Skip to main content

तुझ्या आठवणीत. ..

लेखक माहीराज यांनी गुरुवार, 22/10/2015 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
सजलेेली लाट.. नटलेले पाणी... तुझ्या आठवणीत गातो पुन्हा सुचलेली गाणी.. दुर उठलेल्या लाटेचे किनार्याशी गोड नाते.. ते पाणी खारट थोडे अमृताहुन ही गोड वाटे.. ओल्या सांजवेळी किरणे वाळुत शिंपडावी.. ध्यानी मनी नसताना तु किंचीत जवळ यावी... मी बावरताना..
काव्यरस

दळींद्रं

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 22/10/2015 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
तोंडात माणिकचंद रिकामा करुन बब्यानं गस्टेल नेम धरुन रिंगणात फेकला. तशी आदीली रिंगणाभाईर आली. पण गस्टेलबी थोडा रिंगणाला लायनीला शिवत पडला. "बल्ल्या " उड्या हाणत संत्या, राम्या, आन राजा किंचाळली. बब्यानं पळतच जाऊन गस्टेल नीट बघितला. " ये आरं आतच हाय की " चवड्यांवर बसुन बब्या पोरांकडं बघत म्हणाला. मग संत्यानं एक बारकिशी काटकी घीऊन रिंगणाच्या लायनीवर हळुहळु फिरवली. बाकीची पोरं नीट नजर लावुन बघाय लागली. गस्टेल थोडासा हलला. "बल्ल्या " पुन्हा एकदा पोरं ऊसळली. "ये बल्ल्याच झालाय, टाक आजुन येक आदीली" संत्या सुड ऊगवत म्हणाला. माणिकचंदची पिचकारी मारत बब्यानं खिशात हात घातला. त्याच्या खिशात शंभर गोष्टी.

अन्नदाता सुखी भव भाग ५ - नव विचार

लेखक शेखरमोघे यांनी गुरुवार, 22/10/2015 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 प्रचलित आणि रूढ विचार पद्धतीच्या विरुद्ध विचार बाळगण्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतील, याचे उत्तम उदाहरण म्हणजे Galileo Galilei (मराठी टंकताना पडलेला प्रश्न : "ग" वरचा अर्धचंद्र google मध्ये काही केल्या जमत नाही, काय करायला हवे ह

“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 22/10/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.

“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!


शेतमालाचे भाव वाढले की
आपला जळफळाट होतो...कारण
आपल्या मनात दडी मारून
बसला आहे एक रावण

आपल्या मनातल्या रावणाला
सीता पळवून न्यायची असते
भूमीतून निपजलेल्या वस्तूंची
किंमत मोजायचीच नसते

आमची मानसिकता रावणीच
संधी मिळताच जागी होणारी
पोशिंद्याला सदैव अशोकवनात
बंदिस्त ठेवू पाहणारी

कधी मरेल हा रावण
तुमच्या आमच्या मनातला?
आणि कधी होईल मुक्त
बळीराजा रानातला?
काव्यरस

फेर..

लेखक आनंद कांबीकर यांनी गुरुवार, 22/10/2015 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
एस टी तुन उतरलें तेव्हा बरीच रात्र झालेली. पाऊस थांबला असला तरी ढगांचा निचरा झाला नव्हता. पुन्हाकधी बरसायला सुरुवात होईल याचा नेम नव्हता. तिथुन गांव अजुन कोस भर दुर. लवकर गांव गाठायला हवं तसच ओढाही भरला असल याचा अंदाज घेत त्याने मधली वाट धरली. मधेच एखादी विज चमकायची अाणि वाट दिसायची. तो वाट काढत समोर तर दोन वर्षाच्या चिमुरडीला छातीशी कवटाळुन ती त्याच्या मागं. पायाला चिखलाची लगदाळं चिकटलेली. मधेच एखादा काटा पायात घुसुन रक्तासगट बाहेर यायचा, आग मस्तकाला भिडायची. पोरगी सारखी बिमार पडते. गांवातल्या डॉक्टरला बरेचदा दाखवलं पर पोरीला गुण येईना. सारखी रडत असते.

तिची एक आठवण.......

