Skip to main content

*वाईट 'इमोशनल' फजिती*

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 04/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी प्रमाणे मे महिन्यात अलिबाग इसटी ने आक्षीला चाल्लेलो, पुण्यात बसून लोणावळा घाटापर्यंत आली बस, मी रीझर्वेषन केले नसल्यानी ड्राईव्हर च्या बाजूच्या त्या 'न' असलेल्या 'शीटा' वर बसलेलो, अचानक स्पीडोमीटरच्या बाजूचा एक लोखंडी पत्रा थडथड वाजायला लागला, वाफ येत होती… जारावेळनी कुकरची शिटी उडावी तसा कायतरी प्रकार झाला, एसटी थांबवली ऐन घाटात, कंडक्टरसाहेब हातात एसटीतच ठेवलेला एक दगड घेऊन बाहेर उतरले, एकूणच बहुतांश प्रवाशांची फाटली होती, कारण हे अनुभवणारे निदान अर्धे लोक तरी एसटी मध्ये असावेत! आणि तेव्हा आजच्या जमानातल्या सारखे स्मार्ट फोन ही नव्हते, धोक्याला 'नजरअंदाज' करून किंवा धोक्याचा वास घेऊन 'स्ट्रक्ड इन लोनावला, एसटी सक्स' वगैरे अपडेट मारायला! एसटी मधली २-३मुलं आणि पुरुष वर्ग एसटी बाहेर आला. त्या रणरणत्या उन्हात रस्त्यावर आम्ही धक्का मारायला लागलो, कशीबशी चढावरून नॉर्मल रस्त्यावर आणली. काही नतद्रष्ट लोक अजूनही एसटी मध्ये बसून होते, निर्लज्ज! काही झोपलेले ही! आता आश्या लोकांना काय बोलायचे, शब्द ही आठवत नाही, असो! कोणीतरी एका बादलीतून जवळच्या विहिरीतून पाणी आणले, ते बाटलीत भरुन वगैरे प्रकार चालू होते, येणारे जाणारे पब्लिक आम्ही 'एलीअन्स' वगैरे असल्या सारखे बघत होते हा सर्व प्रकार! शेवटी मी दुर्लक्ष करून धार मारायला गेलो… परत आलो तेव्हा एसटी नव्हती जिथे मी तीला सोडून गेलेलो तीथे ती नव्हती! कान लाल, माझ्या बाजूला बसलेले काका पण आजूबाजूला दिसत नव्हते, एक स्कूटर वर एक दादा मला बघून थांबला, मला म्हणाला पुढेच 'गराज हाय तिथं गेली हाय एसटी, म्या चाल्लुय त्यीथच, बस मागी… ' माझं समान होतं एसटी मध्ये राहिलेलं, त्या मुलानी मला ग्यारेज जवळ नेले… तिथेही एसटी नव्हती! आता एकाच पर्याय होता, मागून येणारी दुसरी एसटी पकडली, न लोणावळा गाठलं, यार्डात होती बस… न आवरता येणार्या भुकेला मागे टाकून धावत पळत माझा 'न' असलेल्या सीट पाशी गेलो, तिथे होती माझी ब्याग… निःश्वास टाकला. जीवात जीव आला. असली चीडचीड झालेली, मला अपेक्षित होतं की माझ्याबाजूला बसलेले काका मी नाही हे पाहून कंडक्टर ला सांगतील की एक मुलगा होता माझ्या बाजूला वगैरे… ते काका आंधळे होते ते नंतर कळाले! त्यामुळे सगळ्या शिव्या तोंडातल्या तोंडातच भिजल्या. त्याच गिळून पोट भरले ही. ह्या घडलेल्या किस्श्या नंतर एसटी सोडून कधी जायचे नाही हा एक मोठा धडा मिळाला. पण नंतर कधी एसटीत बसायला मिळालच नाही. त्या काकांचा चेहरा आठवला कि तो घडलेला प्रसंग अजून ही काल घडल्यासारखा वाटतो. वाईट 'इमोशनल' फजिती असा काहीसा प्रकार घडलेला! त्यापेक्षा ती एसटी नसती त्या यार्डात तर बरं झालं असतं असं वाटतं कधी कधी! कारण नुसती फजिती पचवता येते! #सशुश्रीके
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7189
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

In reply to by मांत्रिक

आयडी नाव फार अवघड आहे, तेवढं बदला असं म्हणेन.. स्वॅप्स या छोट्या नावाचे मालकही कंटाळले तिथे तुमचं नाव तर कुठच्या कुठे...

