कोणी वेळ देतं का वेळ!?
घड्याळ मिळेल पण त्यातली वेळ!? ही एकच गोष्ट कितीही पैसा ओतला तरी मिळत नाही! त्यामुळे वेळेला किम्मत आहे, असं उगाच नाही म्हणत! त्यामुळे घड्याळाला ही किम्मत, पैशानी नव्हे, आपल्या दैनंदीन जीवनातली घड्याळाची किम्मत...करा करा विचार करा, एखादी बाई दिवासातून जेवढ्या वेळी अरश्यात बघत नसेल, तीतक्या वेळी आपण घड्याळ पहात असतो!
मग वेळेची टिंगल केली की डोकं फिरतं, नवीन गाणं, 'टिक टिक वाजते डोक्यात' म्हणे! ते गाणं कधीच पूर्ण ऐकवतच नाही, असं वाटत वेळ वाया चाल्लाय!
हाच वेळ वाया जातो म्हणून दुपारी कितीही मारणा इतकी झोप येत असली तरी झोपत नाही, काही वर्षच जगतो आपण, त्यात झोपायचं का! झोप असावी, झोपेपुरती!
'माळा'
हो...
*वाईट 'इमोशनल' फजिती*
नेहमी प्रमाणे मे महिन्यात अलिबाग इसटी ने आक्षीला चाल्लेलो, पुण्यात बसून लोणावळा घाटापर्यंत आली बस, मी रीझर्वेषन केले नसल्यानी ड्राईव्हर च्या बाजूच्या त्या 'न' असलेल्या 'शीटा' वर बसलेलो, अचानक स्पीडोमीटरच्या बाजूचा एक लोखंडी पत्रा थडथड वाजायला लागला, वाफ येत होती… जारावेळनी कुकरची शिटी उडावी तसा कायतरी प्रकार झाला, एसटी थांबवली ऐन घाटात, कंडक्टरसाहेब हातात एसटीतच ठेवलेला एक दगड घेऊन बाहेर उतरले, एकूणच बहुतांश प्रवाशांची फाटली होती, कारण हे अनुभवणारे निदान अर्धे लोक तरी एसटी मध्ये असावेत!
एक साधी सरळ प्रेम कहाणी
एक साधी सरळ प्रेम कहाणी
जोश्यांच्या बि~हाडात आली होती पाहुणी गोडशी
सुटी म्हणून आली होती, कळले करता चौकशी
.
उतरताना जिना मित्रांनो, भिडली नजरेस नजर
गोडसा चेहरा, नजर धारधार, केला हृदयावर वार
.
काकांच्या घरात उठबस ,जरा जादा वाढू लागली
दांड्या मारता म्हणून ऑफिसात, बोंब होऊ लागली
.
मधाळ वाणीत तिच्या, नागपूरच्या गप्पा रंगू लागल्या
मात्र " भेटत नाही" म्हणून दोस्तांच्या शिव्या खाल्ल्या
.
विचारले आवडले का पुणे ,की बरे आपले नागपूर ?
हसून वदली आवडले पुणे व पुणेकर, नको नागपूर
.
मग ति नागपूर ची कन्या पक्की पुणेकरीण झाली
साधी सरळ प्रेम कहाणी मित्रांनो अशी संपन्नं झाली
.
अविनाश
आवळ्याचे भरीत
दिवाळी आली की बाजारात आवळे दिसायला लागतात आणि ते दिसले की आम्ही खूष कारण आवळ्याचे भरीत, लोणचे हे आई घरी करायला सुरुवात करायची.
फोटो आंतरजालावरुन साभार
आवळ्याचे भरीत म्हणजे तसा थोडा वेगळा पदार्थ पण एकदा चव घेतली की ते कायमचं आवडीचं तोंडीलावणं होत.
साहित्य :
५ आवळे
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा मोहरी
१ चमचा हिंग - फोडणीसाठी
पाव चमचा तळलेल्या मेथीची पुड
साखर चवीनुसार
हींग पाव चमचा
२ चमचे तेल - फोडणीसाठी
मीठ चवीनुसार
२ चमचे दुधाची साय
अर्धा चमचा दही.
कॄती :
फोटो आंतरजालावरुन साभार
आवळ्याचे भरीत म्हणजे तसा थोडा वेगळा पदार्थ पण एकदा चव घेतली की ते कायमचं आवडीचं तोंडीलावणं होत.
