Skip to main content

कळा ज्या लागल्या जीवा...

लेखक मी-दिपाली यांनी शनिवार, 22/07/2023 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
IMG-20230722-102149 ही पोट्टी मी तिच्याबरोबर केलेल्या गोष्टींचं उट्टं भरून काढायला लागलीये. मलाच अवदसा आठवली आणि 'दुखतंय का' असं प्राकृत भाषेत विचारण्याऐवजी शुद्ध मराठीत विचारलं, “ पेन होतंय का ?

कर जरा कंट्रोल...! :-)

लेखक चलत मुसाफिर यांनी शुक्रवार, 21/07/2023 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
किती ते मेसेज लिहितो अन् मला छळतोस तू कर जरा कंट्रोल बाबा का उगा जळतोस तू मित्र मज असले जरी पैशास येथे पासरी तुज नको कसलीच चिंता तू मला सर्वोपरी राग का यावा तुला हे गूढ मजला नाकळे लिस्टातला तो एकजण, नाही कुणी रे आगळे फक्त कॉफीचे निमंत्रण एक मी स्वीकारले चार घटका हास्य, गप्पा यामधे वाहावले ठेवला मी फोन होता मूक सारा वेळ तो एवढीशी चूक झाली, मजवरी का उखडतो नाहि जमला घ्यायला रे फोन तव तेथे मला बिल कुणी भरणार माझे, मित्र जर रागावला? शंका नको घेऊ जरा तू निखळ मैत्री ही असे माझिया डीपीवरी तो फक्त 'लाईक' देतसे एकदा केवळ तयाने टाकला होता बदाम सोड तो तू विषय त्याला अर्थ नसतो एक छदाम बिघडले कोठे

स्वप्नजा!

लेखक राघव यांनी गुरुवार, 20/07/2023 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांनी एक रोमँटिक कविता झाली!! :-) कोण तू, माझी कुणी आहेस का? स्वप्नजा.. जागेपणी आहेस का? त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी.. ब्रह्मकमळाची सखी आहेस का? चाल नुपुरांची किती अलवार.. नाजुक! चालुनी येते खरी आहेस का? राग छेडी तार हृदयाचीच माझ्या.. अजुनी तू "रागा"वली आहेस का? काल मज दिसलीस तू होती म्हणूनी.. आज वाटे, तू उद्या आहेस का? --- का तुझा मी शोध घेतो पण, निरंतर? सर्वस्व माझे व्यापुनी आहेस का? राघव [१९ जुलै २३]
काव्यरस

जुलाबावरील जीवरक्षक प्रथमोपचाराचा मौलिक शोध

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 19/07/2023 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
"हगवणीवर बहुगुणी मीठ साखर पाणी" या शासकीय जाहिरातीने आपल्या सामाजिक आरोग्य क्षेत्रात दीर्घकाळ अधिराज्य गाजवलेले आहे. अतिशय सोपा असलेला हा घरगुती प्रथमोपचार म्हणजे जुलाबाच्या रुग्णांसाठी वरदान असते. जुलाब ही पचनसंस्थेशी संबंधित असलेली समस्या जगभरात मोठ्या प्रमाणात आढळते. मुळात जुलाब हा ‘आजार’ नाही, परंतु ते काही आजारांचे एक लक्षण आहे. विविध प्रकारचे सूक्ष्मजीव संसर्ग आणि अन्नातून झालेली विषबाधा ही त्याची प्रमुख कारणे. जुलाबाद्वारे शरीरातून मोठ्या प्रमाणात पाणी आणि क्षार बाहेर टाकले जातात. त्यामुळे चयापचय आणि रक्ताभिसरणावर विपरीत परिणाम होतो.

