Skip to main content

प्रवास .....

लेखक फिझा यांनी मंगळवार, 25/10/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
वाटेवरून चालताना हलकीच ठेच लागते, कुणीतरी “जा” म्हणाले तरी थांबावेसे वाटते थांबताच मनातल्या आठवणी काहूर करतात , आणि कधीचे दाटलेले पाणी डोळे भरून टाकतात , जड जड पायांनी परत आपण चालू लागतो वाट , अंधारातून चालता चालता होऊ लागते पहाट , ओंजळ भर मोगरा बाकी पारिजताकाच सारा , निळ्या निळ्या आकाशात शुभ्र ढगांचा पसारा , मन सकाळीच तेवढे प्रसन्न , मग गहिवरून येते , वाऱ्यासंगे वाहता वाहता परत फुलापाशी थांबते , मेघ येतात दाटून मग ,बरसून जातात संध्याकाळी , तेव्हाच बहरतो निशिगंध आठवणींच्या वेळी , विसरव म्हणले तरी विसरता येत नाही , दिवस संपून जातो पण मन कुठंच लागत नाही , पाउस पडून गेल

गोष्ट

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 25/10/2011 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी ती गोष्ट शोधतोय बर्‍यासश्या हाताला लागतायत . . लहानपणी आज्जीने सांगितलेली त्या राजकन्येची, शाळेत मस्ती करता करता मीच सांगितलेली कापूसकोंड्याची, इतिहासाच्या सरांनी सांगितलेली आठव्या हेन्द्रीची, आजोबांनी सांगितलेला शिवबांचा इतिहास, आईने मांडीवर बसवून सांगितलेली ध्रुवबाळाची, अशा किती सार्‍या गोष्टींनी वेढलंय मला . . पण मला ती गोष्ट सापडत नाहीय्ये निळ्या डोळ्यांच्या, उडणार्‍या परीची, पर्‍यांच्या स्वप्नील नगरीत घेऊन जाणारी . . कां कुणास ठाऊक, परंतु आता माझी खात्री पटलीय ती गोष्ट फक्त तूच सांगू शकतेस, निळे डोळे मिचकावत सांगायचीस ना....
काव्यरस

अक्साई चीन्

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 25/10/2011 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्यांदा "अक्साई चीन" हा शब्द वाचला-ऐकला होता तेव्हा एक परिचित "हा चीनने भारताचा ढापलेला प्रदेश आहे" अशी माहिती मला तावातावाने देत होते. अर्थातच या भागाबद्दल बाकी कोणतीही माहिती न देता सदर परिचितांच्या चर्चेची गाडी नेहरूंवर घसरली आणि जणू काही नेहरू नसते तर अक्साई चीन आपल्याकडून सुटला नसता अश्या आविर्भावात ते तावातावाने बोलत होते. त्यांच्या भावना प्रामाणिक होत्या मात्र त्या इतक्या खोलापर्यंत पोचल्या होत्या की त्यांच्या लेखी सत्य काय हे जाणण्यापेक्षा तत्कालीन राजकारण्यांवर राग व्यक्त करण्याचे साधन इतकेच महत्त्व 'अक्साई चीन' चे राहिले होते.

अंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 25/10/2011 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान दैनिक दिव्य मराठीतील दिनांक २४ ऑक्टोबर २०११ मधील खाली दिलेली बातमी आशादायक आहे.

आवंढा

लेखक नगरीनिरंजन यांनी मंगळवार, 25/10/2011 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
मेच्या पहिल्या आठवड्यातला शुक्रवार. भडभुंज्यांच्या कढईत तापवल्यासारख्या गरम मातीतून सायकल मारत घरी आलो. माणसं सगळी घरांच्या सावलीत गुमान पडलेली. गल्लीतली कुत्रीसुद्धा हातपंपाच्या आजूबाजूला गारवा शोधत वीतभर जिभा काढून धपापत बसलेली. अधूनमधून छोट्याशा झुळकींचे भोवरे धुळीची चादर विस्कटत असले तरी त्यात हवेपेक्षा उन्हाच्या झळाच जाणवत होत्या. पाठीला घामाने शर्ट चिकटलेला असला आणि उन्हाने चेहरा रापला असला तरी मला आतून गार गार वाटत होतं.

कर्तव्यतत्पर पोलिस!

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 25/10/2011 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10478831.cms बदलापूरचे पोलिस कसे कर्तव्यदक्ष आहेत ह्याची एक झलक. एक तरूण आपल्या आईला डबलसीट नेत असताना एका खड्ड्याला अडखळून त्याची मोटरसायकल आदळली. त्यात त्याची आई दगावली. ताबडतोब आपल्या कर्तव्यतत्परतेची जाणीव असणार्‍या बदलापूर पोलिस विभागाने ह्या दुर्दैवी तरूणाला "निष्काळजीपणे वाहन हाकल्याबद्दल" अटक केली. त्याबद्दल त्यांना छानसे पदकच द्यावे असे वाटते. अर्थातच हा आईला मारण्याचा कट असणार. कारण भारतातील रस्ते कसे तलम गुळगुळीत असतात.

शप्पत तो देखील भिजला होता....!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 25/10/2011 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
निरोप घेता घेता उंच उडणारे विमान बघता बघता ती हलकेच डोळ्यातला थेंब पुसत म्हणाली आभार, परत कधी ..?
काव्यरस

आज चंद्र माझ्या कुशीत

लेखक ज्ञानराम यांनी सोमवार, 24/10/2011 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज चंद्र माझ्या कुशीत ,संगे तारकांचा थवा. तुही बोल माझ्या सवे,असा अबोला का हवा?. मी मिटले डोळे , अन लुब्ध झाले तारे.. माझ्या ओंजळीत पडले सोभाग्याचे मोती सारे... रात्र बोलावत आहे..रातराणीचा गंध नवा.. तुझं खुणावत आहे , हिरवा चुडा.. शालू नवा.. काही हितगुज करु , कधी छेडू सुर नवा.. सात जन्माच्याही पलीकडे तुच जोडीदार हवा....

परसूंकीच बात है...

लेखक विसुनाना यांनी सोमवार, 24/10/2011 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
"क्यों मियां, कब देते टीवी? भोत दिनां हो गये ना..." "परसूं आजाव साब, तबतलक पक्का रेडी करके रैता." "ऐसा घुमाव नक्को मियां, ये तुम्हारे परसूं का एक कौनसातोबी तारीख बताव" "पक्का परसूं, साब. परेशान नै हुनाजी" -किंवा - "ये परसूंकीच बात है, हिंया सामनेईच ठैरा था जॉर्ज बुश!" "कुछ तो बी बोलते क्या? उन्हें आके भोत सालां हो गये ना" "हौला है क्या रे? परसूं बोलेतो अपना हैदराबाद का परसूं रे. नया आया क्यारे हैदराबादमें?" जुन्या हैदराबादेत 'परसूं' या शब्दाला फार्फार महत्त्व आहे. परसों म्हणजे परवा. कालच्या काल किंवा उद्याच्या उद्या.