साहित्य :
५ आवळे
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा मोहरी
१ चमचा हिंग - फोडणीसाठी
पाव चमचा तळलेल्या मेथीची पुड
साखर चवीनुसार
हींग पाव चमचा
२ चमचे तेल - फोडणीसाठी
मीठ चवीनुसार
२ चमचे दुधाची साय
अर्धा चमचा दही.
कॄती : एक माणूस बनेल काढून..................
एक माणूस बनेल काढून डोम्बिविलीत पोहचला
बघता बघता रस्त्यावरी दुकान टाकून वसला.
छंद जीवाला एकच लागे
खुर्ची वरीला हक्क हा गाजे
शिव्याशाप तो भाषणामधूनी
आकांड तांडव ते दैनंदिनी
किन्तु
हातचा राखून गणित चुकले
नजर चकवून बहुमत हुकले
तरी उसने आवसान काउंटरवरुनी
परी हळूच पाही मान वळवूनी
इकडे तिकडे बघून झाले
निकाल सगळे येऊन गेले
भान आले, बाहेर आला....
लोकांनी विचारल्यावरी म्हणाला …
आमची दोस्तीदुष्मनी सबकुछ मिलीजुली असते ……
सेटलमेंट होत असेल तर पायवाटही खुली असते …
एक माणूस बनेल काढून वांद्र्याबाहेर पडला
हरवलेले सत्तेचे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिला .
काव्यरस
सोशल मिडीया आणि नोकरी
जानेवारी २०१५ मध्ये जेव्हा I-HRD या संस्थेने एक दिवसाचा रिक्रुटमेंट युजींग सोशल मिडीया असा एक दिवसाचा वर्कशॉप घेशील का म्हणुन मला विचारले तेव्हा या विषयाची खोली इतकी आहे मला ही माहित नव्हते. जस जसा वर्कशॉप चा दिवस जवळ येतोय तस तसे माहितीच्या जंजाळातुन काय घेऊ आणि काय नको घेऊ असे झाले आहे.
२००८ मध्ये मी जेव्हा एका कंपनीमध्ये एच आर मॅनेजर म्हणुन काम पाहु लागलो तेव्हा नुकतीच मंदीची लाट सुरु झाली. या लाटेत तोटा होऊ नये म्हणुन कंपन्यांनी रिक्रुटमेंट कन्सलटंट नकोत म्हणुन सांगीतले.
वॅली ऑफ फ्लॉवर्स : १ : कशीबशी केलेली बुकिंग
माझी पहिली नोकरी होती मुंबईला "ओरॅकल फिनान्शियल सर्विसेस" येथे. तिथे माझ्यासोबत कॉलेजमधून नुकतेच बाहेर पडलेल्या आणखी काहीजणांनी एकाच दिवशी कंपनीत आणि करियरमध्ये प्रवेश केला. पुढचे २-३ महिने आमचं सोबत प्रशिक्षण झालं. अगदी पद्धतशीर वर्गात बसुन, कॉलेजसारखंच (वातावरणाच्या बाबतीत) पण दर्जा खूप चांगला. त्यानंतर १-२ वर्ष आमचे प्रोजेक्टसुद्धा सारखेच होते. आम्ही एकाच मोठ्या टीममध्ये होतो. त्यामुळे आमची सर्वांची एकमेकांशी मस्त गट्टी जमली.
या ग्रुपचं नाव पडलं "डस्सुझ". थोडक्यात कारण यातले सगळे आपापल्या पद्धतीने दुसऱ्यांना डसत राहतात.
कॅनडाच्या लोकसभेत पंजाबी तिसर्या क्रमांकाची भाषा
१९ ऑक्टोबरच्या सार्वत्रिक कॅनेडियन निवडणुकीत तेथील लोकसभेत (हाउस ऑफ कॉमन्स) एकूण २३ भारतीय वंशाचे आमदार निवडून आले. त्यापैकी २० जणांची पंजाबी मातृभाषा आहे. त्यामुळे, इंग्लिश व फ्रेंच या भाषांच्या नंतर पंजाबी कॅनडाच्या लोकसभेत (हाउस ऑफ कॉमन्स) तिसर्या क्रमांकाची भाषा झाली आहे. लवकरच बनवण्यात येणार्या केंद्रिय मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या काही आमदारांची वर्णी लागेल अशी अपेक्षा आहे.
कॅनडाच्या २०११ च्या जनगणनेप्रमाणे ४५६,०९० लोकांनी पंजाबीला आपली मातृभाषा असल्याचे नोंदवले आहे. हे प्रमाण कॅनडाच्या एकूण लोकसंख्येच्या १.३% आहे.
मिसळपाव