Skip to main content

सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . .

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 27/11/2015 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

(जिलेबी कथा - लिहायचे नियम)

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 27/11/2015 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
'पेरणी'साठी बियाणे! मिसळपावच्या आशीर्वादाने व मिपाकरांच्या साक्षीने आम्ही "धाग्यांच्याबागेत भेटेन तुला मी" या कथामालेची सुरूवातीच्या आधीच सांगता करत आहोत! प्रस्तुत लेख हा आजच प्रकाशित होणार आहे. तरीही हा लेख वाचून इथून पुढे आपला जिलेबीलेख/कविता/काथ्याकूट/पाकृ लिहायची काही पथ्ये! १. कथा शक्यतो १च भागात द्यावी किंवा जास्त स्क्रोल करायला लावून कुणाकडूनही 'भाग थोडे मोठे टाका' किंवा 'हात दुखला स्क्रोल करून' अशी प्रतिक्रिया मिळवून आपल्या अतिशहाणपणाचा प्रत्यय देऊ नये.

लंगोटनगरी पोपटराजा.....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 27/11/2015 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
लंगोटनगरी पोपटराजा वादळच जोराचे आले, की गाठी आपोआप ढिल्या झाल्या, माहित नाही खास, काय घडले विशेष! पण हाय!! लंगोट कड्यावरून घसरले, अन पोपट सगळे फांद्यांवर दिसले. जितकी विद्वत्ता जास्त, तितके त्यांचे पोपट पंचरंगी! त्यांनी एकच गिल्ला केला. त्याचा आवाज समुद्रापार गेला. ‘लंगोटवाहू वादळ कुठून आले? कसे आले? पाहू पाहू त्यावर खास संशोधन करू!’ हाती लेखण्या घेतल्या, आणि लंगोट उडवणाऱ्या वादळामागे पोपट सावरत मूढ सगळे अमाप धावले. वादळाविरुद्ध एक जोरदार कम्प्लेन हवेतल्या हवेत ठोकून म्हणाले, ‘आता फार काम झाले! घेऊ या विश्रांती, स्वतःच्या कोशात!’ .........

सद्गुरु

लेखक विश्वव्यापी यांनी शुक्रवार, 27/11/2015 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम वंदून श्री सद्गुरु चरण आणी नमून सरस्वती गजानन करितो प्रारंभ सांगावया श्री सद्गुरु कथन. सुरुवात श्री ज्ञानेश्वर माउलींच्या ह्या सुंदर अभंगाने करावीशी वाटते मोगरा फुलला, मोगरा फुलला फुलें वेचिता बहरु कळियांसी आला मोगरा फुलला, मोगरा फुलला इवलेसे रोप लावियेले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला, मोगरा फुलला मनाचिये गुंती गुंफियला शेला बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पिला मोगरा फुलला, मोगरा फुलला संत श्रेष्ट ज्ञानेशवरांच्या ह्या सुंदर अभंगाचा नीट अर्थ उमजणे अत्यंत अवघड आहे .

दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 27/11/2015 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात
संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांची निवड

सिंहलव्दीपाची सहल : ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 27/11/2015 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुध्दमूर्ती...     ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...

यार

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी शुक्रवार, 27/11/2015 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा संग करूनी गर्भास दिलास जीव उघड्या माझ्या भाळाची सगळेच करतात कीव | अत्तरबुधली तनु एकदाच हुंगलीस अन् मलाच म्हणालास कशी झिंगलीस ? एकलकोंड्या रात्रीही असती नजरपहारे अलिप्त राहुनीही झोंबती मज शरीरे | ढळल्या पदराचे भान कशी विसरली बाई भाकड जाहल्या गाई कसाई ओढत नेई | अवचित स्वप्ने चळती रात्री ओशाळलेल्या आरश्यात नजरेच्या उलट्याच बाहुल्या | भंगुनी लक्ष्मणरेषेस शरीर विटाळले भर आमावस्येला कुंतली केवडे माळले | केवड्याच्या सुगंधाने भुजंग दारी येई बंद कवाड माझे जिव्हा चाटत पाही | विटाळल्या शरीरावरी मुक्त कुंतल भार नदिपलीकडे वाट पाही विधवेचा यार | विजयकुमार...................... 21 / 11 / 2008

माहितीच्या प्रतीक्षेत

लेखक अभिजीत अवलिया यांनी शुक्रवार, 27/11/2015 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा ग्रहवासियांनो २ बाबतीत माहिती द्यावी ही विनंती. १) डिसेंबर मध्ये २-३ दिवस दापोली (हर्णे बीच) वर सहकुटुंब जायचे आहे. तरी हर्णे बीच वरचे एखादे चांगले होम-स्टे किंवा लॉज असेल तर सांगावे. समुद्रापासून जवळ असावे. २) पुण्यातील एखादा चांगला आहारतज्ञ्य सुचवा. व्य.नी केलेत तरी चालेल.

रक्तदाब मापन उपकरण आणि नोंद वही तंत्र - माहिती हवी आहे

लेखक नितीनचंद्र यांनी शुक्रवार, 27/11/2015 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
मला एका प्रयोगासाठी रक्तदाब मापन उपकरण आणि नोंद वही तंत्र अर्थात ब्लड प्रेशर मोजणारे घड्याळासारखे बांधता येणारे व त्यातला डेटा लॉग करणारे सॉफ्टवेअर हवे आहे. उपयोग असा की विवीध हालचाली करताना आपले ब्लड प्रेशर काय होते याचे ग्राफ रिअल टाईमबरोबर पहाता येतील. इंटरनेट वर अश्या बर्‍याच ब्लड प्रेशर दाखवणार्‍या व बॅटरीवर चालणार्‍या यंत्रांची माहिती दिसत आहे पण त्यात रेकॉर्डेड डाटा डाऊनलोड करुन त्याचे अ‍ॅनेलिसीस करणारे सॉफ्ट वेअर याची माहिती मिळत नाही. कुणी वापरले आहे का असे उपकरण ?

आतातरी............

लेखक एक एकटा एकटाच यांनी गुरुवार, 26/11/2015 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या क्षितीजावर दूर गेलेल्या आठवणीचं आभाळ मनात दाटतयं, "आतातरी परत ये खरं सांगतो" तुझ्याशिवाय फार एकट एकट वाटतयं आठवतयं तुला................ दररोज सांजवेळी खिडकीत उभी राहुन माझी वाट बघायचीच तु, परतण्यास अमळंसा उशीर झाला तरी खोटं खोटं रुसायचीच तु, मात्र आता माझ्यासोबत हे खुळावलेलं घरटंही तुझीच वाट बघतयं, "आतातरी परत ये खरं सांगतो" तुझ्याशिवाय फार एकट एकट वाटतयं माहितीय मला.............. तुझ्या एका आठवणीवर सवडीने मुक्त बरसायचा तो, घेउनी कवेत तुला अंगाअंगावर धुंद निथळायचा तो, आज आता तुझ्यासोबत पुन्हा अगदी तसचं भिजावस वाटतयं, "आतातरी परत ये खरं सांगतो" तुझ्याशिवाय फार एकट एकट वाटतयं......