्तम नव्हते.
एक कामा करो ये टायर मै आगे बिटाता हुं. और आग्गे के दोनो टायरा पिछे लगातै.
फिर ?
डिक्की का टायरा थोडे दिन चलेगा फिरबी नै होगा. तुमको सब टायरां बदलनाच पडेगा.
का कोणास ठाउक मी त्याला त्या भाषेत विचारायचे म्हणून विचारले बारक्या आब्बी की बात कर मेरेकु ये बता. ष्टीप्नी का टायरा लगाने से अॅव्हरेज अच्छा मिलेगा या रेग्यूलर टायर लगानेसे अच्छा मिलेगा. रेग्यूलर टायर अगदीच गोल्टा नई हय पण ष्टीप्नी बी अच्छी हय ना. मेरेकु और थोडी दिन तो चलेगी ना. अगले म्हैनेमे बदलेंगे.
यावर तो बराच वेळ हसत उभा राहिला. अगदी डोळ्यात पाणी येइपर्यन्त हसला.
भई इतना ज्योका नको मारू.
कसला ज्योक ....अन तुला हसायला काय झाले?
भई डिक्की का टायर टायर होता है..... ष्टीप्नी अलग अस्तीय.
म्हणजे?
ष्टीप्नी मायने ष्टीप्नी ..... वो ....वो......... त्याने नाकावर बोट टेकवत मला खुलासा केला.
मी काही कळाले नाही.
अरे भई वो.. घर मे बाहर हुती हय वो..
क्या? !!! आता आश्चर्यचकित व्हायची वेळ माझी होती.
नै तो क्या . एक्ष्ट्रा हुती हय ना. घरकी बायकु वरीजनल( ओरिजनल) हुती हय अन ज्यादा वाली ष्टीप्नी.
त्या बोलण्यावर मी नक्की काय बोललो त्या वाक्यांचा विचार करत होतो.
१) जुन्या गाड्या चांगल्या असायचा. लँब्रेटा . व्हेस्पा , बजाज.... प्रत्येकाला स्टेपनी असायची
नव्या गाड्याना प्लेझर , अॅक्टीव्हा , याना स्टेपनी नसते. मोटारसायकलला नसतेच नस्ते. हे असे का?
२) रेग्यूलर टायर वर गाडीचे अॅव्हरेज चांगले मिळेल का स्टेपनी वर चांगले मिळेल?
३) स्टेपनी किती किलोमिटर नंतर बदलावी?
पण बारक्या च्या भाषेत "ष्टीप्नी " अर्थ कळाला आणि माझे सगळे प्रश्न घशातच अडकले
वाचने
3320
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
:D :D पुलंच्या 'नामू परिट'
अर्थाचा अनर्थ
लेख मस्त झाला आहे
क्या भै...
हम्म्म आणखी एका शतकी धाग्याची सुरुवात म्हणावी का?
घ्या विजुभो.. हे तर मी
खल्लास, एकदम क ड क किस्सा
टायर वर्रीजनल असो वा
स्टेपनी हा प्रकार पूर्वापार
विजुभाउ सुरेख व्यक्तीचित्रण
भाड्यावर घ्यावी
घासून घासून गुळगुळीत झालेले
विनोदी?
In reply to घासून घासून गुळगुळीत झालेले by सविता
सवितातै तुम्ही लिहिलेत