Skip to main content

आयुष्य

लेखक सागरसाथी यांनी शनिवार, 05/08/2023 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
निर्णय चुकतात, चुकू द्यावे श्रेय हुकतात, हुकू द्यावे जगता जगता आयुष्याकडून जुगारातले दान घ्यावे. बंध सुटतात,सुटू द्यावे माणसं तुटतात, तुटू द्यावे जगता जगता नात्याकडून आपुलकीचे फुल घ्यावे. मार्ग चुकतात, चुकू द्यावे रस्ते सरतात, सरु द्यावे चालता चालता रस्त्याकडून सावलीचे दान घ्यावे. प्रश्न पडतात, पडू द्यावे उत्तरं चुकतात,चुकू द्यावे सोडवता सोडवता उत्तराकडून ज्ञानाचे कण घ्यावे. ध्येय हुकतात, हुकू द्यावे अनुभव मुकतात, मुकू द्यावे जगता जगता अनुभवाकडून स्वत्वाचे भान घ्यावे. ------ अभय बापट ०५/०८/२०२३

कथा स्मशानातील लग्नाची

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 05/08/2023 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
तो जहाल नास्तिक होता चुकूनही त्याने कधी देवाला नमस्कार केला नव्हता. अंधश्रद्धेच्या विरुद्ध चालणाऱ्या मोहिमेत तो नेहमीच पुढे राहायचा. देवी देवतांची आणि संत महात्म्याची निंदा केल्यामुळे त्याला कधी-कधी मारही खावा लागायचा. पण समाजाच्या हितासाठी एवढे कष्ट तर सहन करावेच लागतात, असे त्याचे मत होते. त्याने स्वतःचे लग्न स्मशानात करण्याचे ठरविले. परिणाम वयाची पस्तीशी उलटली तरी त्याचे लग्न जमले नाही. शेवटी एक हुशार मुलगी त्याच्याशी, त्याच्या अटींवर लग्न करायला तयार झाली. पण त्यासाठी त्याला तिच्या बापाला लग्नापूर्वी हुंडा म्हणून रोख दहा लाख द्यावे लागले. त्याने लग्नाची जय्यत तयारी सुरू केली.

खेळीया शब्दांचा

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 05/08/2023 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
कसे स्मरतात शब्द त्यांना नित्य कवीता बांधती त्याच वाटा, त्याच लाटा, तोच चंद्रमा अन् त्याच चांदराती शिशिर तोच ,वसंत तोच,तेच क्षितिज, भुवरी टेकले उगवती अन् मावळती तीच,अंबरात तेच रंग पेरले गुंजारव तोच, तोच मधुप, तीच राधा बावरी तोच कृष्ण सावळा, तरी नित्य वेगळे कवन यावरी ‐------------------------------------------------ भरतीचा रौद्र रूप,परतीचा अंतरंग दावतो कर्कटांनी रेखाटलेला किनारा नित्य नवा भासतो कधी पूर्ण चंद्र,कधी चंद्रकोर कधी लखलखत्या चांदण्या घन तमीचा शुक्र तारा, प्रेरणा कवन बाधंण्या इवल्याशा पावलांनी कृष्ण दुडूदुडू धावतो क्रदंनी सावळ्याच्या सुर बांसूरीचा घावतो शिशिर तोच,तोच वसंत

कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -४

लेखक भागो यांनी शुक्रवार, 04/08/2023 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -५ “राघव, तुझा घसा कोरडा पडलेला दिसतोय. तू थोडं थंड डायहायड्रोजन मोनाक्साइड पी. बरं वाटेल. मग आपण सावकाश बोलू.” डॉक्टर शास्त्री बोलले. डायहायड्रोजन मोनाक्साइड? आता हा कोण जादुगार? मला डायहायड्रोजन मोनाक्साइड प्यायला देणारा? निश्चितच हे आपल्याला हे पेय पाजूून आपले प्रेत बनवून, कॉॉफिनमध्ये टाकून देशाबाहेर घेऊन जातील. “वेट ए मिनिट. तुम्ही जादूचे प्रयोग बघायला जाता का? नका जात जाऊ. गेलात तर संमोहनाच्या प्रयोगाला स्वयंसेवक म्हणून तरी पुढे जाऊ नका.

कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -४

लेखक भागो यांनी शुक्रवार, 04/08/2023 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -५ “राघव, तुझा घसा कोरडा पडलेला दिसतोय. तू थोडं थंड डायहायड्रोजन मोनाक्साइड पी. बरं वाटेल. मग आपण सावकाश बोलू.” डॉक्टर शास्त्री बोलले. डायहायड्रोजन मोनाक्साइड? आता हा कोण जादुगार? मला डायहायड्रोजन मोनाक्साइड प्यायला देणारा? निश्चितच हे आपल्याला हे पेय पाजूून आपले प्रेत बनवून, कॉॉफिनमध्ये टाकून देशाबाहेर घेऊन जातील. “वेट ए मिनिट. तुम्ही जादूचे प्रयोग बघायला जाता का? नका जात जाऊ. गेलात तर संमोहनाच्या प्रयोगाला स्वयंसेवक म्हणून तरी पुढे जाऊ नका.

अमेरिका १- उडतं वडाप

लेखक निमी यांनी शुक्रवार, 04/08/2023 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मी आणि माझे हे नुकतेच आमच्या मुलीकडे अमेरिकेला (प्रथमच) कॅलिफोर्निया येथे गेलो होतो. त्यावेळी प्रवासादरम्यान काही लेख लिहिले.. त्यातील हा पहिला भाग. .... ज्यांनी विमान प्रवास केलेला नसतो त्यांना त्याचं खूप अप्रूप असतं, ज्यांनी थोडाफारच केलेला असतो त्यांना कणभर अहंकारही असू शकतो, पण माझ्यासारखे... ज्यांनी 'मण'भर आणि 'मन'भर प्रवास रेल्वे, टमटम, हातगाडी, एस्. टी, बस, रिक्षा, लोकल्स्, ट्रेन, टू व्हीलर,फोर व्हिलर आणि स्वतःची 11 नंबरची पायी गाडी असा केलाय, ते मान्य करतील की विमान प्रवास तसा फारसा सुखाचा नसतो.

ना. धों. महानोर-एक सांगितिक श्रद्धांजली

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 04/08/2023 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सरांनी ना. धों. महानोरांबद्दल मिपावर सुंदर लेख लिहीला आहेच, पण तरीही राहवले नाही म्हणुन माझ्याकडुनही चार ओळी ======================================= ना. धों. महानोर गेल्याचे काल पेपरात वाचले. आणि सर्रकन मन भूतकाळात गेले. मी चौथी/पाचवीत असेन. नुकतेच रंगीत टि.व्ही. आले होते आणि त्यावर "चिंब पावसानं रान झालं आबादानी" गाणं लागलं होतं. सूर्/ताल वगैरे कळण्याचं वय नव्हतं तरीही ते धिन तांग तांग्,धिधिन तांग तांग डोक्यात बसलं. गाणं आवडुन गेलं. पुढे कित्येक दिवस तेच मनात घोळत होतं. मग रेडिओवर "मी काट्यातुन चालुन थकले" ऐकलं आणि तेही आवडलं.

'बाट्या' (पुणेकर झालेल्या इंदोरकराची व्यथा)

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 04/08/2023 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा १: पेर्णा २. ( काटा रुते कुणाला ) 'बाट्या' हव्यात मजला ऐकीत नाही कोणी मिळतील का पुण्यात ठावे कुणास नाही विसरू कशी आता मी इंदोरची ती बाटी पुणे-तेथ कायुणे भलतीच बात खोटी स्वगृही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे भार्या पुणेकरिण ती हा दैवयोग आहे सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची बाट्या न खात जगणे मज शाप हाचि आहे हे भाग्य वंचना की काहीच आकळेना आयुष्य ओघळोनी मी रिक्त-पोट आहे.

ना.धों.महानोर

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 03/08/2023 14:46 या दिवशी प्रकाशित केले.

पद्मश्री ना.धों.महानोर. मराठी साहित्यातील मोठं नाव. कविता, कादंबरी, नाटक, कथा. असे सर्वच वाड्मय प्रकार त्यांनी हाताळले. शिकत असताना गांधारी कादंबरी अभ्यासाला होती. ना.धों.महानोरांची ही पहिली ओळख. मग रानातल्या कविता, अजिंठा हे दीर्घ काव्य अनेकदा वाचून काढले आहे. पुढे, पावसाळी कवितांनीही वेड लावलं. शेती-मातीच्या कविता त्यांच्या वाचनात आल्या. जैत रे जैत, सर्जा, विदूषक, दोघी या चित्रपटातली गाणी कायम ओठावर रेंगाळत राहीली. आमच्या महाविद्यालया पासून त्यांचं पळसखेडा हे गाव जवळच आहे. अजिंठा डोंगर रांगा आणि जंगल सर्व हिरवेगार वनराईचा परिसर.