Skip to main content

पाणी अन् माती

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 10/11/2011 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
(१) कसं असतं ना माती आणि पाणी यांच नातंच निराळ पाण्यातल्या मातीचे प्रमाण जास्त असेल तर पाणी दिसत नाही अन् मातीतल्या पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर माती दिसत नाही . . माणसाचही असंच असतं काहीसं कधी मातीच्या देहात डोळ्यातले पाणी दाटते तर कधी डोळ्यातल्या पाण्यात मातीचा देह विरघळतो अन् मग . . कधी माती, कधी पाणी कधी पाणी, कधी माती (२) मातीत पाणी नसेल तर बीजे रुजत नसतात मातीत पाण्याशिवाय फक्त निवडुंग फुलतात . अन् पाण्यात माती नसेल तर फक्त मनीप्लांट रुजतो . . . कधीही फुले न येणारा (३) कुठल्याही पाण्यात कुठलीही माती मिसळली तर मृदगंध दरवळत नसतो . जमिनीला तडा देणा-या अनेक रणरणत्या दिवसांमधून तापलेल्या म
काव्यरस

सूर्य कुडकुडतोय आभाळात ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 10/11/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
[ह्या परदेशात थंडी पडू लागलीय. काल सकाळी सूर्य होता आभाळात. म्हणून सहज ग्यालेरीत जाऊ लागलो नि ह्या भर सूर्य प्रकाशात मी गारठून गेलो. आभाळात एवढा प्रखर सूर्य नि खाली थंडीचा कल्लोळ.मी पटकन शटर बंद केले. नि सूर्याकडे बघून घेतले.अगदी केविलवाणा वाटला सूर्य. त्यावरून सुचले.] पहाटे पहाटे -१० तापमान मी घाबरून गेलो थंडीला नि म्हणालो सूर्याला नको येउस आज खूप थंडी पडलीय गारठून जाशील उगाच कशी होईल सहन तुला ही थंडी भीती वाटते तू असतो नागडा सतत खेळत बसशील अंगणात तुझ्या सोबत कोणी नाही तू अगदी एकटा एकटा कशी नाहीरे भीती वाटत..?
काव्यरस

ससे आणि जादुगार -

लेखक विदेश यांनी गुरुवार, 10/11/2011 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
छोटे छोटे ससे कसे टकमक इंद्रधनू बघती - बघता कोपऱ्यात ते रुसुनी मुकाट का बसती ! चुन्यात बुडुनी आलो वाटे, लाल ना कुणी निळे - रंग कुणाचे ना नारंगी कुणीच ना काळे पिवळे !

विसरता येत नाही

लेखक अरूण म्हात्रे यांनी गुरुवार, 10/11/2011 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
विसरता येत नाही , असे नसतेच काही मनाला सांधणारी नवी मिळतेच शाई.. किती जाती उन्हाळे , बदलतो चेहराही नव्या ह्या मोसमाची नवी मिळतेच ग्वाही चुकांना टाळताना किती केली हुशारी नवे दिसताच कोणी पुन्हा चुकतेच काही तिला वेटाळूनी मी प्राशिला गंध सारा तिला फोडुनी प्यावे असे उरतेच काही खरे ते शोधताना थके श्रद्धा मनाची भेटतो देव ही पण मनी गळतेच काही तिला राणी म्हणालो तिला देवी म्हणालो किती म्हटले तरीही जरा उरतेच काही नदीपात्रामध्ये मी सोडतो दीपमाळा परि गंगा जळातुन निघे भलतेच काही मानतो कागदाला ... वंदितो लेखणीला परि शब्दात अंतिम असे नसतेच काही अरुण म्हात्रे

ज्युनियर लिंकनचे हेडमास्तरांस पत्र

लेखक मी-दिपाली यांनी गुरुवार, 10/11/2011 01:59 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सर्वांनी 'अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र' कधी ना कधीतरी वाचले असेलच, ज्यात एका पालकाच्या भूमिकेतून शिक्षकांकडून असलेल्या सर्वच श्रेयस अपेक्षा व्यक्त झाल्या आहेत. पण ज्याच्याबद्दल ह्या सर्व अपेक्षा आहेत, तो केंद्रबिंदू म्हणजे विद्यार्थी, त्याच्या मनोव्यापाराचं काय?

सोल्ट डो वॉल हेन्गिंग आणि क्ले आर्ट!!

लेखक पूनम ब यांनी बुधवार, 09/11/2011 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
काल सोल्ट डो पासून वॉल हेन्गिंग बनवले. आधी या पद्धती बद्दल माहिती नव्हती. इंटरनेट वर या पद्धतीची माहिती मिळाली.ख्रिसमस साठी सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी याचा उपयोग करता येतो असे कळले. त्यातून मला वॉल हेन्गिंग ची कल्पना सुचली.

घुबड होणार?

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी बुधवार, 09/11/2011 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता काऊ आणि एक होती चिऊ. त्याचं चाललं होत मजेत; नेहमीचीच भांडण, रोजचेच हेवेदावे, धडे शिकवण, आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या. आणि एक होता पोपट, एक साळुंकी सुद्धा. दिवसभर त्याची पोपटपंची आणि तीच कर्णकर्कश किंचाळण. त्या पलीकडे पोचाव अशी इच्चा नाही आणि खंतही नाही. पिंजा-यात नसून पिंजा-यातच जगणारे काहीसे. मग एक कबुतर का नसाव? तेही होत. उबेजलेल्या वळचणीला बसून दिवसभर घुमायच, आणि घोग-या आवाजात कसलीशी भुणभुण करत रहायची. कोणाला दिसत नसली तरी जिच्या नजरेतून कोणीही सुटत नसे अशी एक घार सुद्धा होती; उंच आभाळात. पण त्याचा उपयोग एक तर स्वतः च्या पिल्लांपुरता किंवा एखाद सावज हेरायला.