Skip to main content

आवळ्याचे भरीत

लेखक अक्षया यांनी बुधवार, 04/11/2015 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी आली की बाजारात आवळे दिसायला लागतात आणि ते दिसले की आम्ही खूष कारण आवळ्याचे भरीत, लोणचे हे आई घरी करायला सुरुवात करायची. . फोटो आंतरजालावरुन साभार आवळ्याचे भरीत म्हणजे तसा थोडा वेगळा पदार्थ पण एकदा चव घेतली की ते कायमचं आवडीचं तोंडीलावणं होत. साहित्य : ५ आवळे २ हिरव्या मिरच्या १ चमचा मोहरी १ चमचा हिंग - फोडणीसाठी पाव चमचा तळलेल्या मेथीची पुड साखर चवीनुसार हींग पाव चमचा २ चमचे तेल - फोडणीसाठी मीठ चवीनुसार २ चमचे दुधाची साय अर्धा चमचा दही. कॄती : प्रथम आवळे उकडून घेणे. फोडी करुन बिया काढणे. (आवळे उकडलेले पाणी टाकुन न देता, ते सरबत अथवा नुसते मीठ घालुन पीउ शकता. हे पाणी अतिशय आरोग्यदायी असते) नंतर, २ आवळे मिरच्या, अर्धा चमचा मोहरी व मीठ मिक्सर वर बारीक करुन घेणे. तळलेली मेथी मिक्सर वर बारीक करुन घेणे. वरील सर्व मिश्रण आवळ्याच्या फो़डीला लावुन घेणे. चवी प्रमाणे साखर व मीठ घालुन कालवावे. दोन चमचे तेल कढई मधे गरम करुन त्यात हींग व मोहरी घालुन खमंग फोडणी करावी. वरील मिश्रणात दही व साय घालुन एकत्र करावे. फोडणी थंड झाल्यावर मिश्रणावर घालणे व एकत्र करणे. . (दही, साय व फोडणी घालण्या पुर्वी मिश्रण फ्रिज मधे ठेवुन ऐनवेळी लागेल तेंव्हा मिश्रणात दही, साय व फोडणी घालुन सर्व्ह करु शकता. ८ दिवस सहज रहाते.) चविष्ट, आरोग्यदायी तसेच पचनास उत्तम असे आवळा भरीत तयार..असं थोडं हटके तोंडीलावणं करुन तर बघा नक्की आवडेल.

वाचने 10479
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

हम्म... पण फोडणीचा तडका अंमळ जास्तच लागलाय का तूला? (ह.घे.)

In reply to by प्यारे१

त्ये गावतात पार तकडं....सातासमिंदरापार....!!

वा. आवळ्याचे भरीत ऐकलं नव्हतं. आता करून बघणार.

वांग्यांचे असो वा लाल भोपळ्याचे भरीत मला खूप आवडतं. ही पाकृ वाचून आणखी एका प्रकारच्या भरीताची भर पडेल असे वाटत आहे. पाकृ आवडली.

आवळ्याचं भरीत असतं हे माहित नव्हतं. वेगळीच पाकृ.