Skip to main content

गृहकृत्यदक्ष(?) कवियित्रींसाठी मार्गदर्शन. !!

लेखक कानडाऊ योगेशु यांनी रविवार, 07/12/2025 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
कवियित्रींना साधारण गृहीणीसारखे पण वावरावे लागते व कविता लिहुन रसिकांना ही खुष ठेवावे लागते. हे फार कसरतीचेच काम आहे. मी खाली काही Techniques देत आहे जे वापरल्यावर कवियित्रींना ग़ृहीणीच्या रुपात वावरताना सुध्दा कविता लिहिण्यात काहीच अडचण येणार नाही. नेहेमीच्या रोजच्याच वेळात घरकाम करता करता बर्याच प्रसंगातुन स्वत:मधील कवियित्रीला कसे जिवंत ठेवायचे हे समजायला त्यामुळे त्यांना नक्कीच मदत होईल. मी खाली काही काव्यप्रकार कवियित्रींनी केव्हा आणि कसे वापरायचे हे सविस्तरपणे सांगितले आहे. खरेतर खालील उपाय वाचुन इतर गृहीणी सुध्दा कविता लिहु शकतील. काही समस्या असल्यास व्यासपीठावर मार्गदर्शन करणेत येईल. --

खजुराहो-बनारस सोलो ट्रिप

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 06/12/2025 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
तसा मी अप्रवासी फार कुठे गेलो नाही.पण नुकताच खजुराहो- वाराणसी अशी दहा दिवसांची स्वैर व सोलो टूर करुन आलो. अंशत: नियोजित पण बरीच स्वैर. IRCTC वरुन trial and error बेसीस वर तात्काळ ट्रेन बुकिंग केले. 25 नोव्हे ला सकाळी सोलो बॅग पाठीवर घेउन ट्रेन PUNE GCT SPECIAL ने भोपाळ ला गेलो. तिथे रात्री 12 ला पोचलो. रात्री IRCTC च्या एका दुर्लक्शित ठिकाणी फलाटा बाहेर असलेल्या एका रिटायरिंग रुम इमारतीत अनेकांना विचारत पोचलो. तिथे सामसूम होती. ऒफिस नाही. मग तिथे एका ठिकाणी एका बाईने एक जळमट व धूळीने माखलेली खोली दिली. तोपर्यंत चौकशी करण्यात माझे सर्व भोपाळ स्टेशन फिरुन झाले होते.

म्हटलं तर इडली नाही तर ढोकळा

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 06/12/2025 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
म्हटलं तर इडली नाही तर ढोकळा ==================== --राजीव उपाध्ये  परवाच मी धिरडी केली होती. भन्नाट झाली होती. बायकोने तर मिटक्या मारत खाल्ली, मग लेक म्हणाली -"बाबा, या विकेंडला माझ्यासाठी परत करा." लेकीचा हट्ट पुरवायला काल परत साहित्य जमवायला गेलो तर हवी ती पिठं सापडेनात. म्हणून पर्यायाचा विचार करत असताना हरभरा डाळ आणि पोन्नी तांदूळ शिल्लक असल्याचे लक्षात आले. मग एखाद्या मुक्तकाव्या प्रमाणे पुढील पाकृ जन्माला आली- २ वाटी हरभरा डाळ+ १ वाटी पोन्नी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले.

जोगेश्वर महादेव मंदिर,देवळाणे

लेखक गोरगावलेकर यांनी बुधवार, 03/12/2025 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीनंतर काही महत्वाच्या कामानिमित्त आमच्या मूळ गावी जाणे झाले. सकाळी लवकर निघून नाशिक-मालेगाव-धुळे मार्गे संध्याकाळपर्यंत जळगांव भागात पोहचणे असा नेहमीचा प्रवास. यावेळी आदल्या रात्री नाशिकला मुक्काम झाल्याने आम्हाला पुढच्या प्रवासासाठी भरपूर मोकळा वेळ मिळणार होता. सकाळी साडे आठला नाशिक सोडले . एक दीड तासात चांदवड पर्यंत आलो .

छोटीसी बात, गोईंग डाऊन आणि येरूडकर..- किंडल बुक्स..

