Skip to main content

India's biggest cover up: अनुज धर ह्यांच्या २० वर्षांच्या नेताजींच्या रहस्याच्या अभ्यासाचा निष्कर्ष

लेखक मार्गी यांनी शनिवार, 13/08/2022 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार. नेताजी सुभाषचंद्र बोस! लहानपणापासून त्यांच्याबद्दल अतिशय आत्मीयता वाटते. "महानायक" आणि "नेताजी" अशी मोठी पुस्तकं व इतर अनेक पुस्तकांमधून त्यांचा परिचय झाला. नव्हे त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना मनावर बिंबली होती. लहानपणापासून त्यांचं वेगळेपण, त्यांचे विचार, त्यांची बंडखोर वृत्ती, शाळा- महाविद्यालयातील पराक्रम, नंतर ब्रिटनमधील शिक्षण, गांधीजींना विरोध, दुस-या महायुद्धामध्ये केलेला अभूतपूर्व प्रवास, परकीय देशांमध्ये जपलेला स्वाभिमान, देश प्रेम, पुन: एकदा रोमांचक पाणबुडी प्रवास, पूर्व आशियातील रोमहर्षक महाभारत आणि... असे सर्व प्रसंग मनावर कोरले गेले होते.

अधुनिक तीर्थक्षेत्रे....

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 12/08/2022 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
राजगुरुनगर ते हुसैनीवाला...... "मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम कि, मैं ‘इश्क’ भी लिखना चाहूं तो ‘इंकलाब’ लिखा जाता है..." - हुतात्मा भगतसिंग २३ मार्च १९३१ ला भगतसिंग, राजगुरू आणी सुखदेव यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी दिली.ही बातमी रत्नागिरी येथे स्थानबद्ध आसलेल्या स्वातंत्र्यवीरांना दुसरे दिवशी कळाली.निर्माण झालेल्या मनःक्षोभातून खालील कविता त्यांनी लिहीली आणी देशप्रेमी तरूणांनी गुपचूप कठंस्थ करून रत्नागिरीत प्रभातफेरी काढली आणी सारे नगर देशभक्तीच्या घोषणांनी दणाणून सोडले होते. "हा भगतसिंग, हाय हा                    

व्यायामशाळेचं रहस्य

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शुक्रवार, 12/08/2022 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
व्यायामशाळेचं रहस्य ------------------------- ( ही कथा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित आहे . स्वातंत्र्य चळवळीचे काही संदर्भ सोडता कथा काल्पनिक आहे . ) बालकथा - मोठा गट ------------------------------------------------------------------------------------------- ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली . एका बालचित्रकाराची . आणि एका मोठ्या प्रसंगाची ... ----- “ ए मामा , दाखव की तुमची व्यायामशाळा , “ शिरीष म्हणाला . शिरीष आठवीतला मुलगा . उन्हाळ्याच्या सुट्टीत तो आजोळी आला होता. गोपाळमामाशी त्याचं चांगलं जमायचं . पण व्यायामशाळेनं काहीतरी घोडं मारलं होतं बहुतेक .

टू बी ऑर नॉट टू बी (अर्थात या बी चे करायचे काय?)

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 12/08/2022 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
"टू बी ऑर नॉट टू बी?" असा गहन प्रश्न रॉबर्ट वेलिंग्टनकर या माणसाला पडला होता म्हणे. अहो, "नावात काय आहे?" हेसुध्दा तोच म्हणाला होता ना! पण हाच प्रश्न मला पोह्यांमध्ये लिंबू पिळतांना नेहेमी पडतो. पण मला पडलेल्या प्रश्नातील बी म्हणजे लिंबाची बी बरं का! असो, तर मूळ मुद्दा असा आहे की पोह्यात लिंबू पिळण्याआधी बिया (कारल्याच्या सॉफ्ट बहिणी) निघून जाव्या म्हणून अर्धा कापलेला लिंबू जर आपण प्लेटबाहेर हलकाच दाबला तर हटकून त्यातील रस निघून वाया जातो पण बिया मात्र हट्टाने लिंबामध्येच राहतात.

