Skip to main content

कालच आई स्वप्नात येऊन गेली ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 13/10/2011 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
कालच आई स्वप्नात येऊन गेली माझ्या केसात हात फिरवून हलकेच मला म्हणाली किती राब राबतोसरे तू थोडासा आराम करीत जारे बाळा काम काम नि अविरत काम मग आराम कधी करशील बाळा ...? कसा जीव माझा व्याकुळ होऊन गेला तिच्या आठवणीने जीव ओला ओला झाला सतत काळजी तिची सवय होती पोरांच्या सुखासाठी ती राब राब राबत होती देवाजवळ दिवा नि हात जोडून प्रार्थना सुखाची याचना फक्त पोरासाठी स्वप्नात येऊन ती काय म्हणाली ..? भूक लागली असेल नारे तुला थांब जरासा आपला जुना तवा लोखंडाचा मी शोधून काढते आणि तुझ्यासाठी छान पिठले टाकते असे म्हणून ती आत गेली तिची वाट बघता बघता मला कशी जाग आली ...? मी तिची वाट बघत बसलो नि जाणीव झाली आ
काव्यरस

अकिला & दी बी ...

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 13/10/2011 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणातली गुणवत्ता आणि विद्यार्थ्याची कौटुंबिक्/सामाजिक्/आर्थिक पार्श्वभुमी ह्यांचे परस्परसंबंध आहे म्हटला तर आहे आणि नाही म्हटला तर नाही. लाखा-लाखाने फिया घेऊन 'हमखास' यश मिळवुन देणार्‍या संस्था/क्लासेस आहेत, त्यात जाणारे विद्यार्थीही आहेत.

कोडं

लेखक दादा कोंडके यांनी बुधवार, 12/10/2011 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, लहान असताना जयंत नारळीकरांच्या "गणितातल्या गमती-जमती" पुस्तकात वाचलेलं एक गणिती कोडं आठवलं. एका राज्यात प्रधानाच वय झाल्यामुळे तो निवृत्त होणार असतो. राजा मग राज्यात दवंडी पिटून सांगतो की प्रधानाच्या जागेवरती योग्य व्यक्तीची निवड करायची आहे तरी हुशार लोकानी दरबारत हजर व्हावं. राजा प्रधान बनण्यासाठी आलेल्या लोकांची मुलाखत घेतो. खुप लोकं पहिल्या फेरीतच बाद होतात. अस करत करत शेवटच्या फेरीत तीन माणसं उरतात. राजा खुप प्रयत्न करुनही त्यापैकी सर्वात हुशार उमेद्वार निवडू शकत नाही.

श्री प्रशांत भुषण

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 12/10/2011 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
टीम अण्णांचे एक सदस्य श्री प्रशांत भुषण यांना केबिन मधे घुसुन मारहाण केल्याचे वृत्त पहाण्यात आले....अश्या भेकड हाणामारीचा निषेध कश्मीर विषयी त्यांनी जे विधान केले होते त्याचा राग येवुन हे कृत्य हल्ले खोरांनी केल्याचे समजते. काश्मिरी नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी सार्वमत घ्यावे..... सैन्य काढुन घ्यावे ..अशी मते व्यक्त केली होति श्री प्रशांत भुषण यांनी.. हल्लेखोर हे श्री भगत सिंग सेनेचे कार्य कर्ते असुन त्यांना श्री प्रशांत भुषण यांची कश्मीर विषयी ची भुमीका मंजुर नव्हती.

अंधेर नगरी चौपट राजा

लेखक जयनीत यांनी बुधवार, 12/10/2011 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
अंधेर नगरीत एका महान योगीराजांचे आगमन झाले . चौपट राजाने त्यांचे अगत्याने स्वागत केले . योगीराजांना भूत , वर्तमान , भविष्य त्रिकालात सर्वकाही बघू शकण्याची सिद्धी प्राप्त होती . राजाने त्यांना सन्मानपूर्वक दरबारात विराजित करून आपले भविष्य विचारले . योगीराज क्षणात समाधिस्थ झाले . जागृत होऊन त्यांनी राजाच्या कानात सांगितले " हे राजा लवकरच तुझा सर्वनाश अटळ आहे , प्रजा तुझ्या कुशासनाला कंटाळली आहे .

स्ट्रॉबेरी- राजबेरी चिजकेक

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 12/10/2011 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः Mascarpone cheese - ५०० ग्रॅम ग्रीक दही - १०० ग्रॅम (हे दही न मिळाल्यास चक्का किंवा पाणी काढलेले दही वापरु शकता) स्पॉन्ज केक - १ (त्याचे २ लेयर करुन घ्यावेत) जिलेटीन - १ मोठा चमचा गरम पाणी - १/४ कप अंडी - २ (पांढरा भाग) साखर - २५० ग्रॅम व्हॅनिला इसेन्स - १/२ छोटा चमचा लिंबुचा रस - १-२ चमचे लिंबु - १ स्ट्रॉबेरी - १ किलो राजबेरी - १ टिन (राजबेरी नसल्यास चेरी वापरु शकता) केक करायचे भांडे - असे भांडे ज्याचा बेस वेगळा करता येतो. कृती: १. १/४ कप गरम पाण्यामधे जिलेटीन टाकुन, त्यात विरघळुन घ्यावे. २.