मदतः अॅन्ड आय ड्रॉईड :)
राम राम मंडळी!
काय मग? कशी काय झाली दिवाळी? झाले का फटाके उडवून? फराळाचं चापून गंडलेली पोटं आली का जागेवर? :D
मंडळी, हा धागा मी काढलात तो आहे मदत मागण्यासाठी. मोबाईलजगतात अगदी क्रांती म्हणता येईल अशी परिस्थिती निर्माण करणार्या अॅन्ड्रॉईड प्रणालीवर आमचा नुकताच जीव जडलाय बघा. :) पण...आम्ही पडलो एकतर विंडोज मोबाईलवाले गरीब वापरकर्ते, आणि एकुणच तंत्रज्ञान, प्रणाली(Operating System) ह्या विषयातले तद्दन ढढ्ढोबा!
गेला आठवडाभर झाला, सॅमसंगच्या अॅन्ड्रॉईड फोनशी खेळतोय खरा, पण त्यातल्या सोयी आणि एकुणच अॅन्ड्रॉईडबद्दलचं कुतुहल काही गप्प बसू देईना बॉ! मग म्हणलं, करावं तरी काय?
मिसळपाव