ओल्या नारळाची बर्फी

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 12/08/2022 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
करायला गेले नारळाची वडी झाली नारळाची चिक्की असो. साहित्य: S एक फुलपात्रं ओल्या नारळाचा चव अर्धे फुलपात्रं साखर दोन चमचे तूप विलायची पावडर रोझ सिरप २-४ चमचे मिल्क पावडर/दुधाची साय सजावटीसाठी सुका मेवा नानस्टिक कढईत साजूक तूप किंचित गरम करायचे. ओल्या नारळाचा चव (काळा भाग नको शक्यता) आणि साखर एकत्रित करून कढईत परतायची.मंद आच ठेवायची. साखर विरघळली की त्यात विलायची पूड,रोझ सिरप टाकायचा.मिश्रण परतत राहायचे. न्यूटनचा नियमानुसार उचटन सरळ उभं राहिलं की गॅस बंद करायचा किंवा मिश्रणाचा छोटा पेढ्या ए

मिपाकट्टा २०२२: पावसाळी भेट - मोहाडी

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 11/08/2022 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक १५ ऑगस्ट २०२२, सोमवार मिपाकट्टा - पावसाळी भेट मोहाडी, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे आयोजित केली आहे. अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदीर (लाकडी बांधकाम. रंगकाम एक नंबर) गोसावी समाज साधू मंदीर नवनाथ मंदीर मोहाडेश्वर मंदीर अहिल्यादेवी बारव मोहाडमल्ल देवस्थान सोमवंशी वाडा ग्रामपंचायत कार्यालय सह्याद्री फार्म कारखाना भेट व तेथेच जेवण (जेवणाचा हेडकाऊंट आधीच सांगावा लागेल) परततांना नाशिक एअरपोर्ट पाहता येईल. तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत मोहाडी येथे जमावे. नाशिक सीबीएस सीबीएस वरून सीटीलींक बसने ( किंवा एसटी बसने) १०वा मैल स्टॉप. (ओझर, पिंपळगाव लोकल बस पकडा.

तृष्णा भयकथा - ४

लेखक साहना यांनी गुरुवार, 11/08/2022 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
संदीपची गाडी भरधाव वेगाने ओल्ड सिटी रॉड वर जात होती. संदीप अतिशय शिताफीने वळणे घेत होता. त्या अरुंद रस्त्यावर तशी वर्दळ नव्हतीच. संदीप शहराच्या मुख्य भागी आला तेंव्हा त्याला आधीप्रमाणेच एक ओढ जाणवली. मेघदूत कॅफे चालू होता. गाडी सावकाश चालवत संदीप ने दोन्ही बाजूने पाहत कुरियर कंपनी चे ऑफिस शोधायचा प्रयत्न केला. आणि नंतर त्याला आठवले की ते ऑफिस अगदी शेवटी होते. बेलकीन अँड वॉरेन कुरिअर सर्विस. "अजब आहे" संदीप पुटपुटला. त्याला DHL ठाऊक होते, Bluedart ठाऊक होते. अगदी पाळंदे कुरियर सुद्धा ठाऊक होते पण बेलकीन अँन्ड वॉरेन अगदी प्रत्येक रेल्वेस्टेशन वर जसे व्हीलर बुक शॉप असते तसे इंग्रजी वाटत होते.

नाते प्राजक्ताचे

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 10/08/2022 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळपासून पावसाची रिपरिप चालू आहे. श्रावणातला पाऊस तो हत्ती सारखा थोडाच कोसळणार. दररोजची प्रभातफेरी चुकली. येताना देवपूजेला फूले घेऊन येण्याचा नित्यनेम. लाईट नव्हती, पाच माळे उतरून खाली जावे की न जावे द्विधा मनस्थितीत. नित्यनेम चुकला की दिवसभर रुखरुख लागते. त्यापासून वाचण्यासाठी खाली उतरायचे ठरवले. विचारमग्न अवस्थेतच पाचव्या मजल्यावरून खाली आलो,छत्री विसरल्याचे लक्षात आले. अरे देवा! आता पुन्हा पाचा वर जावून शून्यावर यायचे.जाऊ द्या थोडं भिजल्याने काय होणार आहे ?

जंगली जयगड ट्रेक २२.०५.२०२२

लेखक Vivek Phatak यांनी मंगळवार, 09/08/2022 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
जंगली जयगड ट्रेक २२.०५.२०२२ जंगली जयगड हा किल्ला अतिशय घनदाट वनश्रीने नटलेल्या Koyna Wild Life Sanctuary (Koyna WLS) मधे वसलेला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील नवजा हे किल्याचे पायथ्याचे गाव. १०-१५ घरांचे अतिशय सुंदर टुमदार गाव. प्रत्येक घरापुढे अंगण, अंगणात फणस, आंबे, पेरू आणि भरपूर फुलझाडे. नवजा हे तेच गाव जिथे गेल्या पावसाळ्यात एका दिवसात देशातील सर्वाधिक पाऊस पडला होता आणि अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या.