Skip to main content

"शोध": खूपसं कौतुक आणि मोजक्या तक्रारी

लेखक आदूबाळ यांनी शनिवार, 21/11/2015 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजीमध्ये "थ्रिलर" प्रकारच्या पुस्तकांचं बरंच समृद्ध कपाट आहे. डॅन ब्राऊन, मायकेल कॉनेली, जेम्स पॅटरसन वगैरे मंडळींच्या कृपेने. त्यात डॅन ब्राऊन कंठमणी शोभावा असा. कोणतातरी रहस्यभेद करायच्या ध्येयाने प्रेरित झालेला नायक, त्याला साथ देणारी नायिका, खलनायक किंवा खलनायकांची संघटना, नायकाला साथ देणारी चांगली माणसं / त्यांची संघटना, चोवीस ते छत्तीस तासांत घडणारं वेगवान कथानक असा थ्रिलर्सचा एकंदर ढाचा असतो. डॅन ब्राऊनने त्यात पुराणं, इतिहास, दंतकथा, गुप्त संघटना, कॉन्स्पिरसी थियरीजची जोड दिली, आणि द रेस्ट इज हिस्टरी. मराठी थ्रिलर्सचा प्रांत तसा दुष्काळीच आहे[१].

कट्यार आणि चाबकाचा वार

लेखक पिशी अबोली यांनी शनिवार, 21/11/2015 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
कट्यार बद्दल खूप काही वाचून, जुनं-नावं नाटक आणि त्यातील सगळे आदळलेले संदर्भ झेलून सिनेमा बघायला गेले. गेले, ती एकाच ओढीने, की हे सुवर्णयुग बघता आलं नाही, त्याचं नवं रूप तरी पाहू. पाहिला, आवडला, पण सगळ्या चर्चा, टीका या डोक्यात पिंगा घालत होत्या. पण त्याहीपलीकडे कुठेतरी हे वाटत होतं की फक्त जुनं नाटक, नवं नाटक आणि नवीन चित्रपट यापलीकडे जाऊन कुणी याचा फार विचार करत नाहीये. माध्यम कसंही आणि काहीही असलं, तरी ही कथा अगदी क्लासिक आहे आणि त्यातूनही कलावंताला स्पर्शून जाणारा अहंकार, आणि त्या अहंकाराचा त्याच्यातील कलाकाराशी होणारा लढा ही तर अगदी भौगोलिक मर्यादा ओलांडणारी आणि कालातीत अशी गोष्ट.

फरक

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 21/11/2015 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळ चे सात वाजले होते. गावदेवी ला ठेवलेली स्कुटर घेऊन वर्तक नगर ला जायचे होते. वळणावर अंधार. जो काय प्रकाश होता तो दुकानांच्या रोषणाईचा. वळणावरच्या दुकानाचा बोर्ड. त्यावरची जाहीरात उठुन दिसत होती. अंधारामुळे अगदी हाईलाईट मधे. म्युनिसिपालीटी बरोबर सेटींग, सुत, दोरा, रश्शी नक्की... जाहीरात वाचली. "कमी वजनाचे एक ग्राम सोन्याचे फोर्मीग (का फॉर्मिंग) दागिने. फरक नाही पडल्यास ३० दिवसात पैसे परत" ...... फ्लॅश बॅक लग्नाला ५ वर्षे झालेली. अक्षय त्रुतियेच्या दिवशी बायकोने हातात अंगठी दिली. नवरत्नाची. " आईने दिलीय". वा. वा. वा. दहाव्या ला नउ का? " ३० दिवसात फरक पडेल असे म्हणाली" असे का?

इशकजादे – २

लेखक मांत्रिक यांनी शनिवार, 21/11/2015 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळचे साडेआठ वाजत आलेले होते. रितू कॉलेजला जाण्यासाठी तयार होत होती. रेडिओवर गाणं लागलेलं, ‘हाय वो परदेसी मन में कौन दिशासे आ गया…’ थोडंसं थबकून ती मध्येच ते गाणं लक्षपूर्वक ऐकत होती. आज तिने मुद्दाम कालचाच तो गुलाबी ड्रेस घातलेला होता. उत्सुकता आणि एक हुरहुर! थोडंसं घाबरल्यासारखंच होत होतं तिला आज. एवढ़्यात माई तिची गडबड बघून बाहेर आल्या. ‘काय गं रितू? एवढी कसली गडबड?’ ‘काही नाही गं माई! आज जरा लायब्ररीत जायचंय. उशीर झाला तर पुन्हा रांगा लागतात मग.’ ‘बरं! ठीक आहे.’ रितू श्रीरामपूरमधल्या नाना टाफळेंची कन्या. नाना त्या जिल्ह्यातील एक महत्वाचे राजकारणी म्हणून ओळखले जात.

शोध

लेखक मयुरMK यांनी शनिवार, 21/11/2015 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
शुभ्र उमदा मी एक अश्व करीत पादाक्रांत हे विश्व करावयाचा आहे शोध घ्यावयाचा आहे बोध .....................मृत्यूचा! बाळगुन मनाशी जिद्द चपल तनुत एक उमेद नजरेत एकाच ध्येय धावणार मी असाच आहे ......................सुसाट! माझिया जन्मानेच मला जीवन्मंत्र आहे दिला येणार ना मरण तुला .....................कधीही पण,मनी ती एक आस भेटावयाचे मरणास संपणार कधी हा प्रवास एकचि ध्यास तो खास ....................अंतरात आणि अशाच एका दिनी यश प्राप्तिले प्रयत्नानी पाहिले मरणाचे रूप ते तर होते प्रतिरूप ....................जन्माचे! मृत्युस त्या भेटता तत्क्षणी टोल माझा खोल जाऊनी भावना,वेदना लोपल्या नव्हत्याच आत्ता कोठल्या ..
काव्यरस

क्रिकेट मधली घराणेशाही!

