मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक साधी सरळ प्रेम कहाणी

अविनाशकुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
एक साधी सरळ प्रेम कहाणी जोश्यांच्या बि~हाडात आली होती पाहुणी गोडशी सुटी म्हणून आली होती, कळले करता चौकशी . उतरताना जिना मित्रांनो, भिडली नजरेस नजर गोडसा चेहरा, नजर धारधार, केला हृदयावर वार . काकांच्या घरात उठबस ,जरा जादा वाढू लागली दांड्या मारता म्हणून ऑफिसात, बोंब होऊ लागली . मधाळ वाणीत तिच्या, नागपूरच्या गप्पा रंगू लागल्या मात्र " भेटत नाही" म्हणून दोस्तांच्या शिव्या खाल्ल्या . विचारले आवडले का पुणे ,की बरे आपले नागपूर ? हसून वदली आवडले पुणे व पुणेकर, नको नागपूर . मग ति नागपूर ची कन्या पक्की पुणेकरीण झाली साधी सरळ प्रेम कहाणी मित्रांनो अशी संपन्नं झाली . अविनाश

वाचने 2678 वाचनखूण प्रतिक्रिया 6