Skip to main content

कुणाच्यापुढे कोण झुकले बघा रे

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 21/10/2015 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाच्यापुढे कोण झुकले बघा रे कुणा बोलुनी कोण चुकले बघा रे कुणी होत वाचाळ थयथय उगाच कुणी शांत राहून ठेवीत जाच कसे सिद्ध होईल श्रेष्ठत्व त्याचे असे सैन्य नाठाळ ज्या राजियाचे कृतीतून ठरते इथे कोण वाघ मुखे बोंबलोनी करी काय सांग एकीत असते रहस्य यशाचे तुम्हाला महत्व न पटले अशाचे तुम्ही स्वाभिमानात धन्य जहाला तिथे एक चेहरा भुलवतो जगाला असे वेळ हाती न वागा असे रे कशाला करावे स्वतःचे हसे रे इथे संधी सर्वांस आहे समान भूतापरी हो जपा वर्तमान जसा जन्मतः वाघ ना वाघ झाला करोनीच हो दाखवा या जगाला -अपूर्व ओक ब्लॉग दुवा हा

से ह वा ग!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 21/10/2015 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
से ह वा ग! वीरेंदर सेहवाग! खराखुरा वीरोत्तम! क्रिकेटशी परिचित असलेल्यांना सेहवागबद्दल काहीही सांगायची गरज नाही. पण इथे सेहवाग एक क्रिकेटर म्हणून नव्हे तर एक अभिव्यक्ती म्हणून विचार करूया. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून त्रिशतक करणारा एकमेव फलंदाज (तेही दोन त्रिशतके!); अत्यंत जलद गतीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी करणारा आणि आश्चर्यकारक प्रकारे सातत्य दाखवणारा (२००९- १० मध्ये शिखरावर असताना ५४ ही कसोटी सरासरी सलामीवीर म्हणून) आणि सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गांगुली, लक्ष्मण अशा ता-यांच्या समोरही स्वत:चा वेगळा प्रभाव निर्माण करणारा असा हा वीरू!

मालवणी समुपदेश आणि शेजारचा बायो [मनमोहन रोगे]

लेखक दिवाळी अंक यांनी बुधवार, 21/10/2015 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
. . जवळची होकाल कुरडी भासता, कारण तेच्या डोळ्यातला कुसाळ दिसता लांबची होकाल चोकट गमता, कारण तेनी सोसलेला मुसळ म्हायत नसता लांब आसतत तेव्हा सगळेच सगे-सोयरे मदत करूची येळ इल्यार कुणी कुणाचे नायरे म्हणूनच म्हणतात दुरून डोंगर साजरे पण डोंगरात घुसल्यार दिसतत सगळे काजरे हातातल्या काकणाक कित्या होयो आरसो? म्हागडो गॉगल लावल्यान तरी डोळ्यान तिरसो टिचभर तवशात हातभर

भूssकंssप!!!!!

लेखक Sanjay Uwach यांनी बुधवार, 21/10/2015 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
. . प्रेषक : Sanjay Uwach विषय : विनोदी कथा. भूssकंssप!!!!! कोल्हापुरातील शिवाजी पेठेत आम्ही त्या वेळी राहत होतो. विशेषतः हा भाग 'वरुणतीर्थवेश' या नावाने प्रसिद्ध होता. त्या काळातील ती जुनी वाडावजा घरे म्हटली की कौलारू घरे, पुढे मोठे अंगण, त्यानंतर बैठकीसाठी असणारा सोपा, मग माजघर, त्यानंतर असणारे स्वयंपाकगृह, त्यात असणारी ती कोठीची खोली व मागे असणारी नहाणी, असा हा सगळा घरांचा प्रकार होता.

माझी शाळा: मोठेपणीचा निबंध!

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 21/10/2015 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
काय भुर्रकन गेले ते दिवस! शाळेचे! कळलंसुद्धा नाही! कॉलेजात जायच्या आणि पुढे काहीतरी बनायच्या ध्येयापुढे आपल्या बालपणाच्या सोनेरी पानाला आपण अगदी सहज, उडत्या पांढर्‍या म्हातारीला तिच्या बीमधून काढून एकेक करून वार्‍यावर भिरकावून द्यावं तसं भूतकाळाच्या अंगणात नेमाने रतीब घालत टाकून आलो. आता ते बालपणाच सोनेरी पान दुरून फक्त पाहता येतं. परत मिळवता येत नाही, इतकंच कशाला, त्याला स्पर्शही करता येत नाही! मुकलो त्याला कायमचंच! आज मेंदूला ताण देत वर्गातल्यांची नावे आठवावी लागतात.

