मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्री प्रशांत भुषण

अविनाशकुलकर्णी · · काथ्याकूट
टीम अण्णांचे एक सदस्य श्री प्रशांत भुषण यांना केबिन मधे घुसुन मारहाण केल्याचे वृत्त पहाण्यात आले....अश्या भेकड हाणामारीचा निषेध कश्मीर विषयी त्यांनी जे विधान केले होते त्याचा राग येवुन हे कृत्य हल्ले खोरांनी केल्याचे समजते. काश्मिरी नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी सार्वमत घ्यावे..... सैन्य काढुन घ्यावे ..अशी मते व्यक्त केली होति श्री प्रशांत भुषण यांनी.. हल्लेखोर हे श्री भगत सिंग सेनेचे कार्य कर्ते असुन त्यांना श्री प्रशांत भुषण यांची कश्मीर विषयी ची भुमीका मंजुर नव्हती. असे समजते सर्व मान्यवरांनी या भेकड कृत्याचा निषेध केला आहे... खरे तर श्री अण्णा व त्यांचे साथिदार आंदोलनाला मिळालेल्या भरघोस पाठिंब्या मुळे कुठल्या हि विषयावर दणकुन मते देत असतात.. नुकतेच अरविंद केजरीवाल यांनी अण्णा संसदेपेक्षा मोठे आहेत, हे वक्तव्य केले. होते. या मार हाणीत कदाचित हिस्सार मधल्या निवडणुकिचा पण यात संबंध आहे का? अशीहि प्रतिक्रिया ऐकण्यास मिळाली.

वाचन 8867 प्रतिक्रिया 0