Skip to main content

परीकथा भाग ५ - (फेसबूक स्टेटस १.७ ते १.९ वर्षे)

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 10/12/2015 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
. ३१ ऑक्टोबर २०१५ आमच्या एफ एम रेडिओला सिग्नल मिळायला सुरुवात झाली आहे. हल्ली रोज नॉनस्टॉप नॉनसेन्स प्रादेशिक चॅनेल लागतात. नक्की कुठल्या प्रदेशाचे कार्यक्रम चालू असतात ते नाही समजत, पण योग्य ती फ्रिक्वेन्सी पकडली की मध्येच एखादा मराठी शब्द निघतो :) . . ५ नोव्हेंबर २०१५ बाथरूम ही आपल्याला पर्सनल स्पेस देणारी प्रायव्हेट जागा असते असा एक समज आहे. पण आमच्याकडे ते सुखही नाही. तिला त्या क्षणी जगातली तीच व्यक्ती सर्वात लाडकी होते जी बाथरूममध्ये असते. मग ती मम्मी असो वा पप्पा, दारावर थडाथड लाथाबुक्के बसायला सुरुवात होते. काल मात्र ही थडथड दोन्हीकडून अनुभवली.

तांत्रिक अंधश्रद्धा

लेखक आनंद कांबीकर यांनी गुरुवार, 10/12/2015 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
"काय दिनु भाऊ, काल पोरगी पहायला गेलता म्हणे. केली का मग पास?" डोंबिवलित चढल्या चढल्याचढल्या मी त्याला विचारले. "हो गेलतो की. आणि पास पण करुण आलो" तो गर्दीतुन मान वर काढत बोलला. "मग ज़रा फोटु बिटू दाखवाकि आम्हाला?" मागच्याला पुढं घालत रम्या आमच्याकडे वळाला. दिन्याने एकदा खिशातून मोबाइल काढला, लॉक उघडायचे बटन दाबले आणि बाजूला उभा लोकांकडे पाहत परत खिशात ठेऊन दिला. बस मग काय,त्याला फोटो दाखवायचा नाही हे रम्याच्या लक्षात आले. "मुलीला केसं आहेत कारे? का आपल्या बॉससारखी हे?" म्हणत रम्या मोठ्याने खिदळु लागला. "ये रम्या, फोटुवर लाइन मारायची नई बरका. आपली वैनी हे" मी पण खेचायला सुरुवात केली.

आॅन / आॅफ ( एक भयानक अनुभव )

लेखक mohite jeevan यांनी गुरुवार, 10/12/2015 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
कुजलेल्या चेहऱ्या सारखा तो म्हातारा , जसा छिन्नविछिन्न शरीराचा , कमरेत वाकले ला होता. त्याला पाहुन मी इतका घाबरलो की माझ्या हात पायातुन शक्तीच गेली, माझा माझ्यावरील कंट्रोल राहीला नाही व हाताचा बोट लाईट च्या बटणावर अजून तसाच होता. भितीने माझा बोट बटणावर दाबला गेला व लाईट आॅफ झाली त्या काळोखाला पाहुन माझा थरकाप उडाला.  मी पुन्हा लाईट आॅन केली पण तो खिडकी जवळ नव्हता , मी पळत जाऊन खिडकी तुन बाहेर पाहिले पण तो नव्हता.  एखादा म्हातारा इतका चपळ आसू शकतो?

नास्तिक

लेखक सुमित_सौन्देकर यांनी गुरुवार, 10/12/2015 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
असलो जरी मी नास्तिक तरी देवालाच दोष देत मी रडतो कुणासोबत मंदिरात जाता विश्वास नसून पाया पडतो.... नाही विश्वास भूता-खेतावर म्हणत मी टेम्भा मिरावतो ऐकट पडलो की मात्र अंधाराला खुप घाबरतो... खर खोट सिद्ध करायला मीही शप्पत घेतो नजर लावली कुणी म्हणून मीही दूषण देतो... स्वतावर आहे भरोसा तरी शिंक आली की थांबतो नस्तिक्तेच व्याख्यान मात्र अभिमानाने सांगतो... सण संपता निरोप घेता मीही होतो बर भाऊक आहेच खर का मी नास्तिक ते त्या इश्वरालाच ठाउक...
काव्यरस

