Skip to main content

घुबड होणार?

Published on बुधवार, 09/11/2011
एक होता काऊ आणि एक होती चिऊ. त्याचं चाललं होत मजेत; नेहमीचीच भांडण, रोजचेच हेवेदावे, धडे शिकवण, आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या. आणि एक होता पोपट, एक साळुंकी सुद्धा. दिवसभर त्याची पोपटपंची आणि तीच कर्णकर्कश किंचाळण. त्या पलीकडे पोचाव अशी इच्चा नाही आणि खंतही नाही. पिंजा-यात नसून पिंजा-यातच जगणारे काहीसे. मग एक कबुतर का नसाव? तेही होत. उबेजलेल्या वळचणीला बसून दिवसभर घुमायच, आणि घोग-या आवाजात कसलीशी भुणभुण करत रहायची. कोणाला दिसत नसली तरी जिच्या नजरेतून कोणीही सुटत नसे अशी एक घार सुद्धा होती; उंच आभाळात. पण त्याचा उपयोग एक तर स्वतः च्या पिल्लांपुरता किंवा एखाद सावज हेरायला. बाकी तिच्या सगळ दिसण्याशी तिच्या पलीकडल्या जाणिवांचा काहीच संबध नाही. तिथेच तळ्याच्या कडेला एक बगळा कसा दिसला नाही तुम्हाला! त्याचाही नेहमीचाच उद्योग; संन्याशाचा आव आणून ताव मारायचा. आणि एक घुबड सुद्धा होत. अंधा-या ढोलीत डोळे बंद करून बसलेल. सगळ्यांपेक्षा वेगळ. कुरूप, अशुभ हि सगळी ठेवलेली नाव कोळून प्यायलेल. सगळ्यांच सगळ शांतपणे शोषून घ्यायचं. चेह-यावर त्याचा कुठली पुरावा दिसत नाही. फक्त दिसत नाही कि तो मुळातच असत नाही? स्थितप्रज्ञ कि काय ते. डोळ्यात काही उमटण्याचा प्रश्नच नाही. ते आत आत पाहण्यात व्यग्र. अंतर्मुख. आणि रात्री मात्र सगळे गाढ झोपी गेल्यावर कोणालाही न दिसणार बराच काही पाहायचं. आपण सगळेच थोडे थोडे पक्षी असतो. आपापल्या आकाशात उडणारे, आपापल्या घरट्यात राहणारे, आपल्या आपल्या पिल्लांना दाणा भरवणारे. कोणी कधी कोण व्ह्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण सगळ्यांनी थोड थोड घुबड नक्की व्हावं. नाही?
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2765
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

घुबड व्हायच म्हणजे नक्की काय करायाच ? अंधा-या ढोलीत डोळे बंद करून सगळ्यांपेक्षा वेगळ. कुरूप, अशुभ व्हायच की नुसतच स्थित्प्रद्न्य. :) (संदर्भा-सहित स्पष्टीकरण पाहिजे असलेली) माझीही शॅम्पेन

मी थोडासा सुद्धा पक्षी नाही. प्राणी आहे. मनुष्यप्राणी... बाकी सगळं बाऊंसर गेलं. कुणाला कळालं तर स्पष्टीकरण टाकण्याची कॄपा करावी...

घुबड व्हायला हरकत नाही पण घुबड सुखी असतं का? अंधारात इतरांना न दिसलेलं पाहिलं की मग पुन्हा दुसरा पक्षी होणं अवघड जातं.

थोडक्यात आटपलेले पण छान मुक्तक

प्रतिक्रियान्बद्दल आभार. बाकि यातल कोणि काय (सम्जुन) घ्यायच ते ज्याच त्याच्यावर. रुपकतले अर्थ सम्जून घेण जास्त अपेक्शित आहे. शब्दशह अर्थ लावणे निश्चितच अपेक्शित नाहि. इतकच म्हणेन. अशुद्ध लेखनबद्दल दिलगिर.

In reply to by सोनल कर्णिक वायकुळ

विविध मनुष्य स्वभावविशेष पक्षांच्या रुपकातून मांडल्याचे जाणवते परंतु ह्या रुपकाला किंचित विस्तारुन सहज पाच्य करता आले असते. हे किंचित बाळबोध वळणाचे आणि झटपट आवरते घेतल्यासारखे झाले आहे असे मला वाटते. प्रयत्न नक्कीच चांगला आहे. पुढच्या वेळी अशा लेखनात मुद्दे अधिक सविस्तर आले तर वाचायला नक्कीच आवडेल.

घुबड होणार? नविन सोनल कर्णिक वायकुळ 7 7 new 10 नवेंबर 2011 - 09:38 वारकरी होऊ - नविन विदेश 3 3 new 10 नवेंबर 2011 - 09:36
हे असे एकाखाली एक दिसले आणि काहीशा विनोदी मनस्थितीतच धागा उघडला. लेखनाद्वारे नक्की काय विचार मांडायचे आहेत ते निटसे कळले नाहीत, मात्र खाली पेठकरकाकांनी एका ओळीत अर्थ समजावल्याने मज्जा आली.

रात्री मात्र सगळे गाढ झोपी गेल्यावर कोणालाही न दिसणार बराच काही पाहायचं. अशी अनेक घुबडं ओळखीची आहेत :) असो. रूपकातले अर्थ छान आहेत. पेठकर काकांच्या प्रतिसादाशी सहमत.