लेखक गवि यांनी बुधवार, 03/12/2025 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
तिसरं किंडल बुक आता आलं आहे. यातली शीर्षक कथा मौज प्रकाशनाच्या मौज दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. जी आता केवळ या पुस्तकातच वाचायला मिळेल. इतर अनेक कथा मिपावर आधी आलेल्या आहेत. पण तरीही ज्यांना शक्य आहे त्यांनी हेही पुस्तक किंडलवर वाचावं, संग्रही ठेवावं किंवा किंडल अनलिमिटेडवर विनामूल्य वाचावं. माझी एक विनंती आहे.. की ज्यांना शक्य आहे त्यांनी या पुस्तकाला अमेझॉनवर रेटिंग देऊन (तारांकित करून) आणि रिव्ह्यू लिहून या पुस्तकाला जगभर पोचवण्यासाठी मदत करावी. रिव्ह्यू किंवा मत अगदी दोन चार ओळींत लिहीलंत तरी चालेल.

देवव्रत रेखेच्या यशाची चेताशास्त्रीय (जीव॒शास्त्रीय) चिकीत्सा

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 03/12/2025 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
देवव्रत रेखेच्या यशाची चेताशास्त्रीय (जीव॒शास्त्रीय) चिकीत्सा - राजीव उपाध्ये ३.१२.२०२५  १९ वर्षाच्या एका युवकाने एक नवा इतिहास रचला आहे. बरेच डावे-पुरोगामी त्याच्यावर तुटून पडले आहेत. देवव्रत रेखेने जे मिळवले आहे, त्याचे महत्त्व कमी करण्याचा आटापिटा करताना ते आपला अडाणीपणा आणि ब्राह्मण-द्वेष उघडा पाडत आहेत. उजव्यांच्या अंधप्रेमाबद्दल तर बोलायलाच नको. ’ब्राह्मणांच्या बौद्धिक वर्चस्वाची जीवशास्त्रीय कारणे’ असा एक लेख मी काही वर्षांपूर्वी लिहीला. तो वाचून अनेकांनी नाके मुरडली होती.

थॅंक यु संक्षी !

लेखक उन्मेष दिक्षीत यांनी मंगळवार, 02/12/2025 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
ज्यात देह वावरतोय ते आपण आहोत ! मला माहीत नव्ह्ती अध्यात्माची जादू ! यु न्यु बेटर ! तुम्ही माझ्या चुकांना माफ करत आलात , पण आता शेवटच्या चुकीनंतर माझ्याकडून माफी मागण्याचही डेरिंग झालं नाही ! पण आभार व्यक्त केल्याशीवाय राहावत नाही ! थँक यु फॉर ऑल्वेज केरींग फॉर मी ! वेअर एम आय ? :) - उन्मेष

रंजनाकडून चिंतनाकडे नेणारा लेखकराजा

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 02/12/2025 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
वयाच्या विशीत जेव्हा आपण काही पुस्तके वाचतो आणि ती आवडतात तेव्हा त्यांचे लेखक आपल्या मनावर गारुड करतात आणि त्यातले काही तर कायमचा ठसा उमटवतात. वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत इंग्लिश साहित्याशी काही संबंधच आला नव्हता. नंतर मेडिकलला गेल्यानंतर ब्रिटिश लायब्ररीचा सभासद झालो. खरं म्हणजे त्याचा उद्देश अभ्यासाच्या पुस्तकांसाठी होता. परंतु पहिल्याच दिवशी तिथे पाऊल टाकताच लक्षात आले की, अरेच्चा, इथे इंग्लिश गोष्टीची पुस्तके सुद्धा आहेत तर !

लक्ष लोलक तोलत

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 01/12/2025 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
लक्ष लोलक तोलत उसळते निळी लाट किनाऱ्याशी फुटताना एक अतृप्ती उत्कट मावळतीच्या दिशेला फूल फुटे केशराचे निळ्या घुमटाला पडे कोडे कुण्या नक्षत्राचे तोल ढळण्या आधीच हस्तिदंती मनोऱ्याचा कोष आवळून घेतो मीच माझ्या भोवतीचा

परखड

लेखक नाहिद नालबंद यांनी सोमवार, 01/12/2025 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
यामुळे वाट्यास माझ्या रोज परवड बोलतो कायम म्हणे मी फार परखड वेळ येता कर्जमाफीची बळीच्या मग तिजोरी शासनाची जाम खडखड एकही नेता गुणी ना भ्रष्ट सारे भाषणे आता तयांची हीन बडबड इंग्रजीला शक्य तितकी टाळतो मी टिकविण्या करतो मराठी हीच धडपड यामुळे हरकत तयांची लेखनाला वापरत नाही कधी मी शब्द जडजड
काव्यरस