कादंबरी

लेखक स्वामी संकेतानंद यांनी गुरुवार, 10/12/2015 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर जगणे अशक्य होते.. रात्रंदिन मुखवट्याची झूल पांघरून, हसणे, खेळणे, नाचणे, आनंदाने गाणे.. मुखवटा उतरायचे ठरते. एकेक पापुद्रा गळत जातो.. आणि हे घडताना.. चीरवेदनेचा चीरआक्रोश, रीतीभातींच्या चिरेबंदी वाड्याबाहेर पडू शकत नाही काही... सगळे पापुद्रे गळल्यानंतर.. मागे उरते निव्वळ निर्वात पोकळी.. मुखवटा गळताना अस्तित्वाच्या खाणाखुणाही केव्हा गळून जातात.. कळतच नाही.

तमसो मा ज्योतिर्गमय - भाग १

लेखक भानिम यांनी गुरुवार, 10/12/2015 12:41 या दिवशी प्रकाशित केले.

"तमसो मा ज्योतिर्गमय" (भाग १)

सूर्योदयापूर्वीच्या चाहुलीने पक्ष्यांनी किलबिलाट करायला सुरवात केली आणि कृष्णंभटना जाग आली. तांबडे फुटायला अजून काही अवकाश होता. कंदिलाच्या क्षीण प्रकाशात त्यांनी आपली पत्नी रुक्मिणी आणि कन्या गार्गी यांच्याकडे एक कटाक्ष टाकला. त्या अजूनही साखरझोपेत होत्या. एक मंदसे स्मित करत कृष्णंभट तांब्या उचलून परसदारी आले. नेहमीच्या सवयीप्रमाणे मुखप्रक्षालनादी नित्यकर्मे करून त्यांनी उपरणे खांद्यावर टाकले. खडावा पायात सरकवून ते घराबाहेर पडले आणि " वक्रतुंड महाकाय …. " असे पुटपुटत झपाझप कुशावर्ताच्या दिशेने चालू लागले.

आत्मबंध..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 10/12/2015 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
होतो अत्रुप्त आत्मा मग आत्म-मुक्त झालो.. आता कळून आले मी आत्मबंध आहे. अतृप्त मूळ माझे आत्मस्वरूप तेच. परी मूळबीज म्हणजे मी आत्म-बंध आहे. आत्मा बदलता-हा अतृप्त वर्तमान! तो भूत काळ त्याचा प्राचीन बंध आहे. मी बदलताच असतो वैविध्य तेच माझे. या जाणिवेत नुकता,,, "तो" आत्मबंध आहे. जाणिव आज झाली बदलून मीच मजला.. त्या जाणिवेत आता मी पूर्ण लिप्त आहे. दिसते स्व रूप त्याचे जगता जरा स्वतःशी! शोधीत जात असता तो एक गंध आहे. आहे अस

सुहास शिरवळकरांची पुस्तके आणि मी

लेखक अजिंक्य विश्वास यांनी गुरुवार, 10/12/2015 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
मागे दिड-दोन वर्षांपूर्वी जेव्हा मला अंधारछाया आणि शिरवळकरांची बरीच जुनी पुस्तके मिळाली होती तेव्हाची ही गोष्ट आहे. त्यावेळेस मला अनपेक्षितरित्या हा खजिना मिळाला होता, आणि माझ्या संग्रहात आणि माहितीत नवीन भर पडली होती. त्यावेळेस मला असे वाटत होते, की शिरवळकर कुटुंबीय आणि ठराविक ४-५ लोक सोडले तर माझ्याइतकी माहिती कोणाही जवळ नाहीये. मी त्यांच्या ’थर्‌राट’ ह्या रहस्यकथेच्या १९८८ सालच्या आवृत्तीच्या शोधात काही दिवस अनेक ग्रंथालये आणि जुनी रद्दीची दुकाने पालथी घालत होतो.

सिंहलव्दीपाची सहल : ०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी बुधवार, 09/12/2015 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...