Skip to main content

शुभेच्छा !!!

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 28/09/2011 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरु होत आहे. सर्व मिपाकरांना हार्दीक शुभेच्छा ! अमोल केळकर ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ मला इथे भेटा

मोबाईल बँकिंग बद्दल माहिती हवी होती

लेखक अजितजी यांनी बुधवार, 28/09/2011 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल बँकिंग बद्दल माहिती हवी होती . एसेमेस द्वारे बँक बलन्स समजतो ,रक्कम जमा /वजा झाल्याचे समजते . इतपत माहिती आहे मला . पण आर्थिक व्यवहार कसे होतात ?खात्यातील पैसे दुसर्यांना कसे देता येतात ? आणखी हे व्यवहार कितपत सेफ /सुरक्षित आहेत ? आपला मोबाईल दुसर्याच्या हातात पडला /किवा चोरी ला गेला तर काही गैर व्यवहार आपल्या खात्यातून होण्याची शक्यता आहे का? मोबाईल बँकिंग ने होणारा व्यवहार क्रेडीट /डेबिट कार्डा पेक्षा सुरक्षित आहे का ?--मोबाईल बदलला कि व्यवहार ठ्ठप होतील का?

बालपणीचे निसर्ग सवंगडी

लेखक जागु यांनी बुधवार, 28/09/2011 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणी तुम्हीही धावला असाल ह्यांच्या पाठी. त्यांच सौंदर्य न्याहाळायला कधी गंमत म्हणून कधी हातात धरलेही असाल. चतुर पकडायचा त्याला दोरा लावुन ठेवायचा किंवा त्याचे पंख धरुन त्याच्या पायाने त्याला एखादा छोटा खडा उचलायला लावायचा. तो लगेच उचलायचा. टाचणीलाही दोरा लावायचा मग ती मंद गतीने उडताना पहायचे. चतुर मला तेंव्हा हेलिकॅप्टर सारखाच वाटायचा. त्याच ते डोक हेलमेट घातल्या सारख वाटायच. फुलपाखराला पकडले की त्याचा रंग बोटांना लागायचा. बर्‍याच वेळा पिवळ्या पंखावर ऑरेंज ठिपके असलेले फुलपाखरू सापडायचे. परवा दिसला होता पण फोटो काढायला थांबला नाही तो. अजुन एक दिसला होता.

कविता पुर्ण करुन हवी आहे...

लेखक धन्या यांनी बुधवार, 28/09/2011 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. कसं काय बरं हाय ना? काही नाही हो, जरा एक कविता लिहित होतो. छ्या. तुमचं आपलं काहीतरीच. फक्त दहा वीस टक्के कवींनाच कविता स्फुरते. बाकीचे कविता पाडतात. आम्हीही या रटरट कवींपैकीच. म्हणजे र ला र आणि ट ला ट जुळवून कविता पाडणारे. कुणा थोरामोठयाने आमच्यासारख्या कवींना यमक्या कवी म्हणून उचित सन्मान केला आहे. काय म्हणता, रामदास की मोरोपंत यापैकी कुणीतरी ते म्हटलंय? जाउ द्या हो. इथे चावडीवर एकापेक्षा एक अभ्यासू लोकं आहेत. संदर्भ चुकला तर उगाच आपली पुजा बांधून आनंद शिंदेची रेकॉर्ड वाजवायचे. तुम्हाला चालेल का अशी द्विअर्थी गाणी वाजवून चावडीची प्रतिमा खालावलेली? अच्छा ते होय?

(आणखी एक) सर्वपित्रि पेश्शल ... नरकभेट !

लेखक मस्तानी यांनी बुधवार, 28/09/2011 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
जर मी तुम्हाला सांगितल की "एकदा किनई आम्ही नरकात गेलो होतो" तर तुम्ही नक्कीच मला 'भूतबाधा झालेली दिसतेय हिला' किंवा 'सर्वपित्रिचा परिणाम काय हो' किंवा तत्सम काहीतरी म्हणाल. पण जरा थांबा, मी अगदी खर तेच सांगते आहे. हा बघा पुरावा ... http://www.hell2u.com/ गेले काही दिवस इथे भूतांविषयी 'चर्चा' चालू आहे ती वाचताना आठवण झाली तीन वर्षांपूर्वी जिथे भेट दिली होती अशा एका छोट्याश्या जागेची.

एक दिवस पंक्चरलेला

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 28/09/2011 06:37 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवस पंक्चरलेला
गेलेल्या रविवारच्या दिवसाची ही सत्यकथा आहे. रविवार म्हणजे सुट्टी वैगेरे काही नाही. कारण मला साप्ताहीक सुटी शनिवारची असते. सध्या रात्रपाळी असल्याने रविवारी रात्री कामाला ११ वाजता जायचे होते. कालची सुटी असल्याने आदल्या रात्री झोप झालेली होती. त्यामुळे रविवारच्या सकाळी लवकर उठलो. रुग्णालयात भरती झालेले एक जवळच्या नातेवाईकांना दुपारी रजा देणार असल्याने त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी जायचे होते. कालपासून मुलगा 'सायकलमध्ये हवा भरून आणा' 'सायकलमध्ये हवा भरून आणा' अशी भुणभुण करत होता.

हळूच तू मला पाहीलेले

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 28/09/2011 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
हळूच तू मला पाहीलेले
हळूच तू मला पाहीलेले मी तुला पाहीले नजरेला मिळता नजरा, मी न माझी राहीले ||धृ|| कधीतरी ओळखीचे हासू पाहीले तुझ्या ओठी नकळत स्मित माझे आले त्याच्या उत्तररासाठी कळले का रे तेव्हा हृदयात काही झाले? नजरेला मिळता नजरा, मी न माझी राहीले ||१|| पुस्तके देता घेता थरथरती भेट झाली अलवार स्पर्श होता काटा फुले शरीरी प्रित पुष्पे अशी कितीतरी मी मनी माळले नजरेला मिळता नजरा, मी न माझी राहीले ||२|| ठेवले वहीत मी पिंपळपान आठवांचे बघ ते आता झाले बदलून जाळीचे तेवढेच जून झाले प्रेम पहील
काव्यरस

गुरूत्वाकर्षण नव्हे, कर्मविपाकातून अधःपतन

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 28/09/2011 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच वाचलेल्या एका संशोधनानुसार गुरूत्वाकर्षण हे खरे बल नसून ते सर्वव्यापी परमेश्वराने निर्माण केलेले कर्मविपाकामुळे होणारे अधःपतन असते. शाळांमधे भौतिकशास्त्र, उत्क्रांती, अणूरासायनिक प्रक्रिया इत्यादी पाश्चात्य विज्ञान शिकवावे का नाही यावरून चर्चा सुरू असताना, कांदा संस्थानाच्या माजी संस्थानिकांच्या देणगीतून सुरू असणार्‍या संशोधनसंस्थेतील पदार्थविज्ञानिक आचार्य दीपांकर भिर्टाचारजी यांनी त्यांच्या या नव्या 'कर्मविपाकामुळे अधःपतन' या संशोधनाची माहिती दिली.