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 21/11/2015 03:52 या दिवशी प्रकाशित केले.
जंटलमन्स गेम - ३ - इंडेक्स फिंगर या माझ्या लेखावर आलेल्या एका कॉमेंटमध्ये आमच्या बोकोबांनी इंग्लिश टेस्ट क्रिकेटर आणि अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ हा रे इलिंगवर्थचा मुलगा होता का असा प्रश्नं केला होता. अनेक वर्ष माझीही समजूत रिचर्ड हा रे इलिंगवर्थचा मुलगा होता अशीच होती, पण सहज म्हणून तपासल्यावर प्रत्यक्षात दोघांचा काहिही संबंध नसल्याचं आढळून आलं! त्या निमित्ताने क्रिकेटमधील घराणेशाहीवर थोडाफार प्रकाश टाकावा असा विचार मनात आला. घराणेशाही हा विशेषतः भारतीय राजकारणातला अगणित वेळा चर्चा झालेला विषय!

पंख जेधवां फुटतील तेव्हा निर्भय तुम्ही व्हावे

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 20/11/2015 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
आर्किटेक्ट बाप साईटवर कामात गुंग आहे. पदवीधर होऊन नुकतीच इंटर्नशिप संपलेल्या मोठ्या मुलीचा फोन येतो. "बाबा, तुम्हाला आठवतंय का मी पुण्याच्या त्या मल्टीनॅशनल कंपनीत अ‍ॅप्लाय केलं होतं?" "हो, हो," गवंड्याच्या हातातल्या ओळंब्याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवत बाबा, "त्याचं काय झालं?" "बाबा, त्यांचं कॉल लेटर आलंय इंटरव्ह्यूसाठी, उघडून पाहिलं तर इंटरव्ह्यू उद्याच सकाळी आहे!" "अरे वा! काँग्रॅट्स! पण बेटा आज तर मी दिवसभर साईटवर अडकलेलो असेन आणि आई तर उद्या रात्रीपर्यंत परत येणार नाहीये नागपूरहून! आज रात्री उशीरा निघुयात आपण दोघे?" "नाही.

इशकजादे – १

लेखक मांत्रिक यांनी शुक्रवार, 20/11/2015 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
जूनचा पहिला आठवडा. पावसाची अजून सुरुवात झालेली नव्हती. गुलमोहराचा बहर देखील ओसरत आलेला होता. तलवारीसारख्या लांब शेंगा कुठे कुठे लटकलेल्या दिसत होत्या. रस्त्यावर देखील ओसरत्या बहरातील लालभडक आणि पांढ-या पाकळ्यांचा सडा पडलेला होता. तो सर्व रस्ताच आता कॉलेजच्या मुलामुलींच्या घोळक्यांनी भरुन गेलेला होता. त्या जिल्ह्याच्या शहरातील हाच काय तो एकमेव हिरवळीचा रस्ता. मुख्य पेठेपासून शहराच्या बाहेरील कॉलेजला जोडणारा. दिवसभर तरुणाईचा उत्साही वावर या रस्त्यावर दिसून येई. कॉलेज सुरु होण्याची वेळ झाली होती. मुलामुलींचे घोळके भराभर पाय उचलू लागले.

यक्षप्रश्न

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 20/11/2015 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
१. गर्द जंगलात निरुद्देश भटकताना पाणी दिसले, तेव्हा त्याच्या काठाशी नकळत विसावले मी. पापणीच्या आतल्या पाण्याला अचानक बाहेरच्या पाण्याची ओढ. मी ओंजळ पुढे करताच कोठूनसा धारदार आवाज आला: “माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याविना पाण्याला स्पर्श करू नकोस. अन्यथा प्राण गमवावे लागतील.” २. महाभारतातील कूटप्रश्न विचारणाऱ्या यक्षाची कथा वाचली होती मी फार पूर्वी, बहुधा त्याचाच वंशज असणार हा! पण आता अशा या सैलावलेल्या क्षणी कोण माथेफोड करणार? आणि ते करून ना काही सिद्ध करायचे होते, ना काही साधायचे होते. प्राण, जीवन क्षणभंगुर आहे हे खरे, पण ते उगाच दुसरे कोणी म्हणते म्हणून विनाकारण उधळून देणेही शहाणपणाचे नाही.

एक मनस्वी अद्वैत

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शुक्रवार, 20/11/2015 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
एक मनस्वी अद्वैत अनुराग कंपनीत कामाला जाताना रोज त्या घड्याळाच्या शो रूम वरून जायचा . काहीवेळा क्षणभर थांबायचाही. ती चकचकीत फॅशनेबल चुटूकशी शोकेसमध्ये ठेवलेली लेडीज घड्याळं त्याला मोहवायची.रागीणीच्या हातावर कुठलं जास्त खुलून दिसेल याचा विचारहि तो करत रहायचा. उद्या त्यांच्या लग्नाला पांच वर्ष होतायतायात. अजून तेच लग्ना आधीचं जूनं घड्याळ ती वापरते . उद्या कोणत्याहि परिस्थितीत लग्नाच्या वाढदिवसाला तिला सरप्राइज द्यायचंच तो मनोमन ठरवतो.