लेखक एक एकटा एकटाच यांनी गुरुवार, 22/10/2015 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी एका अबोल सांजवेळेत रमणारी आयुष्यातले रंग मुक्त उधळीत मनाच्या क्षितिजावर मालवत जाणारी......तिची एक आठवण तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी अवचित मला एकाकी गाठणारी आवेगाच्या धुक्यात मला लपेटून भुतकाळाच्या दरीत खोल उतरणारी.........तिची एक आठवण तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी अवखळ अल्लड सरींनी सजणारी सारा आसमंत भिजवून जाताना पाऊलखुणा नजरेत साठवून जाणारी........तिची एक आठवण तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी बंद मुठीतल्या चंचल वाळुपरी लाख अडवून धरले तरी निर्विकारपणे अलगद निसटत जाणारी........तिची एक आठवण

श्रद्धाळु

लेखक आनंद कांबीकर यांनी गुरुवार, 22/10/2015 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
जे दिसतं, खरं असतं ते पटत नाही. जे अस्तित्वात नसतं नुसतं भासतं त्याच्यासाठी तंडायचं. इतिहासातल्या कथेपायी एक मेकायला तोडायचं. भाकर दुसरेच भाजतात आपण पेटुन राख व्हायचं. कोपर्यातल्या म्हतारीला कधी उठून तांब्याभर पानी नाही द्यायचं अण् झेंडे घेऊन रानोरानभटकायचं. 'तो' सर्वत्र आहे म्हणायचं वरतुन दगडापुढं रात्रंदिस रांग धरायचं. 'त्याला' ही हे पटत नसल पोट धरून 'तो' ही हसत असल. उपासातापासाने 'तेव' पावला असता तर रसत्यावरचा भिकारी रास्त्यात मावला नसता. आपण रक्ता-घामाच्ं टाकून पेटी भरतो आणि पुजारी गाड्यात फिरतो

पुलंचं ,पुढारी पाहिजे

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी गुरुवार, 22/10/2015 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कोल्हापूरात सध्या महापालिकेच्या निवडणुका चालू आहेत. माहोल मस्त रंगलाय.८१ जागा साठी निदान ५००/६००जण रिंगणात आहेत .प्रत्येकाला पुढारी व्हायचंय. बहुतेकाना ,जनतेचं हीत ,शहराचा विकास ,सोई ,सुविधा मध्ये स्वारस्य नसतं .कांही लाख ते कोटी च्या,खर्चाच्या तयारीनं ऊमेदवार मैदानात ऊतरतात ते जनतेचा पान्हा फुटलाय म्हणून नव्हे किंवा पैसा ऊतु चाललाय म्हणूनहि नव्हे,ती असते गुंतवणूक ,थोडं फार प्रकाश झोतात राहायची हौस आणि जमलंच तर थोडं कामहि करायचं इत्यादी इ . अनेक हेतू मनात धरून केलेली चळवळ.

झोपडपट्टीतले दिवस: भाग एक

लेखक तर्राट जोकर यांनी गुरुवार, 22/10/2015 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही तेव्हा झोपडपट्टीत राहायचो, रेल्वेच्या जागेत अतिक्रमण झालेली अठरापगड जातींच्या सरमिसळीची गोधडी. एक मोठा निळा फडका आणि बाकीचे छोटे छोटे रंगीबिरंगी ठिगळ असलेली. शहराच्या आजूबाजूच्या शेकडो गावांतून इथे दोन-चार, दोन-चार करत आलेली, मोलमजुरी, हमालीचं काम करणारी बिर्हाडं. आवसेला न चुकता डडंग-डंग...चिक...डडंड-डंग....डडंग-डंग...चिक...डडंड-डंग करत येणारा स्वच्छ कपड्यातला, अगदी वारकरी वाटणारा मांग.

शब्दात नाही गुंतायचं!

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 21/10/2015 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
कशाला कुणाला दुखवायच? शब्दांच्या जाळ्यात अड़कायच? थोड़ स्वतःत राहायच... जगण सुंदर करायच! निसर्ग... प्राणी... पक्षी असतात; ते कुठे आपल्या भाषेत बोलतात? स्वतःत ते मग्न असतात.. त्याचं जगण सुंदर करतात! त्यांच्याकडून थोड़ शिकायच. जगण्याला जीवन बनवायचं... मात्र शब्दात न गुंतता... आयुष्याला हिरवं बनवायचं!
काव्यरस