नवरात्र जल जागर : माळ नववी

लेखक नाखु यांनी बुधवार, 21/10/2015 09:19 या दिवशी प्रकाशित केले.

स्थापत्य - एक कला भाग १

लेखक प्यारे१ यांनी बुधवार, 21/10/2015 03:14 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः मी एक मारुन मुटकून स्थापत्य अभियंता आहे. लेखात मांडलेली मतं ही इंजिनिअरींगच्या थोड्याफार अभ्यासात व आतापर्यंतच्या अनुभवावरुन मांडलेली असून ती जशीच्या तशी खरी असण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. या उप्पर जाणकार व्यक्तींना या मध्ये अधिक भर घालायची असल्यास अथवा दुरुस्त करावयाची असल्यास सप्रमाण मांडून व्यक्त केल्यास त्यांचे स्वागत आहे. या लेखमालेमध्ये जमेल तशी भर घालत राहण्याचा प्रयत्न आहे मात्र त्या लेखमाला सोडून इतर पालथे धंदे करताना आढळल्यास हिणवू नये ही नम्र विनंती. आमचा तोच मुख्य व्यवसाय आहे. लेखमालेमध्ये आनुषंगिक इंग्रजी शब्द येतील. अनुवाद सुचवावेत.

काहूर

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 21/10/2015 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
" आयं, भायर कावदान सुटलयं" म्या पाटीवर पिन्शीलीनं गिरगुट्या मारत मनालु, पर आय भाकऱ्या थापतच ऱ्हायली, म्या पण नुसतं तिच्याकडं बघत ऱ्हायलु. आय कायच बुलली नाय. मग म्या ऊठून कवाड ऊघडलं, भाईर रिपीरीपी पाऊस लागला हुता. छपराच्या वळचणीवरचं थेंब म्या हातात धरलं. मग त्यनंच हात धुतलं. मग पुना थेंब थेंब पाणी हातात धरलं, परत त्यनंच हात धुतलं. भिताडाच्या कडकडनं जाऊन मी गोठ्यात नजर मारली. आमची जरशी गाय गरीब बापुडी. अंधारात बसली हुती. म्या तिकडं गीलू न्हाय. पावसाचं टपोरं थेंब वट्यावर पडाय लागलं, मग माज्या बी पायावर शितुडं उडाय लागलं. उंबऱ्यावर पाय पुसून म्या पुना घरात गीलू.

मायें...

लेखक आनंद कांबीकर यांनी मंगळवार, 20/10/2015 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण मनाला कुरताड़ते, तुझं आणवाणी पायाणं रानं धुंडाळनं तापत्या उन्हात, अड़मुठ्या पावसात अन् गारठ्यात मिळलं ते काम करणं आज ही जेव्हां ऑफिसला निघतो, अरशात दिसतेस तु तळपत्या ढेकाळात, ललाटावरच्या कुंकवासगट घामाच्या धारांत लतफत उभी. तुझ्या हातातलं खुरपं माझं काळीज कापतं. तु ढेकळं फोडायचीस मला चारान्याची पेन्सिल देण्यासाठी. दिवाळी ला ठिगळं लाउन नाटी नवी करायचीस खाकी चड्डी मात्र कोरी शिवायाचीस. लई भोगलस तू माझ्यासाठी अता तुला गावांत ठिवनार नई बस्ं झालं तुरःट्या म्होरं सारुण धुर फुंकनं ती फुंकनि चुलीत घालून, येणार आहे मी आज तुला हिकडं घेऊन.

चालत राहू......

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 20/10/2015 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
रेषांसंगे चालत आलो, रेषांसोबत चालत राहू, गति नाही, स्थिती नाही, केवळ लय, चालत राहू. उठल्यावरती सूर्य नाही, थकल्यावरती चंद्र नाही कुठला देश, कुठले घरटे, आपली कुडी, चालत राहू. जंजाळाशी रडणे नाही, गुंत्यापाशी थटणे नाही, कोण आले, कोण गेले, कुणी न उरले, चालत राहू. दार लोटले अंधार नाही, दार उघडले प्रकाश नाही, आला दिवस, गेला दिवस, आत्ताचा क्षण, चालत राहू. नाव उलटली आक्रोश नाही, नाव तरली जल्लोष नाही, कुठली लाट, कुठली वाट, आपला किनारा, चालत राहू.