Skip to main content

RA _ONE

लेखक स्पा यांनी गुरुवार, 27/10/2011 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या लोकल मधून अचाट स्टनट्स करणारा शाहरुख उर्फ जी - वन,... भयानक वेगात फिरवलेले क्यामेरे ... ब्रेक्स नसलेली सुसाट सुटलेली लोकल .. हिरवीण चक्क मोटरमन च्या जागी .. शेवटी.. लोकल चे डबे वेगळे करून लोकांना वाचवण .. फक्त मोटरमनच्या डब्याच प्रचंड वेगाने CST स्टेशनात धडकण .. चक्क स्टेशनच्या बाहेर लोकल चा डबा येण.. त्या धक्क्याने जुन्या स्टेशनच्या इमारतीला तडे जाण, त्या वरची विक्टोरीयाची मूर्ती कोसळण....हळू हळू.. स्टेशन ची इमारतच खचण. अफाट सर्वच अफाट...

ते शिंकले तरीही.....!

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 27/10/2011 08:54 या दिवशी प्रकाशित केले.

ते शिंकले तरीही.....!

आकांत बेदखल का अमुचे जगात होते?
ते शिंकले तरीही चर्चा नभात होते

सोकावलाय येथे काळोख माजलेला
घनघोर रात्र कोठे, कोठे प्रभात होते

का लोळतात पायी सिंहासने तयांच्या?
अद्भुत नवल कसले, त्यांच्या कुळात होते?

आक्रोश शोषितांचे ना उग्र रूप घेते
आक्रंदणे तयांची घरट्यात आत होते

जुळली सतार नव्हती बेसूर जीवनाशी
कसली स्मशानयात्रा तालासुरात होते?

मराठी विश्वकोष जालावर सादर

लेखक यकु यांनी गुरुवार, 27/10/2011 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता म.टा. वर विश्वकोश जालावर सादर झाल्याची बातमी वाचत होतो. तिथूनच मराठी विश्वकोषाची साईट उघडली. पण मध्येच म.टा. वरची बातमी कुठे गेली कुछ पता नहीं. त्यामुळे विश्वकोषाच्या साईटवरुन अध्यक्षांचे मनोगत चोप्य-पस्ते केले आहेत. मराठी विश्वकोष आता जालावरही उपलब्ध झाला आहे. सध्या एक खंड उपलब्ध दिसतो; लवकरच इतरही उपलब्ध होतील अशी सूचनाही आहे. मराठी विश्वकोष जालावर उपलब्ध झाल्याने मराठीतील संदर्भ शोधण्याचे काम फारच सुलभ होईल.

भारताबाहेरील दिवाळी

लेखक विकास यांनी गुरुवार, 27/10/2011 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
नव्वदच्या दशकात जेंव्हा अमेरीकेत आलो, तेंव्हा ज्या काही गोष्टीं दुरावल्या असे वाटले त्यात दोन सण होते - एक अर्थातच गौरी-गणपती, तर दुसरा दिवाळी. याचा अर्थ बाकीच्या सणांना मिस केले नाही असे नाही, पण हे प्रकर्षाने आठवत होते...तस म्हणलं तर आज देखील हे सण घरातच जास्त असतात, त्यात कुटूंबियांप्रमाणे मित्रमैत्रिणींचा सहभाग असतो आणि अर्थातच मराठी मंडळाचे कार्यक्रम... बाकी बाहेर वातावरण "तेच ते, तेच ते"!

मी, कॅन्सल झालेलं रिझर्व्हेशन आणि नुरिया

लेखक अँग्री बर्ड यांनी बुधवार, 26/10/2011 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीनिम्मित पुण्याहून कोकणात यायचे ठरले होते. वोल्व्होचे आरक्षण करणे म्हणजे छ्या , एरवी ३०० मध्ये नेणारा तो आता ६०० सांगत होता. ह्यापेक्षा मग एशियाड काय वाईट म्हणून एशियाडने जायचे ठरवले. माझी एक मानलेली बहिण कम मैत्रीण जी माझ्याच गावी राहते तिच्या बाबांनी मला सांगितलं की ती एकटी येतेय रात्रीची, दोघ या त्यापेक्षा.ठीक आहे म्हणत तीच पण माझ्याच जोडीला रिझर्व्हेशन करून टाकल, सीट नंबर १३ खिडकी,१४. पणजी गाडी होती. म्ह्टल चला, १० तासांच्या प्रवासात कोणीतरी बडबड करायला आहे,गाणी तरी ऐकून ऐकून किती ऐकणार ?