पां अस झालं तर ते सगळं! डुब्बा http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-041.gif

एकूणच बहुतांश प्रवाशांची फाटली होती,
लोखंडी पत्रा फारच धारदार होता वाटत

धार मारणे म्हणजे काय? मी "संतत धार", "धारदार सुरी" किंवा "पहिल्या धारेची" वैगेरे संदर्भात "धार" हा शब्द ऐकला आहे. पण धार कशी मारतात ते माहित नाही. त्यामुळे एस टी मधून उतरुन, गुपचूप कोणालाही न सांगता, धार मारायला जाण्याची निकड समजली नाही. साधारण पणे आपण थांबलेल्या एसटी मधुन जर उतरुन कुठे जात असू व आपल्याला परत त्याच एसटीने प्रवास करायचा असेल तर आपण सहप्रवाश्याला सांगुनच उतरतो. (सहप्रवासी अंधळा असला तरी मुका आणि बहिरा नसेल तर. आणि जर तो अंधळा मुका आणि बहिराही असला तर तीच गोष्ट आपण दुसर्या सहप्रवाश्याला सांगु शकतो. जर सर्व बस मधले प्रवासी अंधळे मुके किंवा बहिरे असतील तर चालक किंवा वाहक यांच्या पैकी जो कोणी धडधाकट असेल त्याला सांगुन उतरतो. ) पण प्रस्तुत लेखकाने केलेल्या एकंदरीत वर्णनावरुन, "धार मारणे" हे अतिशय गुप्त स्वरूपाचे आणि प्रचंड वेळखाऊ असे काहीसे कार्य असावे असा समज करुन घेता येऊ शकतो , कारण बघाना, हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी प्रस्तुत लेखक महाशयांना इतका वेळ लागला की तेवढ्या वेळात एसटी निघून गेली. परवा रस्त्यावर एका भांडणं बघितले तिकडे एक मनुष्य दुसर्याला म्हणत होता "माझ्या नादी लागू नको नाहितर मी इथे रस्त्यावरच तुझी xx मारेन". धार मारणे हा तसाच काही प्रकार आहे का? मि पा वरील तज्ञ लोकांनी कृपया खुलासा करावा. रच्याकने :- आज सकाळी हापिसात येत असताना एका टरक वर "धारेश्वर प्रसण्ण" असे लिहिले होते. हे धारेश्वराचे मंदीर कोठे आहे हे जर कोण्या मिपाकराला माहित असेल तर कृपया कळवावे. (निरागस ) पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

"हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी प्रस्तुत लेखक महाशयांना इतका वेळ लागला.." असं खरंच होतं हो !! एकदा ऐन पावसाळ्यात लांबून आलेली पुण्याहून मुंबईला जाणारी एस. टी. डायवरनी लोनवळ्याला थांबवलीच नाही. ब-याच "धार"क-यांचा जीव पार कासावीस झाला होता. शेवटी लोकांनी कंडॉक्टरवर आरडाओरडा करून बस खंडाळ्याला थांबवली. बायका, माणसे अक्षरशः दरवाजातून उडया टाकून पळाली. अशा वेळी "पुर्ण रीलीफ" मिळवायला वेळ लागतोच. :-)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

तुम्ही तुमचा नंबर समीर, शुभदा, श्रीकृष्ण आणि केतकर या सगळ्यांना व्य.नि. करा बघू. पुढच्या वेळेला ते तुमचा सल्ला ऐकूनच जातील. ;) (रोफललेला) बेजार बोका.

'स्ट्रक्ड इन लोनावला, एसटी सक्स' वगैरे अपडेट मारायला!'स्ट्रक्ड इन लोनावला, एसटी सक्स' वगैरे अपडेट मारायला!
च्यायला आमच्या हितं दोनदा फोन करुन उचलला नाई की तोच माणूस परत फोन करुन "मैतीत आलतो बे, तिरडी बांधू की नको" असे स्टेटस ऐकवतो. स्टेटस लिव्हणे लैच उच्च ब्वा.

मिपावर आता पुढचा कुठला संस्मरणीय अनुभव वाचायला मिळणार आहे? लिफ्टिंग घूँघट, फीलिंग एक्ससायटेड?

बुवांना फाट्यावर मारणे जर माहीती आहे तर धार मारणे आणि क्ष्क्ष मारणे नक्किच माहित असावयास हवे. ईस्म्याली.