चीझी पालक मका

लेखक Bhakti यांनी बुधवार, 19/07/2023 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
A पालकावर माझा विशेष लोभ आहे.पण आतापर्यंत तो पाण्यात उकळून प्युरी करत धपाटे,पुरी,पालक पनीर,पालक इडली -डोसा,पालक चिला असेच बनवले आहे.नुसता न उकळता चिरून पीठ पेरून भाजी घाईच्या वेळेत होते.डायट पाळणं सात दिवस झालं जमलंच नाही. मका होता पालक होता.न उकळता फक्त पालक चिरून तेव्हा झटपट रेसिपी केली. साहित्य -दोन वाटी उकडलेले मक्याचे दाणे,अर्धी जुडी चिरलेला पालक, अर्धा चिरलेला कांदा, लसूण, एक चमचा मैदा,तीन चमचे दूध ,२५ ग्रम चीझ, एक चमचा हर्ब्स,तिखट , मीठ चवीनुस

हे सुरांनो चंद्र व्हा

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 19/07/2023 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.esakal.com/desh/woman-climbs-tower-in-madhya-pradeshs-shivp… या बातमीवर कविता (कुसुमाग्रजांची क्षमा मागून) हे सर्वांनो, तारयंत्र व्हा! हे सर्वांनो, तारयंत्र व्हा! नांदण्याचे निरोप माझ्या प्रियकराला पोचवा ॥ वाट एकाकी प्रेमाची, हरवलेल्या बाईमाणसाची, बरसुनी आकाश सारे, अमृताने नाहवा ॥

वयाच्या ४० नंतर राजकारणात प्रवेश

लेखक एकुलता एक डॉन यांनी मंगळवार, 18/07/2023 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार तसे बरेच लोक जुन्या धाग्यावरून ओळखतात सॉफ्टवेअर मध्ये काम करून कंटाळला आलाय जास्त पैसे पण जमा नाही आणि ओळखी पण नाही अश्या वेळी राजकारणात कसे जावे १) सरकारी नोकरी पकडून ओळखी वाढवावया मग तिकीट मिळवावे ? २) सतरंज्या उचलण्यापासून सुरु करायचे ३) काहीतरी पराक्रम करायचा ४) वाळू सप्लाय किंवा बिअर बार सारखे सुरु करायचे

रानभाजी - आघाडा

लेखक आलो आलो यांनी सोमवार, 17/07/2023 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्याप्रमाणे आजहि सकाळी भुईकोट किल्ला परिसरात आमच्या मातोश्री फिरायला गेल्या व येताना "आघाडा" या रान वनस्पतीला घेऊन आल्या. हाडाची शिक्षिका असल्याने आधी सर्वांना त्या भाजीचे महत्व समजावून सांगितले व नंतर हळुवारपणे भाजी निवडून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून काढली .... नंतर जिरे, मोहरी, मीठ,मिरची, थोडासा दाण्याचा कुट व लसूण एव्हढ्या अल्प सामग्री च्या बळावर अफलातून अशा चवीची हि पालेभाजी खाऊ घातली. आईकडून समजलेली माहिती हि अशी : पावसाळा सुरु झाला कि बहुतांश ठिकाणी रानभाज्यांना बहर येतो.

वार्तालाप (16) भगवंताचा आशीर्वाद घेणारे वैज्ञानिक असतात का?

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 17/07/2023 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
समर्थांनी म्हंटले आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे॥ परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥ इसरोच्या वैज्ञानिकांनी तिरुपति येथे जाऊन भगवंताचे आशीर्वाद चंद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी घेतले. ते वैज्ञानिक होते, तरीही त्यांनी भगवंताचे आशीर्वाद घेतले ही बातमी वाचल्यावर अनेक अतिविद्वान लोकांच्या पोटात दुखू लागले। स्वत:ला पुरोगामी समजणार्‍या अतिविद्वानांनी सोशल मीडियावर देशाचा मान सम्मान वाढविणार्‍या वैज्ञानिकांची खिल्ली उडविन्याचा दारुण प्रयास केला. "सत्यासाठी शिरले असत्याच्या गाभार्‍यात" अशाही टिप्पणी झाल्या.

पाऊस: २

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 16/07/2023 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस: १ ग्रीष्म भाजून काढत होता, काळ्याभोर मातीवर पडलेल्या भेगा जशा काही तृषार्त झाल्या होत्या, पिवळेजर्द वाळलेले गवत नव्या हिरवाईची आतुरतेने वाट पाहात होते, काळाकभिन्न राकट सह्याद्री अंगावर जलधारा झेलण्यासाठी जणू व्याकुळ झाला होता, अल्लड, अवखळ नद्या नव्या प्रवाहांना सामावून घेण्यासाठी आतुर झाल्या होत्या. a