आली आली दीवाळी आली................

लेखक लीलाधर यांनी बुधवार, 26/10/2011 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
आली आली दीवाळी आली......... चला काढूया रा॑गोळी चला काढूया रा॑गोळी.................. शेव चीवडा, कर॑जी आणी लाडू, फराळाची यादी कीती काढू................... अनारसे, चकली नी कडबोळी हीच तर आहे, दीवाळीची थाळी................ स॑गे घेऊन आली......... घराघरातील ''माऊली'' ............ अशीच राहो तीच्या क्रूपेची साऊली, आली आली दीवाळी आली, चला काढूया रा॑गोळी चला काढूया रा॑गोळी.................. दीपावलीच्या हार्दीक शुभेछा.................

ग्रिव्हन्स डे

लेखक आळश्यांचा राजा यांनी बुधवार, 26/10/2011 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसमध्ये बसण्यापेक्षा फिल्डवर जायला कलेक्टरांना आवडे. कमी वेळात जास्तीत जास्त गोष्टी समजून घेण्याचा खात्रीशीर मार्ग! आणि जिल्हा हा नकाशात बघण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहिलेला केंव्हाही चांगला. आज शनिवार. ग्रिव्हन्स डे. कलेक्टर आणि एस्पींनी एकत्र जनतेची गाऱ्हाणी ऐकण्याचा दिवस. प्रत्येक शनिवार वेगवेगळ्या ठिकाणी करायचा आदेशच होता मुख्यमंत्र्यांचा. जेणेकरुन जनतेला जिल्हा मुख्यालयाला येण्याचा व्याप आणि खर्च करावा लागणार नाही. आज बोइपारीगुडा ब्लॉकला जायचं होतं. मराठी-गुजरातीचा भास होणारे आणि तेलुगु भाषेचे मजेशीर मिश्रण असणारे हे ओडिया नाव कलेक्टरांना मोठे रंजक वाटले होते.

महत्त्वाकांक्षेचे रॉकेट ..

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 26/10/2011 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
महत्त्वाकांक्षेच्या रॉकेटला लावा आशेच्या लांब फुलबाजीचे जळते टोक... आकाशात सर्वात उंच जावून व्हावा नेत्रदिपक महान यशाचा स्फोट.. सर्व वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा....!! - निमिष न. सोनार, पुणे
काव्यरस

दिवाळी

लेखक प्रशांत यांनी बुधवार, 26/10/2011 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
लक्ष लक्ष दिव्यांच्या ज्योती प्रकाशाची करतील उधळण निमित्य आहे दिवाळीचं रांगोळ्यानी सजेल अंगण मित्र मंडळी जमतील आप्त फराळ होईल क्षणात फस्त मग शुभेच्छांच्या वर्षावात आनंदून जाईल आसमंत ..! अंगणात राँगोळी सभोवती पणत्याँची आरास दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या सहपरिवारास

तयार करा हिरवं पान

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 26/10/2011 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
तयार करा हिरवं पान
दिवाळीचा फराळ खावून केलं जेवन काथ लावून तयार करा हिरवं पान ||धृ|| हिरव्या पानाच्या होsss हिरव्या पानाच्या शिरा हळूहळू खरडा देठ शेवटाला लागल तो पण खुडा तोंडानं म्हणा आपलं खुशीतलं गानं राया तुमी माजबी लावा की हो पान ||१|| पुढं ओढा जरा होsss पुढं ओढा डबा पानाचा तुम्हां जवळी त्यातच ठेवली पहा सुपारी चिकनी अडकित्यामधी फोडा तिला हाती धरून पानावर मग पसरा बारीक कतरून ||२|| प्रेमाचा गुलकंद लावा तुम्ही पानाला तयार झाल्यावर हातामधी द्या त्याला जवळी या आता खावून पान थांबून जा थोडं मन रिझवून ||३||
काव्यरस